MR/Prabhupada 0438 - गायीचे सुकलेले शेण जाळून बनवलेली राख दंतमंजन म्हणून वापरली जाते

Revision as of 04:00, 5 February 2020 by SubhadraS (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0438 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968

आयुर्वेदामध्ये गायीचे सुकलेले शेण जाळून बनवलेली राख दंतमंजन म्हणून वापरली जाते. ती जंतुनाशक पावडर आहे. त्याचप्रमाणे, वेदामध्ये अशा खूप गोष्टी, अनेक आदेश आहेत, जो वरवर पाहता विरोधाभास वाटतो, पण तो विरोधाभास नाही. ते अनुभव आहेत, अलौकीक अनुभव. ज्याप्रमाणे वडील मुलाला सांगतात. की "माझ्या प्रिय मुला, तू हे जेवण घे. हे खूप चांगले आहे.". आणि मुलगा ते घेतो, वडिलांवर विश्वास ठेवून, अधिकारी वडील सांगतात... मुलाला माहित आहे की "माझे वडील..." त्याला आत्मविश्वास आहे की "माझे वडील कधीही मला असे काही देणार नाहीत जे विषारी आहे. " म्हणून तो डोळे झाकून स्वीकारतो, कोणत्याही कारणाशिवाय, अन्नाच्या कोणत्याही विश्लेषणाशिवाय, ते शुद्ध आहे किंवा नाही. अशा प्रकारे तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे.

तुम्ही हॉटेलात जाता कारण त्याला शासनाचा परवाना आहे. तिथे कोणताही पदार्थ घेताना तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे हि तो खूप छान आहे, शुद्ध आहे, किंवा जंतुविरहित आहे,किंवा तो... तुम्हाला ते कसे समजते? अधिकारी. कारण हे हॉटेल शासनाद्वारे अधिकृत आहे, त्याला परवाना मिळाला आहे, म्हणून तुम्ही विश्वास ठेवता. त्याचप्रमाणे शब्द-प्रमाण म्हणजे पुरावा मिळताच. सर्व वैदिक साहित्य, "हे असे आहे," तुम्हला स्वीकारलेच पाहिजे, एवढेच. मग तुमचे ज्ञान परिपूर्ण आहे, कारण तुम्ही परिपूर्ण स्रोतकडून गोष्टी स्वीकारल्या आहेत. त्याचप्रमाणे कृष्ण, श्रीकृष्णांचा स्वीकार भगवान म्हणून केला आहे. जे काही त्यांनी सांगितले ते सर्व बरोबर आहे. स्वीकारा अर्जुन म्हणाला किमान, सर्वमेतदृतं मन्ये (BG 10.14). (भ.गी. १०.१४). "माझ्या प्रिय कृष्ण, जे काही तुम्ही सांगता ते मी स्वीकारतो." ते आपले तत्व असले पाहिजे. अधिकारींचा पुरावा असेल तर आपण संशोधनाची चिंता का करावी? तर वेळ वाचवण्यासाठी, त्रास वाचवण्यासाठी आपण अधिकारी, वास्तविक अधिकाऱ्यांचा स्वीकार केलाच पाहिजे. हि वैदिक पद्धत आहे. आणि म्हणून वेद सांगतात, तद् विज्ञानार्थं स गुरुम् इवाभिगछेत (मु.उ.१.२.१२).