MR/Prabhupada 0441 - श्रीकृष्णा सर्वोच्च आहे, आणि आम्ही त्याचे अंश आहोत

Revision as of 10:26, 31 May 2021 by Soham (talk | contribs) (Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0441 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968

भक्त: "भगवान परम सर्वोच्च व्यक्ती आहेत, आणि अर्जुन, भगवंतांचा शाश्वत पार्षद, आणि तिथे जमलेले सर्व राजे शाश्वत व्यक्ती आहेत.  असे  भूतकाळात त्या व्यक्ती अस्तित्वात नव्हत्या, आणि असे पण नाही की त्या शाश्वत व्यक्ती राहणार नाहीत.  त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होते, आणि भविष्यकाळात त्यांचे व्यक्तित्व कोणत्याही व्यत्ययाशिवाय राहील.  म्हणून कोणत्याही जीवासाठी शोक करण्याचे कारण नाही.   मायावादी किंवा अवैयक्तिक सिद्धांत मुक्तीनंतर आत्मा, माया किंवा भ्रमातून वेगळा झाला.  ब्रम्हनमध्ये विलीन होतो स्वतंत्र अस्तित्वाशिवाय…" प्रभुपाद: आता, मायावादी सिद्धांत सांगतो की हे व्यक्तित्व माया आहे.  तर त्याची संकल्पना आत्मा, संपूर्ण आत्मा ढेकळा सारखा आहे.  त्याचा सिद्धांत घटाकाश, पोटाकाश आहे.  घटाकाश, पोटाकाश  म्हणजे… आकाशप्रमाणे.  आकाश विस्तार आहे, एक अवैयक्तिक विस्तार.  तर भांडयात, पाण्याच्या भांड्यात, बंद असलेल्या घागरीमध्ये…   आत, घागरीमध्ये, तिथे देखील आकाश आहे, लहान आकाश आहे.  आता, घागर फुटल्याबरोबर, बाहेरचे मोठे आकाश,  आणि घागरीमधील लहान आकाश मिसळले जाते.  हा मायावादी सिद्धांत आहे.  पण हे सादृश्य लागू होऊ शकत नाही.  सादृश्य म्हणजे समानता. तो सादृश्याचा कायदा आहे.  आकाशाची तुलना होऊ शकत नाही…  घागरीमधील लहान आकाशाची तुलना जीवा बरोबर होऊ शकत नाही.  हे भौतिक, पदार्थ आहे, आकाश पदार्थ आहे आणि जीव आत्मा आहे.  तर तुम्ही कसे म्हणू शकता? जसे लहान मुंगी, आत्मा आहे.  तिला तिचे व्यक्तित्व मिळाले आहे.  पण मोठा मृत दगड,टेकडी, डोंगर, त्याला काही व्यक्तित्व नाही.  तर भौतिक पदार्थाला व्यक्तित्व नाही. आत्म्याला व्यक्तित्व आहे.  जर समानतेचे मुद्दे भिन्न असतील तर तिथे कोणतीही समानता नाही.  हा सादृश्याचा कायदा आहे.  तर तुम्ही भौतिक पदार्थ आणि आत्मा यांची तुलना करू शकत नाही.  म्हणून हि तुलना चुकीची आहे. घटाकाश पोटाकाश.  मग आणखी एक पुरावा भगवद-गीतेमध्ये आहे.  श्रीकृष्ण सांगतात की ममैवांशो जीवभूत: (भ.गी. १५.७) "हे व्यक्तिगत आत्मे, ते माझे अंश आहेत."  जीवलोके सनातन: आणि ते शाश्वत आहेत.  त्याचा अर्थ शाश्वत अंश आहेत.  मग केव्हा...  या मायावादी सिद्धांताचे कसे समर्थन केले जाऊ शकते, ते मायेमुळे  मायेद्वारे झाकले गेल्याने, ते व्यक्तिगत दिसत आहेत, वेगळे, पण जेव्हा मायचे आवरण काढून घेतले जाईल,  ते मिसळले जातील जसे घागरीमधील लहान आकाश आणि बाहेरील मोठे आकाश मिसळले जाते? तर तार्किक दृष्टिकोनातून हि तुलना चुकीची आहे, आणि प्रामाणिक वैदिक दृष्टिकोनातूनही.  ते शाश्वत अंश आहेत. भगवद्-गीतेमध्ये अनेक पुरावे आहेत. भगवद्-गीता सांगते आत्म्याचे तुकडे होऊ शकत नाहीत.  जर तुम्ही असे सांगितलेत की मायच्या आवरणाद्वारे आत्मा तुकडा बनला आहे.  तो तोडला जाऊ शकत नाही. जसे तुम्ही मोठया कागदाचे छोटेछोटे तुकडे केले, ते शक्य आहे कारण तो पदार्थ आहे, पण आध्यात्मिकरीत्या ते शक्य नाही. आध्यात्मिकरीत्या, शाश्वत, अंश अंशच आहे, आणि परम, परमच आहे.  श्रीकृष्ण सर्वोच्च आहेत, आणि आपण अंश आहोत. आपण शाश्वत अंश आहोत.  या गोष्टी भगवद्-गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्पष्ट केल्या आहेत.  मी तुम्हा सर्वाना विनंती करतो की हि भगवद्-गीतेची प्रत तुमच्याकडे ठेवा,  तुम्ही सर्वजण ती काळजीपूर्वक वाचा.  आणि येत्या सप्टेंबरला परीक्षा होईल.  तर... नक्कीच ती ऐच्छिक आहे.  पण मी तुम्हाला विनंती करतो, पुढच्या सप्टेंबरच्या परीक्षेची तयारी करा.  आणि जो हि परीक्षा पास होईल त्याला भक्ती-शास्त्री शीर्षक मिळेल. तू वितरण केलेस का... होय. पुढे कर.  भक्त: हा सिद्धांत नाही  की आपण व्यक्तित्वाचा विचार फक्त बद्ध अवस्थेत करतो.   श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की भविष्यात देखील भगवंतांचे आणि इतरांचे व्यक्तित्व जसे आहे तसे..." प्रभुपाद: श्रीकृष्ण कधीही सांगत नाहीत की मुक्तीनंतर हे आत्मे परम आत्म्याबरोबर मिसळले जातील.   भगवद्-गीतेमध्ये श्रीकृष्ण कधीही सांगत नाहीत.