MR/Prabhupada 0435 - आम्ही या सर्व सांसारिक समस्यांनी हैराण झालो आहोत

Revision as of 04:08, 23 January 2020 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0435 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968

भक्त : ज्यायोगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. जरी मी पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त केले तरी या शोकाचे निराकरण करता येणार नाही, स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले. (भ.गी. २.८) | संजय म्हणाला: याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, 'हे गोविंद, मी युद्ध करणार नाही' आणि स्तब्ध झाला. (भ.गी. २.९) | हे भारतवंशजा! त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण, खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले (भ.गी. २.१०). (भ.गी. २.१०) । पुरुषोत्तम भगवंत म्हणाले…"

प्रभुपाद: म्हणून जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा आपण गंभीर होतो, जसे काही आपण हरवले आहोत, पण बघा कृष्ण हसतात. काहीवेळा आपण विचार करतो... याला माया म्हणतात. तेच उदाहरण, जसा एक मनुष्य स्वप्न बघतो, रडतो, "तिथे वाघ आहे, तिथे वाघ आहे. तो मला खात आहे," आणि जो माणूस जागा आहे, तो हसतो, "वाघ कुठे आहे? वाघ कुठे आहे?" आणि हा माणूस रडत आहे, "वाघ, वाघ, वाघ." त्याचप्रमाणे, जेव्हा आपण खूप गोंधळलेले असतो... राजकारण्यांप्रमाणे, काहीवेळा ते राजकीय परिस्थितीत गोंधळलेले असतात. आणि दावा करतात, " हि माझी जमीन आहे, हा माझा देश आहे," आणि दुसरा पक्ष देखील दावा करतो, "हि माझी जमीन आहे, हा माझा देश आहे," आणि ते खूप गंभीरपणे लढतात. कृष्ण हास्य करतात. " हे मूर्ख कसला दावा करीत आहेत 'माझा देश, माझी जमीन'?

माझी जमीन आहे, आणि ते आपली जमीन म्हणून दावा करीत आहेत आणि भांडत आहेत." वास्तविक, जमीन कृष्णांच्या मालकीची आहे , पण हे लोक भ्रमात आहेत, दावा करतात, "हि जमीन माझी आहे, हा देश माझा आहे," ते किती काळ या देशाचे किंवा राष्ट्राचे रहाणार आहेत. त्याला भ्रम म्हणतात. तर हि आपली स्थिती आहे. आपली वास्तविक स्थिती न जाणल्याने आपण या सांसारिक समस्यांनी गोधळलेलो आहोत. जी पूर्ण खोटी आहे. र्जनस्य मोहोऽयमहं ममेति (श्रीमद भागवतम ५.५.८) मोह, मोह म्हणजे भ्रम. हा भ्रम आहे. तर प्रत्येकजण या भ्रमामध्ये आहे. तर जो हुशार आहे, जर तो समजला कि ह्या सांसारिक समस्या केवळ भ्रम आहे… "मी" आणि "माझे" या तत्वावर मी सर्व विचार तयार केले आहेत. हा संपूर्ण भ्रम आहे. तर एखादा, जेव्हा एखादा भ्रमातून मुक्त होण्याएवढा बुद्धिमान असतो, तो अध्यात्मिक गुरूला शरण जातो. ते अर्जुनाने उदाहरणासह दाखवून दिले. जेव्हा तो खूप गोंधळलेला होता.

तो श्रीकृष्णांबरोबर मित्राप्रमाणे बोलत होता, पण त्याने पहिले कि "हे मित्रांमधील संभाषण माझे प्रश्न सोडवू शकणार नाही ." आणि त्याने श्रीकृष्णांची निवड केली, कारण त्याला श्रीकृष्णांचे महत्व माहित होते. कमीतकमी, त्याला माहित असले पाहिजे. तो मित्र आहे. आणि श्रीकृष्णांचा स्वीकार केला आहे हे त्याला माहित होते … "जरी ते मित्र म्हणून वागत होते, पण महान आचार्यांनी श्रीकृष्णांचा स्वीकार भगवान म्हणून केला आहे." ते अर्जुन माहित होते. म्हणून तो म्हणाला की "मी खूप गोंधळलो आहे मी काही समजू शकत नाही. जरी स्वीकारले कि माझा या युद्धात विजय होईल, तरी मी सुखी होणार नाही. जर मी इतर सर्व ग्रहांचा राजा झालो, तर या ग्रहावर विजयी होण्याबद्दल काय बोलावे. किंवा मी उच्च ग्रह प्रणालीत देवता बनलो. तरी हे भोग कमी करता येणार नाहीत."