MR/Prabhupada 0001 - दहा दशलक्ष विस्तृत



Lecture on CC Adi-lila 1.13 -- Mayapur, April 6, 1975

चैतन्य महाप्रभु ह्यांनी सगळ्या आचार्यांना सांगितले आहे की... नित्यानंद प्रभु , अद्वैत प्रभु आणि श्रीवासदी-गौर-भक्त-व्रिन्द, हे सगळे आचार्य श्री चैतन्य महाप्रभु ह्यांचे उपदेश वाहक आहेत. ह्यासाठी आचार्याच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. असं केल्याने जीवन यशस्वी होईल. आणि आचार्य होणं अवघड नाही होणार. सगळ्यात आधी आपल्या आचार्यांचा निष्ठावान सेवक होण्यासाठी, ते जे सांगतात ते अमलात आणले पाहिजे. त्यांना प्रसन्न करा आणि कृष्णा भावनामृताचा प्रसार करा. फक्त एवढंच करा हे अजिबात कठीण नाहीये. आपल्या गुरु महाराज्याच्या सूचनांचा पालन करा आणि कृष्णा भावनामृताचा प्रसार करा. चैतन्य महाप्रभु ह्यांचा हाच आदेश आहे. आमार अज्नंआय गुरु हनंआ तार एइ देश यारे देख तारे कह क्रिष्ण-उपदेश “माझ्या आदेशांचा पालन केल्याने, तुम्ही गुरु व्हाल.” आणि जर आपण अचूक रीतीने आचार्य पद्धतीचा पालन केले. आणि जर आपण खूप प्रयत्नांनी श्रीकृष्णाच्या आदेशांचा प्रसार केला. यारे देखा तारे कहा 'क्रिष्ण'-उपदेश दोन प्रकारचे क्रिष्ण-उपदेश आहेत. उपदेश म्हणजे सूचना. श्रीकृष्णानी दिलेल्या सूचना पण कृष्णा उपदेश आहे. आणि कृष्णा विषयी मिळालेला उपदेश,पण 'क्रिष्ण'-उपदेश आहे. कृष्णस्य उपदेश इति क्रिष्ण उपदेश. समास, शास्ति-तत-पुरुस-समास आणि कृष्णा विषया उपदेश, ते सुद्धा क्रिष्ण-उपदेश आहे. बाहु व्रीहि-समास संस्कृत व्याकरण समजण्याची हि पद्धत आहे. श्रीकृष्णाचा उपदेश ही भगवद-गीता आहे. तो प्रत्यक्ष रितीने उपदेश करतो. अश्या पद्धतीने जे क्रिष्ण उपदेशाचा प्रसार करत आहेत, जे कृष्णाने सांगितले आहे ते परत सांगा, मग तुम्ही आचार्य व्हाल. हे अजिबात अवघड नाही आहे. सर्वकाही तिथे सांगितले आहे. आपल्याला फक्त एखाद्या पोपटाप्रमाणे ते परत सांगायचे आहे. अगदी पोपटासारखा नाही. कारण पोपट न समजताच बोलत असतो. तुम्हाला तर त्याचा अर्थ पण कळला पाहिजे. नाहीतर तुम्ही कसे समजावून सांगणार? तर आपल्याला कृष्ण भावनामृताचा प्रसार करायचा आहे. स्वतःला तयार करा कृष्ण उपदेश चांगल्या रीतीने परत सांगण्यासाठी आणि त्यात काहीही चुकीचे अर्थ न लावता. मग भविष्यात.. जसे आता आपण १० हजार लोक आहोत. नंतर आपण १०० हजार पर्यंत वाढू. त्याची आवशकता आहे. नंतर १०० हजाराचे १० लाख. आणि १० लाखाचे १ करोड. सगळे भक्त: हरी बोल! जय! अश्या रीतीने आचार्यांची चणचण राहणार नाही. आणि लोकं अगदी सोप्या पद्ध्तीने कृष्ण भावनामृताला समजू शकतील. म्हणुन एक संस्था तयार करा. खोट्या फुशारक्या मारू नका. आचार्यांनी सुचवलेल्या मार्गाचा आणि उपदेशाचे पालन करा. आणि स्वतःला निष्कलंक आणि परिपक्व बनवा. मग 'माया'ला पराभूत करणे शक्य होईल. हो, आचार्यांनी माया विरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे