MR/Prabhupada 0340 - तुम्ही मृत्यूसाठी नाही आहात, पण निसर्ग तुम्हाला जबरदस्ती करत आहे

Revision as of 04:31, 8 December 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0340 - in all Languages Category:MR-Quotes - 1974 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 9.1 -- Melbourne, June 29, 1974

नमो महावदान्याय
कृष्ण-प्रेम-प्रदायते
कृष्णाय कृष्ण-चैतन्य-नाम्ने
गौर-त्विषे नमः
(चैतन्य चरितामृत मध्य १९.५३) ।

श्रीला रूप गोस्वामी, ते जेव्हा प्रयागला चैतन्य महाप्रभूंना भेटले… भारतात एक पवित्र स्थान आहे, त्याला प्रयाग म्हणतात. तर श्री. चैतन्य महाप्रभुनी सन्यास स्वीकारल्यावर, ते प्रयाग आणि इतर पवित्र स्थानांना गेले. तर श्रील. रूप गोस्वामी, ते सरकारी मंत्री होते. पण ते सर्व काही सोडून, चैतन्य महाप्रभूंच्या हरे कृष्ण आंदोलनात सामील झाले. तर जेव्हा ते पहिल्यांदा भेटले आणि त्यानी नमो महा-वदान्याय हा श्लोक सादर केला. वदान्याय म्हणजे "सर्वात उदार." असे अनेक देवाचे अवतार आहेत, पण रूप गोस्वामी म्हणाले, "भगवंतांचा चैतन्य महाप्रभु हा अवतार सर्वात उदार आहे." नमो महा-वदान्याय. उदार का? कृष्ण-प्रेम-प्रदायते: "तुम्ही तुमच्या संकीर्तन आदोलनाने कृष्णप्रेम वाटत आहात." कृष्णानां समजणे हे खूप कठीण काम आहे. श्रीकृष्णांनी व्यक्तिशः भगवद् गीतेत सांगितले आहे,

मनुष्याणां सहस्रेषु
कश्र्चिद्यतति सिध्दये
(भ.गी. ७.३)

केवळ या युगात नव्हे, आधीच्या युगात सुद्धा "अनेक लाखो लोकांपैकी," मनुष्याणां सहस्रेषु, "हजारो लोकांपैकी," कश्र्चिद्यतति सिध्दये, "एखादाच परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतो." सामान्यता, परिपूर्णता म्हणजे काय याचे त्याना ज्ञान नसते. परिपूर्णता त्यांना माहित नाही. परिपूर्णता म्हणजे जन्म, मृत्यू, जरा,व्याधीचे चक्र थांबवणे. त्याला परिपूर्णता म्हणतात. प्रत्येकजण परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांना परिपूर्ण म्हणजे काय माहित नाही. परिपूर्णतेचा अर्थ असा आहे: की जेव्हा तुम्ही या चार दोषातून मुक्त असता. ते काय आहे? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. प्रत्येकजण. कोणालाही मारायची इच्छा नाही, पण जबरदस्तीने: मरण अटळ आहे. तो दोष आहे. पण हे दुष्ट, त्यांना माहित नाही. त्यांना वाटते की आपण मारणार आहेत. पण नाही. कारण तुम्ही शाश्वत आहात, तुम्ही मृत्यूसाठी नाही आहात, पण निसर्ग तुम्हाला जबरदस्ती करत आहे मरण अटळ आहे.