MR/Prabhupada 0351 - तुम्ही काहीही लिहा, उद्देश केवळ सर्वेश्वराची स्तुती करण्याचा असला पाहिजे

Revision as of 05:48, 27 December 2018 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0351 - in all Languages Category:MR-Quotes - 1969 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 1.5.9-11 -- New Vrindaban, June 6, 1969

तर, कावळे आणि हंस यांच्यात नैसर्गिक भेद आहे. त्याचप्रमाणे कृष्णभावनामृत व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती यांच्यात फरक आहे. सामान्य व्यक्तींची तुलना कावळ्यां बरोबर केली जाते. आणि पूर्ण कृष्णभावनामृत व्यक्ती हंस आणि बदका सारखी. मग ते सांगतात,

तद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो
यस्मिन्प्रतिश्र्लोकमबद्धवत्यपि
नामान्यनन्तस्य यशो'ङ् कितानि
यत्शृण्वति गायन्तिगृणन्ति साधवः
(श्रीमद् भागवतम् १.५.११)

उलट, हे एक प्रकारचे साहित्य आहे, अतिशय सुंदर लिखाण, रूपक,आणि काव्य, सर्वकाही. पण त्यात भगवंतांची स्तुती करण्याचा काहीच प्रश्न नाही. त्या तुलनेत, त्याच जागेसारखे, जिथे कावळे आनंद घेतील. दुसरीकडे, इतर प्रकारचे साहित्य, ते काय आहे? तद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो यस्मिन्प्रतिश्र्लोकमबद्धवत्यपि (श्रीमद् भागवतम् १.५.११) ।

जनतेस वाचण्यासाठी सादर केलेले साहित्य, जे व्याकरणात्मक दृष्टया चुकीचे आहे. पण कारण त्यात भगवंतांची स्तुती आहे, ते क्रांती निर्माण करू शकते. ते संपूर्ण मानवी समाज शुद्ध करू शकते. माझ्या गुरु महाराजांनी, जेव्हा त्यांनी हार्मोनिस्टमध्ये प्रकाशित होणारे लेख निवडले होते, जर त्यांनी पहिले की लेखकाने अनेक वेळा "कृष्ण," "प्रभू चैतन्य," असे लिहिले आहे. ते ताबडतोब मंजुरी देत. "ठीक . हे ठीक आहे. (हशा) हे सर्व ठीक आहे." इतके वेळा त्याने "कृष्ण" आणि "चैतन्य," म्हटले आहे तर ते बरोबर आहे. तर त्याचप्रकारे, अगदी जर आपण जाऊ देवाचिया द्वारी किंवा कोणतेही इतर साहित्य तुटक्या फुटक्या भाषेत प्रकाशित केले. त्यांनी काही फरक पडत नाही कारण त्यात भगवंतांची स्तुती आहे. नारदांनी याची शिफारस केली आहे. तद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो. जनताघ. अघ म्हणजे पापकर्म. जर एखाद्याने एक वाक्य या साहित्याचे वाचले,जरी ते तुटक्या फुटक्या भाषेत लिहिलेले असले, पण जर केवळ त्याने ऐकले की कृष्ण आहे, तर त्याची पाप कर्म ताबडतोब नष्ट होतात. जनताघविप्लवो. तद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो यस्मिन्प्रतिश्र्लोकमबद्धवत्यपि नामान्यनन्तस्य (श्रीमद् भागवतम् १.५.११) अनंत म्हणजे अमर्याद. त्यांचे नाव, त्यांची प्रसिद्धी, त्यांची स्तुती, त्यांचे गुण वर्णन केले आहेत. नामान्यनन्तस्य यशो'ङ् कितानि जर स्तुती आहे,

अगदी त्यांनी तुटक्या फुटक्या भाषेत सादर केली आहे, मग श्रृण्वति गायन्तिगृणन्ति साधवः ज्याप्रमाणे माझे गुरु महाराज, साधू, संत व्यक्ती, लगेच मंजूर करत. "होय. हे सर्व ठीक आहे. " हे सर्व ठीक आहे. कारण तिथे भगवंतांची स्तुती आहे. अर्थात, सामान्य लोकांना समजणार नाही. पण नारदांनी बोललेले हे आदर्श, आदर्श आवृत्ती आहे. तुम्ही काहीही लिहा. उद्देश केवळ सर्वेश्वराची स्तुती करण्याचा असला पाहिजे. मग तुमचे साहित्य पवित्र, शुद्ध आहे. आणि कितीही चांगले, दोन्हीपैकी शब्दशः किंवा रूपकात्मक किंवा काव्य, तुम्ही काहीही साहीत्य लिहा ज्यात भगवंतांबद्दल किंवा कृष्णाबद्दल काही नाही, ते वायसं तीर्थं. ते कावळ्यांसाठी आनंदाचे ठिकाण आहे. हे नारद मुनींचे सांगणे आहे. आपण याची नोंद घेतली पाहिजे. विष्णवांसाठी एक पात्रता आहे: काव्यात्मक. तुम्ही... प्रत्येकजण कवी असला पाहिजे. तर… पण ती कविता. ती कवितेची भाषा, केवळ भगवंताची स्तुती असली पाहिजे.