MR/Prabhupada 0015 - मी हे शरीर नाही



Lecture on BG 9.34 -- New York, December 26, 1966

सहा प्रकारची लक्षणे प्रस्तुत आहेत, आत्म्याची उपस्तिति ची. विकास हा महत्वपूर्ण मध्ये एक आहे. म्हणून विकास. आत्मा शरीराच्या बाहेर गेल्यानंतर त्वरित, आणखी विकास नाही. जर मूल मृत जन्मले, अरे बापरे, तिथे विकास नाही आहे. अरे बापरे, पालक म्हणतील ते निरुपयोगी आहे. फेकून द्या. मग त्याचप्रमाणे, श्रीकृष्णांनी अर्जुनाला पहिले उदाहरण दिले की, "असा विचार करू नको की जी अध्यात्मिक ठिणगी शरीरात आहे, ज्याच्या उपस्तिति मुळे, शरीर बालपणापासून ते तरुणपणापर्यंत वाढते, तरूणपण ते यौवन, यौवन ते म्हातारपण. तर म्हणून, जेव्हा हे शरीर निरुपयोगी होईल, आपल्या नकळत, आत्मा हे शरीर सोडून जाते." वासांसि जीर्णानि यथा विहाय (भ.गी.२.२२). ज्या प्रमाणे आपण जुने कपडे काढतो आणि दुसरे नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे, आम्ही दुसरे शरीर स्वीकारतो. आणि आपण दुसरे शरीर स्वीकारले आहे ते आपल्या निवडी नुसार नाही. आणि ती निवड निसर्गाच्या नियमावर अवलंबुन असते. आणि ती निवड निसर्गाच्या नियमावर अवलंबुन असते. आपण मृत्यूच्या वेळी म्हणू शकत नाही, परंतु आपण विचार करू शकता. तुम्ही म्हणू शकता, मला असे म्हणायचे आहे, स्वतंत्र व्यक्तीत्व व निवड सर्व आहे. यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् (भ.गी.८.६). फक्त, तुमच्या मृत्यूच्या वेळी, तुमच्या मानसिकतेचे, जसे तुमचे विचार विकसित होतील, तुम्हाला त्या शरीरा नुसार पुढचा जन्म मिळेल. तर बुद्धिमान मनुष्य, जो वेडा नाही, त्याला हे समजलेच पाहिजे की मी म्हणजे हे शरीर नाही. पहिली गोष्ट. मी हे शरीर नाही. मग त्याला कळेल की त्याचे कर्तव्य काय आहे? बापरे, एक चैतन्य आत्मा म्हणून, त्याचे कर्तव्य काय आहे? त्याचे कर्तव्य आहे, ते भगवद गीते मध्ये नमूद केलेले आहे नवव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात, ते कर्तव्य आहे मन्मना भव. तुम्ही काहीतरी विचार करीत असता. आपल्या पैकी प्रत्येक जण, मूर्त स्वरुप देऊन, आपण काहीतरी विचार करतो. विचार न करता, एक ही क्षण, आपण राहू शकत नाही. हे शक्य नाही. तर हे कर्तव्य आहे. तुम्ही श्रीकृष्णाचे ध्यान करा. तुम्ही श्रीकृष्णाचे ध्यान करा. तुम्हाला काहीतरी विचार करावा लागेल. जर आपण श्रीकृष्णाचा विचार केलात तर हानी काय आहे? श्रीकृष्णा कडे बरेच उपक्रम आहेत, बरेच काही साहित्य , आणि बर्‍याच काही गोष्टी. श्रीकृष्ण इथे येतात. आमच्या कडे भरपुर मात्रामध्ये पुस्तकांचे खंड आहेत. जर आपण श्रीकृष्णांचा विचार करू इच्छित असल्यास, आम्ही आपल्याला अनेक साहित्याचा पुरवठा करू शकतो जरी आपण चोवीस तास वाचले तरी आपण आपल्या संपूर्ण जीवनात समाप्त शकत नाहीत. तर श्रीकृष्णाचे ध्यान करा, ते पुरेसे आहे. श्रीकृष्णाचे ध्यान करा. मन्मना भव. अरे बापरे, मी तुमचे ध्यान करू शकतो. जसा एक माणूस आपल्या मालकाची सेवा करतो. अरे, तो नेहमी आपल्या त्या मालकाचा विचार करीत असतो. अरे, मला तिथे नऊ वाजता हजर राहीले पाहिजे आणि तो मालक नाराज होईल. तो कुठल्या तरी हेतूने विचार करीत आहे. त्या प्रकारची विचारधारा चालणार नाही. नंतर म्हणून ते म्हणतात, भव मद्भक्तः "तुम्ही प्रेमाने माझा सतत विचार करा." जेव्हा गुरू, जेव्हा, मला असे म्हणायचे, जेव्हा नोकर आपल्या मालकाचा विचार करतो, तिथे प्रेम नाही आहे. तो पाउंड-शिलिंग-पेनी चा विचार करतो आहे. कारण, जर मी माझ्या कार्यालयात उपस्तित राहिलो नाही, बरोबर नऊ वाजता, अरे बापरे, तेथे उशीर होईल, आणि मला दोन डॉलर्स गमवावे लागतील." त्यामुळे तो विचार करत आहे, मालकाचा नव्हे, तो विचार करत आहे त्या पाउंड-शिलिंग-पेनी चा. तर त्या पध्हतिचा विचार तुम्हाला वाचवू शकत नाही. म्हणून ते म्हणतात, भव मद्भक्तः "तुम्ही फक्त माझे भक्त बना. मग तुमचे माझ्या बद्धलचे विचार चांगले होतील." आणि ती भक्ति काय आहे? मद्भक्तः . भक्तीपर ... भक्ती म्हणजे सेवा. मद्याजी . तुम्ही श्रीकृष्णाला काहीतरी सेवा समर्पित करा. ज्या प्रकारे आम्ही इथे नेहमी गुंतलेलो असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही याल तुम्ही आम्हाला कुठल्यातरी कार्यात गुंतलेलो दिसणार. त्यामुळे आम्ही काही कर्तव्यांचे निर्माण केले आहे. फक्त श्रीकृष्णाचा विचार करण्याचा.