MR/Prabhupada 0345 - कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत

Revision as of 04:36, 21 December 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0345 - in all Languages Category:MR-Quotes - 1973 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.15.1 -- New York, November 29, 1973

आपल्यापैकी प्रत्येकाचे श्रीकृष्णांशी दृढ नाते आहे. आणि श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत, ते फक्त वाट बघत आहेत की, "केव्हा हा दुष्ट माझ्याकडे आपले तोंड वळवेल." ते एवढे दयाळू आहेत. पण आपण जीव, आपण एवढे दुष्ट आहोत, आपण आपले तोंड श्रीकृष्ण सोडून सगळीकडे वळवतो. हि आपली स्थिती आहे. आम्हाला अनेक कल्पनांसह आनंदी व्हायचे आहे. प्रत्येकजण स्वतःच्या कल्पना लढवत आहे, "आता हे आहे…" पण दुष्ट, त्यांना महित नाही की, आनंद मिळवण्याची खरी प्रक्रिया काय आहे, ती कृष्ण आहे. त्यांना ते माहित नाही. न ते विदुः स्वार्थगतिं हि विष्णुं दुराशया ये बहिरर्थमानिनः (श्रीमद भागवतम ७.५.३१) |

तुम्ही तुमच्या देशात पाहू शकता, ते अनेक गोष्टींचा प्रयत्न करत आहेत, अनेक गगनचुंबी इमारती, अनेक गाड्या, अनेक मोठमोठी शहरे, पण तिथे आनंद नाही. कारण त्यांना माहित नाही कशाचा अभाव आहे. ज्याचा अभाव आहे ते आम्ही देत आहोत. "तुम्ही श्रीकृष्णांचा स्वीकार करा आणि तुम्ही आनंदी व्हाल." कृष्ण आणि जीव, आंतरिकपणे जोडले गेले आहेत. वडील आणि मुलाप्रमाणे, किंवा मित्र आणि मित्राप्रमाणे, किंवा मालक आणि नोकराप्रमाणे आपण अतिशय दृढतेने जोडले गेले आहोत. कारण आपण विसरलो आहोत आपले कृष्णाबरोबरचे दृढ नाते. आणि या भौतिक जगात आनंदी बनण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून आपल्याला इतके त्रास सहन करावे लागत आहेत. हि स्थिती आहे. कृष्ण भुलीय जीव भोग वांछा करे.

आपण जीव, आपण या भौतिक जगात आनंदी बनण्याचा प्रयत्न करत आहोत, "तुम्ही या भौतिक जगात का आहात, तुम्ही आध्यात्मिक जगामध्ये का नाही?" आध्यात्मिक जगात, कोणीही भोक्ता बनू शकत नाही, भोक्ता. ते केवळ परम, भोक्तारं यज्ञतपसा सर्व… (भ.गी. ५.२९) । कोणतीही चूक नाही. तिथे सुद्धा जीव आहेत, पण त्यांना चांगल्या तऱ्हेने माहित आहे की वास्तविक उपभोक्ता, स्वामी, कृष्ण आहेत. ते आध्यात्मिक राज्य आहे. त्याचप्रमाणे या भौतिक जगात , जर आपण चांगल्या तऱ्हेने समजू शकलो की आपण भोक्ता नाही. श्रीकृष्ण भोक्ता आहेत., मग ते आध्यात्मिक जग आहे. कृष्णभावनामृत आंदोलन प्रत्येकाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे, की आपण, आपण भोक्ता नाही, कृष्ण भोक्ता आहेत. जसे , या संपूर्ण शरीराचा उपभोक्ता पोट आहे, आणि हात आणि पाय आणि डोळे आणि कां आणि मेंदू आणि सर्वकाही, यांना आनंददायक गोष्टी शोधण्यात आणि त्या पोटात घालण्यात व्यस्त राहिले पाहिजे. हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, आपण भगवंतांचे किंवा श्रीकृष्णांचे अंश आहोत, आपण भोक्ता नाही.