MR/Prabhupada 0320 - आम्ही लोकांना भाग्यवान कसे व्हावे हे शिकवत आहोत

Revision as of 02:57, 29 June 2018 by Parth (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0320 - in all Languages Category:MR-Quotes - 1975 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 16.6 -- South Africa, October 18, 1975

मुलगी : श्रील प्रभुपाद, जरी... सर्व जीव कृष्णांचे अंश आहेत. जरी आपण श्रीकृष्णांना या जन्मात शरण गेलो नाही, तरी कालांतराने आपल्यापैकी सर्वजण त्यांना शरण जातील.

पुष्ट कृष्ण : प्रत्येकजण... जरी आपण कृष्णांना या जन्मात शरण गेलो नाही, तरी आपण कृष्णांना शरण जाऊ का? कालांतराने आपण सर्वजण भगवद्धामाला परत जाऊ का?

प्रभुपाद : हं? तर तुला शंका आहे? हे ठामपणे लक्षात ठेव की प्रत्येकजण तसे करणार नाही. त्यामुळे तुला काहीही चिंता नाही. असे नाही की प्रत्येकजण तसेच करेल. त्यामुळेच चैतन्य महाप्रभू म्हणतात, एइ रूपे ब्रह्माण्ड भ्रमिते कोन भाग्यवान् जीव (चै. च. मध्य १९.१५१) जोपर्यंत एखादी व्यक्ती भाग्यवान नसेल, तोपर्यंत ती तिच्या मूळ घरी, भगवद्धामाला परत जाऊ शकत नाही. ती येथेच दुःखे सहन करेल. त्यामुळे हे कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे आपण लोकांना भाग्यवान बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर एखाद्याची इच्छा असेल, तर तो भाग्यवान बनू शकतो. हाच आपला प्रयत्न आहे. आपण अनेक केंद्रे उभारत आहोत. भाग्यवान कसे व्हावे, आपल्या मूळ घरी परत कसे जावे, ती व्यक्ती आनंदी कशी होऊ शकते, हे सर्वकाही आपण शिकवत आहोत. आता, जर कोणी भाग्यवान असेल, तर तो ह्या शिकवणींना स्वीकारेल व त्याच्या जीवनात बदल घडवून आणेल. त्यामुळे हेच उद्देश्य आहे. मात्र भाग्यवान झाल्याशिवाय कोणीही परत जाऊ शकत नाही. भाग्यवान. आपण त्यांना भाग्यवान होण्याची संधी देत आहोत. हेच आपले उद्देश्य आहे. सर्वाधिक दुर्भाग्यवान व्यक्तीला भाग्यवान होण्याची संधी प्राप्त होत आहे. आपल्यापैकी कोणीही हे लक्षात घेऊ शकते, कशाप्रकारे ते दुर्भाग्यपूर्ण जीवनातून भाग्यवान होत आहेत. हेच कृष्णभावनामृत आंदोलन आहे, ज्यात आपण दुर्भाग्यवान व्यक्तीलाही संधी देत आहोत. प्रत्येकजण दुर्भाग्यवान आहे, प्रत्येकजण मूर्ख आहे. बुद्धिमान व भाग्यवान कसे व्हावे याची आपण संधी देत आहोत. हे आहे कृष्णभावनामृत. जर लोक दुर्भाग्यवान व मूर्ख नसते, तर मग या प्रचाराची गरजच काय आहे? प्रचार म्हणजे तुम्ही या मूर्ख व दुर्भाग्यपूर्ण लोकांना बुद्धिमान व भाग्यवान बनवायला हवे. हा आहे खरा प्रचार. पण जोपर्यंत तुम्ही भाग्यवान व बुद्धिमान असणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कृष्णभावनामृताचा स्वीकार करू शकणार नाहीत. हे एक तथ्य आहे.