MR/Prabhupada 0062 - चौवीस तास कृष्णाला पहा



Lecture on SB 1.8.18 -- Chicago, July 4, 1974


प्रभुपाद: अाराधितो यदि हरिस तपसा तत: किं (नारद पंचरात्र) । जर तुम्ही कृष्णाची पूजा करण्यात सक्षम आहात तर इतर कोणतीही तपस्या करण्याची गरज नाही ... कारण स्वतःला किंवा परमेश्वराला जाणून घेण्यासाठी अनेक प्रक्रिया , तपस्या आहेत . काही वेळा आपण वनामध्ये जातो , हे बघण्यासाठी कि देव कुठे आहे ... तर विविध प्रक्रिया आहेत , पण शास्त्र सांगते कि जर तुम्ही कृष्णाला पूजत असाल , अाराधितो यदि हरिस तपसा तत: किं, तर तुम्हाला गंभीर तपस्या आणि तप करण्याची आवश्यकता नाही .

आणि नाराधितो, नाराधितो यदि हरिस तपसा तत: किं (नारद पंचरात्र), आणि शेवटी कठीण तपश्चर्या आणि तप केल्यावर , जर , जर तुम्ही कृष्णाला जणू शकला नाहीत , तर त्याचा काय उपयोग आहे ? ते व्यर्थ आहे . नाराधितो यदि हरिस तपसा तत: किं, अंतर बहिर यदि हरिस तपसा तत: किं . त्याचप्रमाणे , जर तुम्ही चौवीस तास कृष्णाला अंतर्मंनात तसेच बाहेर पाहू शकलात , तर तो सर्व तपस्यांचा अंत आहे . तर इथे कृष्ण पुन्हा सांगतो , कुंती म्हणते कि , " जरी कृष्ण आत आणि बाहेर आहे , आमच्याकडे ते पाहण्याची दृष्टी नसल्याने " अल्क्ष्यं , "अदृश्य " जसे इथे कुरुक्षेत्रच्या युद्धात कृष्ण उपस्थित होता , फक्त पाच पांडव , जसे आणि त्यांची आई कुंती , ते समजू शकले कि कृष्ण परम परुष परमेश्वर आहेत . आणि काही इतर जण .

तर जरी कृष्ण तिथे उपस्थित होता , काही लोकं त्याला साधारण मनुष्य समजत होते . अवजा...,

अवजानन्ति मां मूढा मानुषिं तनुमाश्रितम् (भ गी ९।११ )

तो मनुष्यांसाठी खूप दयाळू असल्याकारणाने स्वतः इथे आला . तरी , त्यांना त्याला पाहण्याची दृष्टी नसल्याकारणाने ते पाहू शकले नाहीत . म्हणून कुंती म्हणते , अल्क्ष्यं , " तू दिसत नाहीस , जरी तू आहेस : अंत: बहि: सर्व भूतानाम् ।" असे नाही कि फक्त भक्तांच्या अंत: बहि : - सर्वांच्या . प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण स्थित आहे ,

ईष्वर: सर्वभूतानां हृद्देशे (भ गी १८।६१ )

निर्देशून , हृद्देशे , इथे हृदयात , कृष्ण आहे . आता , म्हणून कृष्णाला हृदयात कसे शोधावे यासाठी ध्यान , योग सिद्धांत आहेत . त्याला म्हणतात ध्यान . तर कृष्णाची स्थिती नेहमी दिव्य असते . जर आपण हि दिव्य प्रक्रिया , कृष्ण भावना स्वीकार करतो , विधि विधान , आणि पापयुक्त जीवनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो . कारण जोपर्यंत तुम्ही पाप कार्य करत आहात , तुम्ही कृष्णाला पाहू किंवा समजू शकत नाहीत तेव्हा ते शक्य नाही .

न मां दुष्कृतिनो मूढा: प्रपद्यन्ते नराधमा: (भ गी ७।१५ )

ते जे दुष्कृतिन: आहेत .. कृति चा अर्थ आहे गुणवत्ता , गुणवान . पण दुष्कृती , पण गुणवत्ता पाप कार्यांमध्ये वापरली आहे . म्हणून आपण विनंती करतो .. आपल्याला विनंती करण्याची गरज नाही , हा आपला , मला म्हणायचं नियम आणि शिस्त आहे कि कि प्रत्येकाने पापयुक्त कार्यांपासून मुक्त राहावे . पापयुक्त कामे , पापयुक्त कामांचे चार खांब आहेत , अवैध संभोग , मांस खाणे , नशा करणे आणि जुगार . म्हणून आपल्या विध्यार्थ्यांना सल्ला दिला जाते ...सल्ला नाही त्यांनी ते पाळलेच पाहिजे नाहीतर त्यांचे पतन होईल . कारण पापी मनुष्य भगवंताला समजू नाही शकत . एका बाजूला आपण आपले नियम आणि भक्ति प्रक्रियेचा अभ्यास केला पाहिजे , आणि दुसर्या बाजूला आपण पापयुक्त कर्मे टाळली पाहिजेत . मग कृष्ण हजर आहे , आणि तुम्ही कृष्णाशी बोलू शकता , कृष्णासोबत असू शकता .

कृष्ण इतका दयाळू आहे . जसे कुंती आपला पुतण्या म्हणून कृष्णाशी बोलत आहे , तसेच तुम्ही कृष्णाशी आपला मुलगा म्हणून आपला पती म्हणून बोलू शकता , तुमचा प्रियकर म्हणून , तुमचा मित्र म्हणून , तुमचा स्वामी म्हणून , जसे तुम्हाला आवडेल . तर मी हे , शिकागो मंदिर पाहून , खूप आनंदी आहे , तुम्ही खूप चं काम करत आहात आणि सभागृह पण खूप सुंदर आहे . तर असेच तुमच्या सेवेत आणि भावनेत कार्यरत राहा आणि कृष्णाचा अनुभव करा . मग तुमचे जीवन सफल होईल . खूप खूप धन्यवाद .

भाविक : जय ! हरी बोल !