MR/Prabhupada 0054 - सर्व कृष्णाला फक्त त्रास देत आहेत
म्हणून मायावादिंना हे सिद्ध करायचंय की अंतिम सत्य निराकार आहे. कृष्ण तुम्हाला तशी बुद्धी देतो. "हो, तुम्ही हे सिद्ध करा. ते तर्कशास्त्र सिद्ध करा,हे तर्कशास्त्र, ते तर्कशास्त्र." त्याचप्रमाणे,कृष्ण देतो... अशी एक बंगाली प्रसिद्ध म्हण आहे की देव कार्य करतो की एक माणूस, गृहस्थ देवाकडे प्रार्थना करतो, "हे प्रभू,आजच्या रात्री माझ्या घरी कोणतीही चोरी, घरफोडी न होवो, कृपया मला वाचवा." एक माणूस प्रार्थना करत होतो, तो अशी प्रार्थना करत होता. दुसरा माणूस प्रार्थना करत होता,जो चोर होता,"हे प्रभू, आजच्या रात्री त्या घरी घरफोडी करीन. कृपया मला काहीतरी मिळवून द्यायला मदत करा. आता,कृष्णाची परिस्थिती काय होईल? (हशा) कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात आहे.कृष्णाला प्रत्येकाच्या प्रार्थनेची दखल घ्यायची आहे. चोर आणि गृहस्थ, अनेक प्रार्थना म्हणून कृष्ण योजना आखतो... पण तो अजूनही... ती कृष्णाची हुशारी,तो कसा समायोजन करतो.
तो प्रत्येकाला स्वतंत्र देतो. आणि प्रत्येकाला सुविधा देतो, पण तरीही तो दुःखी आहे. म्हणून कृष्ण भक्तांना सल्ला देतो की "कोणतीही योजना आखू नका. तुम्ही मूर्ख माणसं, मला त्रास देऊ नका. (हशा)कृपया मला शरण या. माझ्या योजने प्रमाणे वागा, तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही योजना आखता आणि, दुःखी होता,मीही दुःखी होतो (हशा ) मी पण दुःखी होतो. रोज वेगवेगळ्या योजना येतात, आणि मला त्या पुऱ्या कराव्या लागतील." पण तो कृपाळू आहे. जर...
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्त... (भ गी ४।११). म्हणून कृष्णभक्तांशिवाय,बाकीचे सगळे कृष्णाला त्रास,त्रास,त्रास देतात. म्हणून, त्यांना दुष्कृतीन म्हणतात. दुष्कृतीन, म्हणजे दुराचारी. कुठल्याही योजना आखू नका. कृष्णाच्या योजनांचा स्वीकार करा. ते फक्त कृष्णाला त्रासदायक आहे. म्हणुन, भक्त कधीही त्याच्या उदरनिर्वाह्यासाठी पण प्रार्थना करत नाही,तो खरा शुद्ध भक्त. तो कृष्णाला त्रास देत नाही त्याच्या स्वतःच्या देखभालीसाठी पण नाही. जर तो कफल्लक असला ,तो दुःखी असेल, त्याची उपासमार होत असेल, तरी,तो कृष्णाकडे काही मागणार नाही. "कृष्णा मी उपाशी आहे. मला थोडं अन्न दे." अर्थातच,कृष्ण त्याच्या भक्ताच्याबाबतीत सतर्क असतो,,परंतु भक्ताचे तत्त्व असते कृष्णाकडे काही मागायचे नाही. कृष्णाला काहीही करू दे. आपण फक्त कृष्णाच्या इच्छेनुसार वागायचे. म्हणून आपल्या काय योजना? आपल्या योजना,कृष्णांनी सांगितलंय
- सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं (भ गी १८।६६ ).
- मन्मना भव मद्भत्को मद्याजी (भ गी १८।६५ ),
म्हणून आपण फक्त तेच करत आहोत. आपण फक्त कृष्णाचा प्रचार करत आहोत., की "तुम्ही कृष्णभावनाभावित बना." आपण आपल्या उदाहरणावरुन दाखवले पाहिजे,कसे आम्ही कृष्णभावनाभावित आहोत. आम्ही कृष्णाची कशी उपासना करतो, कसे आम्ही रस्त्यावर जाऊन कृष्णाच्या दिव्य नामाचा गजर करतो. आता आम्ही कृष्णप्रसाद वाटतो. जेव्हढे शक्य आहे तेव्हढे,आमचं काम लोकांना कृष्णभावनाभावित बनण्यासाठी प्रेरित करणे. एव्हढेच. त्या कारणासाठी,तुम्ही योजना आखा,कारण ती कृष्णाची योजना आहे. परंतु ती सुद्धा कृष्णाने मंजूर केली पाहिजे.तुमच्या स्वतःच्या योजना आखू नका. म्हणून, तुम्हाला मार्गदर्शन करायला,कृष्णाचे प्रतिनिधी पाहिजेत. ते म्हणजे गुरु. म्हणून मोठं मोठया योजना आहेत. म्हणून आपण महाजनांच्या पावलांचे अनुसरण केले पाहिजे. जे इथे नमूद केलंय, की
- द्वादशैते विजानीमो धर्मं भागवतं भटा: (श्री भा ६।३।२१ )
तो म्हणाला की "आम्ही,निवडक महाजन,कृष्णाचे प्रतिनिधी, आम्हाला माहित आहे भागवत धर्म काय,कृष्ण धर्म काय." द्वादशै. द्वादशै म्हणजे बारा नाव,आधी उल्लेख केलेली:
स्वयम्भू नारद शम्भू...(श्री भा ६।३।२० ) . मी सांगितले आहे. यमराज म्हणाले,"फक्त आम्ही,बाराजण, कृष्णाचे प्रतिनिधी, आम्हाला माहित आहे भागवत धर्म म्हणजे काय " द्वादशैते विजानीमो.विजानीमो म्हणजे "आम्हाला माहित आहे." धर्मं भागवतं भटा:,गुह्यं विशुद्ध दुर्बोधं यं ज्ञात्वामृतमष्णुते (श्री भा ६।३।२१ ), "आम्हाला माहित आहे." म्हणून असा सल्ला दिलाय,महाजनो
- येन गत: स पंथा: (चै च मध्य १७।१८६ )
हे महाजन,त्यांनी संगीतल्याप्रमाणे,कृष्णाला समजुन घेण्याचा वास्तविक मार्ग, किंवा अध्यात्मिक मोक्ष. म्हणून आम्ही ब्रम्ह-संप्रदाय मानतो ,पहिला,स्वयंभु, ब्रम्हा. ब्रम्हा,नंतर नारद,नारद नंतर,व्यासदेव. ह्यामध्ये,मध्वाचार्य,श्री चैतन्य महाप्रभु, ह्या प्रमाणे. म्हणून आता,कारण आपण त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करत आहोत. श्री भक्तीसिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपदांच्या, तर हे आहे, आज त्याचा अविर्भाव दिवस आहे. म्हणून आपण हि तिथी आदरपूर्वक पाळली पाहिजे आणि भक्तीसिद्धान्त सरस्वती गोस्वामींना प्रार्थना केली पाहिजे की "आम्हाला तुमच्या सेवेत गुंतवा. आम्हाला ताकद दया आम्हाला बुद्धी दया आणि आम्हाला तुमच्या सेवकांकडून मार्गदर्शन मिळू दे." अशा पद्धतीने आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि मला वाटत संध्याकाळी आपण प्रसाद वाटप करु.