MR/Prabhupada 0414 - पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या समीप जाणे

Revision as of 04:57, 18 May 2019 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0414 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968

प्रभुपाद: गोविंदम आदि-पुरुषं तम् अहं भजामि.

श्रोते: गोविंदम आदि-पुरुषं तम् अहं भजामि.

प्रभुपाद: तर कृष्णभावनामृत आंदोलन म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, कृष्ण यांच्या जवळ जाण्यासाठी. हे कृष्णभावनामृत आहे. थेट. हि भगवान चैतन्य यांची विशेष भेट आहे की… या युगात अनेक विसंगती आहेत, मानवी जीवनात दोष, की हळूहळू ते कृष्णभावनामृत किंवा भगवद भावनेच्या कल्पनेचा त्याग करीत आहेत. फक्त हळूहळू सोडून देत नाहीत, त्यांनी आधीच सोडून दिले आहे. तर वेदांत-सूत्र म्हणून सांगते, अथातो ब्रम्ह जिज्ञासा. असे नाही की वेगवेगळ्या धार्मिक व्यवस्था आपण सुरु केल्या आहेत. हि वर्तमान दिवसाची मोठी गरज आहे. कारण आम्ही म्हणतो की एकतर शास्त्रवचनांचे पालन करा, बायबल, किंवा तुम्ही कुराण किंवा वेदांचे पालन करा, उद्देश भगवान आहे. पण सध्याच्या क्षणी, कलि युगाच्या प्रभावामुळे… कलि म्हणजे भांडणे आणि मतभेदांचे युग. तर या युगात लोक अनेक प्रकारे कमनशिबी आहेत.

पहिली अयोग्यता आहे की ते दीर्घ काळापर्यंत जगत नाहीत. भारतात सरासरी आयुष्य पस्तीस वर्षे आहे, आणि मला इथे सरासरी आयुष्य काय आहे माहित नाही, पण भारतात लोकांची गर्दी आहे. त्यांच्याकडे अशाप्रकारची बुद्धी नाही किंवा ते भारता बाहेर जाऊन वसाहत स्थापित करण्याचा विचार करीत नाहीत. प्रत्येकजण फायदा उठवण्यासाठी तिथे गेला, पण त्यांनी कधी इतर ठिकाणांचा उपयोग करण्याचा विचार केला नाही. ती संस्कृती आहे… ते इतरांच्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत… तरीही, भारताची स्थिती फारचा अनिश्चित आहे, कारण त्यांनी स्वतःची संस्कृती सोडली आहे, आणि ते पाश्चिमात्य संस्कृतीची अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे त्यांना शक्य नाही, अनेक परिस्थितींमुळे, आणि म्हणून ते दोघांच्या शिंगाच्या आणि भोवऱ्याच्या मध्ये अडकले आहेत. तर हे युग असे आहे. फक्त भारतात नाही, इतर देशात वेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत. वेगळ्या समस्या आहेत. पण समस्या आहेत, भारतामध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा चीनमध्ये. सगळीकडे,

ते जगाच्या शांतीसाठी अनेक योजना तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुमच्या देशात देखील, अगदी अमेरिकेत, तिथे केनेडी सारख्या मोठया माणसाच्या जीवनाची काही सुरक्षा नाही, तुम्ही बघता. कोणीही कोणत्याही क्षणी मारला जाऊ शकतो, आणि कोणतीही कारवाई होत नाही. तर हि आणखीन एक समस्या आहे. साम्यवादी देशात, जबरदस्तीने, ते नागरिकांवर राज्य करीत आहेत. अनेक रशियन, इतके सारे चिनी, ते आपल्या देशापासून दूर जात आहेत. त्यांना हे साम्यवादी विचार आवडत नाही. तर समस्या या युगामुळे आहेत. कलि युगामुळे, समस्या आहेत. आणि समस्या काय आहेत? समस्या आहेत की या युगात लोक कमी जगतात, त्यांच्या आयुष्याचा कालावधी. आपल्याला माहित नाही की आपला मृत्यू कधी होईल, कोणत्याही क्षणी.

असे सांगतात की भगवान रामचंद्रांच्या राज्यात, ब्राम्हण… (बाजूला) ते काम करत नाहीये का? एक ब्राम्हण, तो राजाकडे आला, "माझ्या प्रिय राजा, माझा मुलगा मरण पावला आहे. तर कृपया समजवा, वडिलांच्या उपस्थितीत, एक मुलगा कसा मरण पावला." जरा बघा राजा किती जबाबदार होता. एक वृद्ध वडील राजाकडे तक्रार करायला आले, "काय कारण आहे की वडिलांच्या उपस्थितीत, मुलगा मरण पावला? कृपया समजवा." तर बघा सरकार किती जबाबदार होते. सरकार जबाबदार आहे जर मुलगा वडिलांच्या आधी वारला तर. स्वाभाविकच, वडील मुलापेक्षा मोठे आहेत, तर त्यांचा पहिले मृत्यू झाला पाहिजे. तर असे जबाबदार सरकार होते आता सभ्य जगात कोणीही कोणालाही मारु शकतो, पण कोणीही त्याची पर्वा करीत नाही.