MR/Prabhupada 0392 - नारद मुनी बजाय वीणाचे तात्पर्य

Revision as of 04:08, 7 April 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0392 - in all Languages Category:MR-Quotes - 1972 Category:MR-Quotes - P...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Purport to Narada Muni Bajay Vina -- Los Angeles, September 22, 1972

नाम अमनी, उदित हय
भक्त-गीता-सामे.

हे गाणे भक्तिविनोद ठाकूर यांनी गायले आहे. या गाण्याचे तात्पर्य असे आहे की नारद मुनी, महान आत्मा, सांगतात, ते त्यांचे तंतू वाद्य वाजवतात ज्याला वीणा म्हणतात. वीणा हे तंतू वाद्य नारद मुनींकडे असते. तर ते राधिका-रमण गाण्याची धून वाजवत आहेत. कृष्णाचे दुसरे नाव राधिका-रमण आहे. तर त्यांनी तंतुवाद्याची तार ओढताच, लगेच सर्व भक्तांनी त्यांना प्रतिसाद द्यायला सुरवात केली आणि ते खूप सुंदर कंपन बनते.

अमिय धारा वरिषे घन. आणि जेव्हा तंतूवाद्या बरोबर गाणे सुरु होते, असे प्रतीत होते की तिथे अमृताचा वर्षाव होत आहे, आणि सर्व भक्त, मग अत्यानंदाने, ते पूर्ण समाधानाने नाचत होते. मग जेव्हा ते नाचत होते, असे वाटत होते की ते माधुरी पूर नावाचे पेय पिउन धुंद झाले. आणि जसे एखादा पिउन जवळजवळ वेडा बनतो, तसेच, अत्यानंदाने, सर्व भक्त वेडे होतात. आणि त्यांच्यापैकी काही रडतात, आणि काही नाचतात, आणि त्यांच्यापैकी काही, जरी ते सार्वजनिकपणे नाचू शकत नाहीत, त्यांचे हृदय नाचत होते. अशाप्रकारे भगवान शिव ताबडतोब नारद मुनींना अलिगन देतात, आणि ते हर्षभरित आवाजात बोलू लागतात. आणि भगवान शिव यांना नारद मुनींनी बरोबर नाचताना पाहून, ब्रम्हा देखील सामील झाले, आणि ते म्हणू लागले, "तुम्ही सर्व, कृपया हरीबोल, हरीबोलचा गजर करा!"

अशाप्रकारे, हळूहळू स्वर्गाचा राजा, इंद्र, ते देखील मोठया समाधानाने सामील झाले. आणि नाचू आणि गजर करू लागले, "हरी हरी बोल." अशाप्रकारे, देवाच्या पवित्र नावाच्या दिव्य कंपनाच्या प्रभावामुळे, संपूर्ण ब्रम्हांड प्रसन्न झाले, आणि भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, "जेव्हा संपूर्ण ब्रम्हांड आंनदी बनते,तेव्हा माझी इच्छा तृप्त होते, आणि म्हणून मी रूप गोस्वामींच्या पादकमलांशी प्रार्थना करतो, की या हरिनामाचा गजर अशाचप्रकारे चालू राहू दे."