MR/Prabhupada 0022 - कृष्णा भुकेले नाही



Lecture on SB 1.8.18 -- Chicago, July 4, 1974

श्रीकृष्ण म्हणतात, "माझे भक्त, आपुलकीने," योमेभक्त्या प्रयच्छति. श्रीकृष्ण भुकेलेले नाही. श्री कृष्ण भुकेलेले आहेत म्हणून तुम्ही अर्पण केलेले स्वीकारण्यासाठी तुमच्याकडे आलेले नाहीत. नाही. ते भुकेलेले नाहीत. तो आत्म्-संपूर्ण आहे, आणि अध्यात्मिक जगा मध्ये त्याची सेवा होत असते लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्यमानम. त्याची सेवा सहस्र लक्ष्म्या करीत असतात. पण कृष्ण फार कृपाळू आहे, कारण जर का तुम्ही श्रीकृष्णाचे खरोखर प्रियकर आहात, तर तो इथे आहे ते तुमचे पत्रं पुष्‍पं ग्रहण करण्यासाठी. जरी तुम्ही गरीबातले गरीब असाल, तरीही तो तुम्ही जे काही गोळा केलेले स्वीकार करेल. एक छोटेसे पान, थोडेसे पाणी, एक छोटेसे फूल. जगाच्या कुठल्याही भागातून कोणीही ते मिळवून श्रीकृष्णाला अर्पण करू शकतील. "कृष्ण, माझ्याकडे तुला देण्या साठी काहीही नाही, मी फार गरीब आहे. कृपा करून हे स्वीकार कर." कृष्ण ते स्वीकार करतील. कृष्ण म्हणतात, तद अहं श्रणामी, "मी खातो". तर मुख्य गोष्ट आहे भक्ति, जिव्हाळा, प्रेम. तर इथे म्हणलेल आहे, आलक्ष्म. कृष्ण अद्र्श्य आहेत. देव अद्र्श्य आहेत. पण ते इतके दयाळू आहेत की ते आपल्या समोर आलेले आहेत, आपल्या भौतिक दृष्टीला दिसण्या साठी. श्रीकृष्ण ह्या भौतिक जगतेला, आपल्या भौतिक दृष्टीला अद्र्श्य आहेत. अगदी श्रीकृष्णाच्या अंशा सारखे. आम्ही श्रीकृष्णचे अंश आहोत, आम्ही सर्व जिवात्मा, पण आम्ही एकमेकांना बघू शकत नाही. तुम्ही मला बघू शकत नाही, मी तुम्हाला बघू शकत नाही. "नाही, मला तुम्ही दिसत आहात." तुम्हाला काय दिसत आहे? तुम्हाला माझे शरीर दिसत आहे. मग, शरीरातील आत्मा निघून गेल्यावर तुम्ही का रडत आहात, "माझे वडील गेले?" वडील का गेले? वडील तर इथे पडलेले आहेत. मग आपण काय पाहत होता? तुम्ही जे पाहत होता ते तुमच्या वडिलांच्या शरीराला, तुमच्या वडिलांना नाही. जर तुम्ही श्रीकृष्णाच्या एका अंशाला, एका आत्म्याला पाहु शकत नाही तर श्रीकृष्णाला कसे बरे पाहु शकाल? अतह.श्रीकृष्ण नामदी ना भावेद ग्राह्यं इन्द्रियैहि (CC मध्य १७.१३६) ह्या बोथट इँद्रीयांनी त्याला श्रीकृष्ण दिसत नाही आणि श्रीकृष्णाच नावही ऐकू येत नाही, नामादी. नाम म्हणजे नाव. नाम म्हणजे नाव, रूप, गुण, लीला. ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बोथट डोळ्यांनी किंवा इँद्रीयांनी समझणार नाही. पण जर त्यांची शुद्धी झाली, सेवोन मुखे ही जीव्हादौ, भक्तीच्या मार्गाने जर त्यांचे शुद्धिकरण झाले तर तुम्ही श्रीकृष्णाला सारखे सर्वत्र पाहु शकाल. पण साधारण माणसाला अलक्ष्यम, दिसत नाही. श्रीकृष्ण सर्वत्र आहेत. भगवंत सर्वत्र आहेत. अंडांतरस्त परमाणूचयांतरस्तम. तर अलक्ष्याम सर्वा भूतानां. जरी श्रीकृष्ण बाहेर आणि अंतरात दोन्ही कडे आहेत, तरीही आपल्याला श्रीकृष्ण दिसत नाहीत जोपर्यंत आम्ही श्रीकृष्णाला बघण्या योग्य डोळे मिळवू. तर ही कृष्ण प्रज्ञेची चळवळ आपल्याला डोळे उघडून श्रीकृष्णाला कसे पाहायचे ह्या साठी आहे. आणि जर आपण श्रीकृष्णाला पाहु शकाल, अंतर बाहिर, तर आपल जीवन सार्थक होईल. त्यामुळे शास्त्रात म्हटालेले आहे, अंतर बाहिर. अंतर बाहिर यादी हरिस तपासा ततः किं नांतर बाहिर यादी हरिस तपसा ततः किं सर्वा जण परिपूर्ण व्हायला बघतात पण परिपूर्णता म्हणजे जेंव्हा आपल्याला अंतरात आणि बाहेर श्रीकृष्ण दिसतील. ती आहे परिपुर्णता.