MR/Prabhupada 0349 - मी माझ्या गुरु महाराजांनी जे सांगितले त्याच्यावर केवळ विश्वास ठेवला

Revision as of 05:32, 26 December 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0349 - in all Languages Category:MR-Quotes - 1976 Category:MR-Quotes - A...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Arrival Address -- New York, July 9, 1976

तर बुद्धिमान व्यक्तीला वेगळी परिस्थिती, भिन्न जीवन माहित असले पाहिजे. त्यांना माहित नाही. एक दिवस आपले डॉ. स्वरूप दामोदर बोलत होते, की जी काही वैज्ञानिक सुधारणा किंवा शैक्षणिक सुधारणा त्यांनी केली आहे. दोन गोष्टी हव्या आहेत. त्यांना माहित नाही हे वेगवेगळे ग्रह काय आहेत. त्यांना माहित नाही. ते फक्त कल्पना करत आहेत. ते चंद्र ग्रह, मंगळ ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ते शक्य नाही. अगदी जरी तुम्ही एखाद दुसऱ्या ग्रहावर गेलात, असे लाखो ग्रह आहेत; तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे. आणि आणखी ज्ञान; त्यांना जीवनाच्या समस्या काय आहेत माहित नाही. दोन गोष्टी त्यांच्यात कमी आहेत. आणि आम्ही त्या दोन गोष्टी देत आहोत. आपण काही गोष्टींपासून वंछित झालो आहोत हि आयुष्याची समस्या आहे. आपण कृष्णभावनामृता पासून दूर गेलो आहोत; म्हणून आपण पीडित आहोत. जर तुम्ही कृष्णभावनामृत स्वीकारले, तर संपूर्ण समस्येचे नीराकरण होईल. आणि आता पर्यंत ग्रह प्रणाली मानली जाते. म्हणून कृष्ण तुम्हाला संधी देत आहे, जिथे तुम्हाला आवडेल तिथे तुम्ही जा. पण बुद्धिमान माणूस निवडतो, मद्याजिनो अपि यान्ति माम (भ.गी. ९.२५) । "जे कृष्णभावनामृत आहेत. ते माझ्याकडे येतात." तर या दोघात काय फरक आहे? जरी मी चंद्र ग्रहावर किंवा मंगळ ग्रहावर किंवा ब्रम्हलोक गेलो, श्रीकृष्ण सांगतात, आब्रम्हभुवनाल्लोका: पुनरावर्तिनो 'र्जुनो (भ.गी. ८.१६) । तुम्ही ब्रम्हलोकावर जाऊ शकता, पण क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति: "तुम्हाला परत यावे लागेल." आणि श्रीकृष्ण सांगतात, यद्गवा ना निवर्तन्ते तद्धाम परमं मम (भ.गी. १५.६) ।

मद्याजिनो अपि यान्ति माम तर तुम्हाला हि संधी मिळाली आहे, कृष्णभावनामृत. काय आहे ते, भगवद् गीतेत सर्व काही सांगितले आहे. हि संधी गमावू नका. तथाकथित वैज्ञानिक किंवा तत्वज्ञानी,किंवा राजकारणी यांनी भ्रमित होऊ नका, मूर्ख बनू नका. कृष्णभावनामृत स्वीकारा. आणि ते केवळ गुरु-कृष्ण-कृपाय चैतन्य चरितामृत मध्य १९.१५१) शक्य आहे. गुरूच्या कृपेने आणि कृष्णाच्या कृपेने तुम्ही सर्व यश मिळवू शकता. हे रहस्य आहे.

यस्य देव परा भक्तिर्
यथा देवे तथा गुरौ
तस्यैते कथिता हि अर्था:
प्रकाशन्ते महात्मन:
(श्वेताश्वतर उपनिषद ६.२३)

तर हि गुरु-पूजा जी आम्ही करतो, तो आत्मसंयम नाही ते वास्तविक शिक्षण आहे. तुम्ही रोज गाता, ते काय आहे? गुरु-मुख-पद्मवाक्य… आर ना करीया ऐक्य. हे भाषांतर आहे. मी तुला खरे सांगतो, जे काही थोडे यश या कृष्णभावनामृत आदोलनात आहे. मी माझ्या गुरु महाराजांनी जे सांगितले त्याच्यावर केवळ विश्वास ठेवला. तुम्हीही ते पुढे चालू ठेवा. मग सर्व यश मिळेल.

खूप खूप धन्यवाद.