MR/Prabhupada 0343 - आम्ही मुर्खांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत

Revision as of 06:08, 12 December 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0343 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 3.27 -- Madras, January 1, 1976

कृष्ण, जेव्हा ते या ग्रहावर उपस्थित होते तेव्हा त्यांनी प्रत्यक्षपणे दाखवले, की त्यांनी सर्वांवर नियंत्रण ठेवले पण कोणीही त्यांना नियंत्रित केले नाही. ते ईश्वर आहेत. त्याला परमेश्वर म्हणतात. ईश्वर प्रत्येकजण असू शकतो. देव प्रत्येकजण असू शकतो. पण परमेश्वर कृष्ण आहेत. नित्यो नित्यानां चेतनस चेतनानाम (कथा उपनिषद २.२.१३). तर आपण चांगल्याप्रकारे समजले पाहिजे, आणि ते फार कठीण नाही. तोच नियंत्रक आपल्यासारखाच एक मनुष्य म्हणून आपल्यासमोर येत आहे. पण आपण त्याला स्वीकारत नाही.. ती अडचण आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषिं तनुमाश्रितम् (भ.गी. ९.११) । ते अतिशय खेदजनक आहे. कृष्ण सांगतात की " मी सर्वोच्च नियंत्रक कोण आहे हे दाखवण्यासाठी येतो, आणि मी मनुष्याची भूमिका निभावत आहे. जेणेकरून प्रत्येकजण समजू शकेल. मी भगवद् गीतेमध्ये शिकवत आहे. तरीही हे मूर्ख, दुष्ट, ते समजू शकत नाहीत. तर भगवान आहे.

आम्ही भगवंतांचे सांगत आहोत, कृष्ण, भगवंतांचा पत्ता सुद्धा, वृंदावन, भगवंतांच्या वडिलांचे नाव, आईचे नाव. तर का… भगवंतांना शोधण्यासाठी अडचण कुठे आहे? पण ते स्विकारणार नाहीत. ते स्वकारणार नाहीत. मूढा. त्यांचे वर्णन मूढा म्हणून केले आहे. तर आज सकाळी हे प्रकार मला विचार होते, "तुमच्या आंदोलनाचा उद्देश काय आहे?" तर मी सांगितले, "मूढ लोकांनां शिक्षित करणे, एवढेच." हेच कृष्णभावनामृत आंदोलनाचे सार आहे, की आम्ही मूढांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मूढ कोण आहे? ते कृष्णांनी वर्णन केले आहे. न मां दुष्कृतिनो मुढाः प्रपद्यन्ते नराधमाः (भ.गी. ७.१५) । का? माययापहृतज्ञान. मायेने त्यांचे ज्ञान का हिरावून घेतले आहे? आसुरं भावमाश्रितः आम्ही अगदी सामान्य चाचणी केली आहे, जसे औषध विक्रेता एका छोट्या टेस्टमध्ये काय द्रव आहे याचे विश्लेषण करू शकतो. तर आम्ही खूप बुद्धिमान नाही. आम्ही सुद्धा अनेक मूढांपैकी एक आहोत. पण आम्हाला टेस्ट ट्यूब मिळाली आहे. कृष्ण सांगतात… आम्हाला मूढ राहायला आवडते, आणि कृष्णांकडून शिक्षण घेतो. हे कृष्णभावनामृत आहे. आम्ही स्वतःला खूप शिक्षित आणि विद्वान समजत नाही.- "आम्हाला सर्वकाही माहित आहे." नाही. चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा मूढ राहण्याचा प्रयत्न केला. ते जेव्हा प्रकाशानंद सरस्वतीं बरोबर बोलले… ते मायावादी संन्यासी होते. चैतन्य महाप्रभु नृत्य आणि जप करत होते. तर हे मायावादी संन्यासी त्यांची टीका करत होते की "हे संन्यासी आहेत. आणि हे फक्त जप आणि काही भाविक व्यक्तीबरोबर नृत्य करत आहेत. हे काय आहे?" म्हणून प्रकाशानंद सरस्वती आणि चैतन्य महाप्रभु यांच्यात एक बैठक आयोजित केली त्या बैठकीत चैतन्य महाप्रभूंनी विनम्र सन्याश्याप्रमाणे भाग घेतला. तर प्रकाशानंद सरस्वतींनी त्यांना प्रश्न विचारला, "महोदय, तुम्ही सन्यासी आहात तुमचे कर्तव्य वेदांताचा अभ्यास करणे आहे. तर हे कसे की, तुम्ही नृत्य आणि जप करत आहात? तुम्ही वेदांत वाचत नाही." चैतन्य महाप्रभूंनी सांगितले, "होय, ते खरं आहे. मी करतो कारण माझे गुरु महाराज मला मूढ समजले." ते कसे? "ते म्हणाले, गुरु मोरे मूर्ख देखी करील शासन (चैतन्य चरितामृत अादि ७.७१) । माझ्या गुरु महाराजांना मी एक नंबरचा मूर्ख वाटलो, आणि ते मला ओरडले." "ते तुम्हाला कसे ओरडले?" आता, "वेदांताचा अभ्यास करण्याचा तुला अधिकार नाही. ते तुला जमणार नाही. तू मूढ आहेस. तुझ्यासाठी चांगले आहे तू हरे कृष्णाचा जप कर." तर त्यांचा उद्देश काय होता? उद्देश होता, सध्याच्या क्षणी, हे मूढ, ते कसे वेदांत समजतील? त्यापेक्षा हरे कृष्णाचा जप करा. मग तुम्हाला सर्व ज्ञान मिळेल.

हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नाम एव केवलम
कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिर अन्यथा
(चैतन्य चरितामृत अादि १७.२१) ।
या युगात लोक एवढी पतित आहेत की ते वेदांत काय समजतील आणि कोणाकडे वेदांत वाचायला वेळ आहे? त्यापेक्षा वेदान्ताचे शिक्षण थेट कृष्णांकडून जसे ते सांगतात तसे घ्या, वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो (भ.गी. १५.१५) ।  तर वेदांचे ज्ञान शब्दाद अनावृत्ती. शब्द-ब्रम्हाचा जप करून एखादा मुक्त होऊ शकतो. तर ह्याची शास्त्रात शिफारस केली आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलं कलौ नास्ती एव नास्ती एव नास्ती एव गतीर अन्यथा  (चैतन्य चरितामृत अादि १७.२१) ।   म्हणून एखाद्याला या भौतिक जगातून खरोखरच मुक्त कसे व्हावे यात रस असेल तर, जन्म-मृत्य-जरा-व्याधी (भ.गी. १३.९)  या समस्या आहेत- शास्त्राच्या अनुसार, महाजनांच्या अनुसार, एखाद्याने हरे कृष्ण महामंत्राचा जप केलाच पाहिजे. हे आमचे, मला म्हणायचे आहे, उद्देश आहे.