MR/Prabhupada 0052 - भक्त आणि कर्मी यांच्यातला फरक



Lecture on SB 1.2.9-10 -- Delhi, November 14, 1973

हा भक्ति आणि कर्म यांच्यातील फरक आहे. कर्म इन्द्रिय संतुष्टि आहे , आणि भक्ति आहे भगवंताला संतुष्ट करणे . एकच गोष्ट आहे म्हणून लोक भक्त आणि कर्मीमध्ये काय फरक आहे हे समजू शकत नाही. कर्मी स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करतो , आणि भक्त कृष्णाच्या संवेदनांना संतुष्ट करतो . काही संवेदना तृप्ति असणे आवश्यक आहे. पण जेव्हा तुम्ही कृष्णाला संतुष्ट करता , त्याला भक्ती म्हणतात . हृषीकेण हृषीकेश-सेवनं भक्तिर् उच्यते (सी सी मध्य १९।१७० ) हृषीक म्हणजे इंद्रिये , शुद्ध इंद्रिये . मी त्या दिवशी समजावून सांगितल होतं की,

सर्वपाधि-विनिर्मुक्तं तत्-परत्वेन निर्मलम्
हृषीकेण हृषीकेश-सेवनं भक्तिर् उच्यते (सी सी मध्य १९।१७० )


भक्ति चा अर्थ हा नाही कि तुम्ही तुमचे काम थांबवा . भक्ति म्हणजे भावनिक कट्टरता नव्हे. ती भक्ति नाही. भक्ति म्हणजे तुमच्या सर्व इंद्रियांना त्याच्या संतुष्टीसाठी गुंतवणे जो इंद्रीयांचा स्वामी आहे त्याला म्हणतात भक्ति . म्हणून कृष्णाचे नाव आहे हृषीकेश . हृषीक चा अर्थ आहे इन्द्रिये . आणि हृषीक ईश, तो इंद्रियांचा नियंत्रक आहे . वास्तविक, आपली इंद्रिये स्वतंत्रपणे काम करीत नाहीत. आपण ते समजू शकतो. कृष्ण त्यांचे नियंत्रण करत आहे.

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो
मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च (भ गी १५।१५ )

मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च . एक शास्त्रज्ञ कार्यरत आहे कारण कृष्ण त्याला मदत करत आहे, तो स्वतंत्रपणे काम नाही करीत आहे . ते शक्य नाही. पण त्याला तसे पाहिजे होते . त्यामुळे कृष्ण त्याला सुविधा देत आहे . पण वास्तविक ,कृष्णच काम करीत आहे. हे उपनिषदांमध्ये स्पष्ट केले आहे. कृष्णाने काम केल्याषिवाय , पाहिल्याशिवाय , कृष्णाने पाहिल्याशिवाय आपण पाहू शकत नाही. जसे ब्रह्मा-संहितामध्ये सुर्यप्रकाशाबद्द्ल समजावले आहे . यच्चक्षुरेष सविता सकलग्रहाणां । सूर्य कृष्णाच्या डोळ्यांपैकी एक आहे .

यच्चक्षुरेष सविता सकलग्रहाणां राजा समस्तसुरमूर्तिरशेषतेजा:
यस्याज्ञया भ्रमति सम्भृतकालचक्रो गोविन्दमादि पुरुषं तमहं भजामि (ब्र. स. ५।५२)


म्हणूनच सूर्य जो कृष्णाच्या डोळयांपैकी एक आहे, सूर्य उगवतो म्हणून , सूर्य पहात आहे म्हणून , म्हणूनच आपण पाहत आहोत. आपण स्वतंत्रपणे पाहू शकत नाही आपल्याला आपल्या डोळ्यांचा खूप अभिमान आहे , जर सूर्य प्रकाश नसेल तर आपल्या डोळ्यांचे मूल्य काय आहे? आपण पाहू शकत नाही. ही वीज देखील सूर्यापासून प्राप्त केलेली आहे. तर प्रत्यक्षात जेव्हा कृष्ण पाहतो तेव्हा आपण पाहू शकता. ते स्थान आहे . तर आपली इंद्रिये ... भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे , सर्वत: पाणि पादं तत् (भ. गी. १३।१४) सर्वत: पाणि पाद ... सर्वत्र कृष्णाचे हात आणि पाय आहेत . ते काय आहे? माझे हात,तुमचे हात आणि पाय - ते कृष्णाचे आहे . ज्याप्रमाणे कोणी म्हणतो की माझ्या जगभरात शाखा आहेत . तर त्या शाखा सर्वोच्च व्यक्तीच्या व्यवस्थापनावर काम करत आहेत. त्याचप्रमाणे कृष्ण सुद्धा . म्हणून कृष्णाला हृषीकेश म्हंटले जाते , हृषीकेश . तर व्यवसाय आहे ...


भक्ती, म्हणजे जेव्हा आपण आपली हृषीके , इंद्रिये , भावना गुंतवाल , इंद्रियांच्या मालकाच्या सेवेमध्ये . तेच आपले परिपूर्ण जीवन आहे. तेच आपले आदर्श जीवन आहे . परंतु जेव्हा आपण आपल्या इंद्रियांचा वापर इंद्रिय तृप्ती साठी करण्याची इच्छा बाळगतो, त्याला म्हणतात कर्म . त्याला म्हणतात भौतिक जीवन . म्हणूनच, भक्तासाठी काहीही भौतिक नाही. हे आहे ईशावास्यं इदं सर्वं (ईशो १) . भक्त पाहतात की सर्वकाही कृष्णाच्या मालकीचे आहे.

ईशावास्यं इदं सर्वं यत् किन्च जगतयां जगत, तेन त्यक्तेन भुन्जिथा| (ISO 1)

सर्वकाही कृष्णाच्या मालकीचे आहे. म्हणूनच कृष्ण जे काही आपल्याला देतो ... जसे एक मालक . मालक आपल्या सेवकाला काही वाटप करतो , "आपण त्याचा आनंद घेऊ शकता." तो प्रसाद आहे .

प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्योपजा (भ गी २।६५ )...


हेच जीवन आहे. जर तुम्ही कृष्ण भावनेत जागृत झालात , जर तुम्ही समजू शकाल कि " सर्व काही कृष्णाच्याच मालकीचे आहे , माझे हात आणि पायसुद्धा सुद्धा , ते कृष्णाच्या मालकीचे आहेत , माझ्या शरीराचा प्रत्येक भाग कृष्णाच्या मालकीचा आहे. मग त्यांचा वापर कृष्णासाठी झाला पाहिजे , " त्याला म्हणतात भक्ति .

अन्याभिलाषिताशून्यं ज्ञानकर्माद्यनावृतं
अानुकूल्येन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा (भ र सि १।१।११)

ते कृष्णाने केले , नाही, अर्जुनाने केले . युद्ध न करून त्याला त्याच्या भावनांना समाधानी करायचे होते पण तो भगवद - गीता ऐकल्यावर सहमत झला , " हो . कृष्ण हाच परम पुरुष आहे .

अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्वं प्रवर्तते
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता:(भ गी १०।८ )


या गोष्टी भगवद गीतेत खूप चांगल्या रीतीने समजावल्या आहेत . अध्यात्मिक जीवनाचा तो प्रारंभिक अभ्यास आहे आणि जर आपण भगवद्गीतेच्या शिकवणुकींवर विश्वास ठेवला , तर आपण कृष्णाला शरण जातो. ती कृष्णाची इच्छा आहे .

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ गी १८।६६) . त्याला हे हवे आहे .

जेव्हा आपण प्रत्यक्षात या प्रक्रियेला सामोरे जातो, तेव्हा यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धा. कविराज गोस्वमिद्वारे ते समजावले गेले आहे , श्रद्धेचा अर्थ काय आहे .