MR/Prabhupada 0003 - माणूस देखील एक स्त्री आहे



Lecture on SB 6.1.64-65 -- Vrndavana, September 1, 1975

तामेव तोषयामास पित्र्य॓णार्थेन यावता | ग्राम्यैर्मनोरमैः कामैः प्रसीदेत यथा तथा त्यामुळे स्त्रीला पाहून झाल्यानंतर, तो नेहमी ध्यानस्थ बसायचा, चोवीस तास, विषयाधिन , कामुक इच्छा. कामैस्तैस्तैर्ह्रतज्ञानाः (भ.गी.७.२०). जेव्हा मनुष्य वासनेच्या आधीन होतो तेव्हा त्याची बुद्धी नष्ट होते. संपूर्ण जग ह्या कामवासनेवर आधरलेल आहे हे भौतिक जगत आहे. आणि कारण मी कामांध आहे, तुम्ही कामांध आहात, आमच्या पैकी प्रत्येक जण, ज्याप्रमाणे माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, नंतर मी आपला शत्रू होतो, आपण माझे शत्रू होतात. मी तुमची चांगली प्रगती झालेली बघू शकत नाही तुम्ही माझी चांगली प्रगती झालेली बघू शकत नाही हेच भौतिक जगत आहे - ईर्षा, काम वासना, काम क्रोध, लोभ, मद, मत्सरी. हे या भौतिक जगाचा आधार आहे. त्यामुळे तो बनला.... प्रशिक्षण असे होते की त्याला एक ब्राह्मण बनण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. शमो , दम​ , पण प्रगती थांबली. स्रीच्या नादी लागल्यामुळे. त्यामुळे वैदिक संस्कृती नुसार, स्त्री अध्यात्मिक सुधारणा करण्यात अडथळा म्हणून स्वीकारले आहे. संपूर्ण मूळ संस्कृती ही कसे टाळावे.. स्री.... तुम्ही असे समजू नका की एक स्री ही स्री आहे. पुरूष सुद्धा स्त्रिच आहे. असे समजू नका की स्त्रीची निंदा केली आहे आणि पुरुषाची नाही स्री म्हणजे उपभोगी, आणि पुरूष म्हणजे उपभोक्ता. तर ही भावना निंदास्पद आहे. जर मी एका स्रीला उपभोगण्याच्या दृष्टीने बघितले, तर मी पुरूष आहे. आणि जर स्रीने सुद्धा पुरुषाला उपभोगण्याच्या दृष्टीने बघितले, तर ती सुद्धा पुरुषच. स्री म्हणजे उपभोगी आणि पुरूष म्हणजे उपभोक्ता. तर ज्या कोणाला भोगण्याची भावना आहे, त्याला पुरूष म्हणून मानले जाते. तर इथे दोन्ही लिंगांचा अर्थ म्हणजे.... प्रत्येकजण नियोजन करत आहे, "मी कसा आनंद लूटू" ? म्हणूनच तो पुरूष, क्रुत्रिम प्रकारे. अन्यथा, मूळ रूपात, आपण सगळे प्रकृती आहोत, जीव, स्त्री किंवा पुरूष. या बाह्य वेषभूषा आहे.