MR/Prabhupada 0311 - आम्ही नवीन प्रकाश देत आहोत. ध्यान अपयशी ठरेल. तू हे घे

Revision as of 13:30, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture -- Seattle, October 2, 1968

बालक: उम, जेव्हा भगवान बुद्ध येथे होते, ते बसून ध्यान करत होते?

प्रभुपाद: होय.

बालक: ठीक आहे, मला वाटले की या युगात तुम्ही ध्यान करू शकत नाही, पण भगवान बुद्ध, जे देवाचे पुत्र होते, ते ध्यान करत होते.

प्रभुपाद: होय.

बालक: पण ते कलिचे युग नव्हते?

प्रभुपाद: होय.

बालक: ते होते?

प्रभुपाद: होय.

बालक: मग आपण कसे ध्यान करू शकता?

प्रभुपाद: अतिशय चांगले. (हशा). त्यामुळे आम्ही बुद्धा पेक्षा चांगले आहोत. आम्ही म्हणतो ध्यान करणे शक्य नाही. तुम्हाला उमजले? आता तुम्हाला समजले काय? भगवान बुद्ध म्हणाले "ध्यान करा" परंतु भगवान बुद्धांच्या अनुयायांना शक्य नाही झाले. ते अयशस्वी झाले. आम्ही नवीन प्रकाश देत आहोत, की "ध्यान करणे अयशस्वी आहे, तुम्ही हे स्वीकार करा." ते स्पष्ट झाले? होय. जर कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितले, आणि जर आपण अयशस्वी झालात, मग मी म्हणतो, "तुम्ही हे करू नका. हे स्वीकार करा. हे फार चांगले आहे." ज्याप्रमाणे आपण एक बालक आहात, आपण ध्यान करू शकत नाही, पण आपण नाच करू शकता आणि हरे कृष्ण जप करू शकता. भगवान बुद्धांना माहीत होते की ते ध्यान करू शकत नाहीत, तू फार बुद्धिमान मुलगा आहेस. पण त्यांचा मूर्खपणा बंद करण्यासाठी, ते फक्त म्हणाले, "बसा, ध्यान करा." त्यात सर्व आहे. (हशा) केवळ एका खट्याळ मुळा प्रमाणे, तो खोड्या करत आहे. त्याचे पालक म्हणाले, "माझ्या प्रिय जॉन, तू इथे खाली बस." त्याला माहीत आहे की तो खाली बसू शकत नाही, पण थोड्या वेळा करिता तो खाली बसेल. वडिलांना माहीत आहे की तो खाली बसणार नाही आहे, पण किमान थोड्या वेळासाठी त्याच्या खोडकर क्रिया बंद राहतील. ठीक आहे. हरे कृष्ण जप करा.