MR/Prabhupada 0026 - कृष्णा आहे जेथे आपण विश्वाची हस्तांतरित सर्व प्रथम आहेत



Morning Walk -- October 5, 1975, Mauritius

भारतीय अतिथी: स्वामीजी असं म्हणतात कि आपण जशी कर्म करतो तसा आपला पुनर्जन्म असेल.. तर मग आपण जर का काही कर्म केली असतील तर मग भगवंतांच्या नियमां प्रमाणे आपल्याला पुनर्जन्म घ्यावाच लागेल.. प्रभुपाद: तुम्हाला जन्म घ्यावाच लागेल... ते तुम्हाला टाळता येणार नाही... हेच सत्य आहे.. पण तुम्हाला तुमच्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागेल.. भारतीय व्यक्ती: पण मग... ह्याचा अर्थ असा होतो कि तुम्ही जे केलं आहे त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागतील. बरोबर? तुम्हाला असं वाटतं का कि.. प्रभुपाद: समजा तुमचा हा शर्ट फाटला, तुम्हाला एक नवीन शर्ट विकत घ्यावा लागेल... आता, तुम्ही जशी किंमत चुकती कराल तसा शर्ट तुम्हाला मिळेल.. जर तुम्ही चांगली किंमत दिली तर तुम्हाला चांगला शर्ट मिळेल... तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला खराब शर्ट मिळेल.. तसंच आहे.. भारतीय व्यक्ती: मला तेच म्हणायचं आहे... स्वामीजी नर्क सुद्धा ह्याच जगात स्थित आहे... तर मग तुम्हाला काय वाटतं कि आपल्या कर्मांची किंमत आपण कुठे चुकती करतो? आपल्या पापांची किंमत... तुम्हाला काय वाटतं कि आपण ती कुठे चुकती करतो? नरकात, जे कि... प्रभुपाद: नरकात तुम्हाला तुमच्या कर्मांसाठी शिक्षा मिळते.. भारतीय व्यक्ती: म्हणूनच ते नर्क ह्या पृथ्वीवरच आहे... प्रभुपाद: पृथ्वीवर कसं? भारतीय व्यक्ती: पृथ्वीवर नाही? प्रभुपाद: नाही... तसं हि असू शकतं.. भारतीय व्यक्ती: कुठल्याही ग्रहावर?? प्रभुपाद: करोडो मैल दूर... भारतीय व्यक्ती: पण हे इथे स्थित नाही आहे.. नर्क फक्त एका ठिकाणी स्थित आहे का ते अन्यत्र हे स्थित आहे? तुम्हाला असं वाटतं स्वामीजी?? प्रभुपाद: हो.. अनेक वेगवेगळे ग्रह आहेत.. भारतीय व्यक्ती: अनेक लोकं ह्याच जगात दुखं भोगतायेत.. प्रभुपाद: सर्व प्रथम त्यांना नार्कांमध्ये दुख भोगण्याचा सराव करावा लागतो आणि मग ते इथे तसाच जीवन जगायला येतात... भारतीय व्यक्ती: जेव्हा आपला आत्मा ह्या शरीरातून बाहेर पडतो, तेव्हा तो नरकात जतो कि.. प्रभुपाद: नरक-लोकांमध्ये.. भारतीय व्यक्ती: नरक लोकांमध्ये कि तो लगेचच पुनर्जन्म घेतो? प्रभुपाद: हो.. जे पापी आहेत ते लगेचच जन्म घेत नाहीत.. त्यांना सर्व प्रथम नार्कांमध्ये दुख भोगण्याचा सराव करावा लागतो.. ...सवय होण्यासाठी आणि मग ते पृथ्वीवर जन्म घेतात दुख भोगण्यासाठी.. जसं कि तुम्ही IAS उत्तीर्ण झालात... तुम्ही प्रथम magistrate ला सहाय्यक बनता आणि त्यांच्या हाताखाली शकता.. त्यानंतर तुम्ही magistrate बनता.. जरी तुम्ही भग्वद्धामात जाण्यास पात्र असाल, तरी तुम्हाला प्रथम त्या ठिकाणी पाठवलं जातं... ... जेथे श्रीकृष्ण आत्ता लीला करीत आहेत, आणि तेथे तुम्हाला सवय होते... त्यानंतर तुम्हाला भग्वद्धामात पाठवला जातं... भारतीय व्यक्ती: म्हणून आपल्या मृत्यू नंतर... प्रभुपाद: भगवंतांची प्रत्येक योजना परिपूर्ण आहे.. पूर्णं.. पूर्णं अधः पूर्णं इदं पूर्णात पूर्णं... (इशोपनिषद) भगवंतांची सृष्टी परिपूर्ण आहे..