MR/Prabhupada 0072 - सेवकाचे काम आहे शरण जाणे

From Vanipedia


सेवकाचे काम आहे शरण जाणे
- Prabhupāda 0072


Lecture on CC Madhya-lila 20.108-109 -- New York, July 15, 1976


तर प्रत्येकजण मालक बनू शकत नाही . ते शक्य नाही . तुम्हाला हे निर्देश आढळतील ,

एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य (चै च आदि ५।१४२ )

फक्त कृष्ण मालक आहे , आणि इतर सर्व सेवक . हि आपली खरी स्थिती आहे . पण आपण कृत्रिमरीत्या मालक बनण्याचा प्रयत्न करत आहोत . तो अस्तित्व टिकवण्याची खटाटोप आहे . आपण जे नाही आहोत ते बनण्याचा आपण प्रयत्न करत आहोत . आपण हा शब्द जाणतो , " अस्तित्वासाठीची खटाटोप " , "शक्तिमान असणाऱ्यांचा टिकाव " तर हे प्रयत्न ..आपण मालक नाही आहोत , तरी आपण मालक बनण्याचा प्रयत्न करत आहोत . मायावद तत्वज्ञान , ते सुद्धा खूप खडतर साधना आणि त्यागातून जातात . पण उद्देश काय आहे ? उद्देश हा आहे की " मी ईश्वरासोबत विलीन व्हावे " तीच चूक . तीच चूक . ते परमेश्वर नाहीत , पण ते परमेश्वर बनण्याचा प्रयत्न करत आहेत . जरी त्याने खूप खडतर साधना केली आहे , वैराग्य , त्याग सर्व काही ... काही वेळा ते सर्व भौतिक आनंदचा त्याग करून जंगलात जातात , विविध तपस्या करतात . पण उद्देश काय आहे ? " आता परमेश्वर आणि मी एक बनावे ." तीच चूक . तर माया खूप प्रबळ आहे . इतकी कि एखादा तथाकथित आध्यात्मवादात अग्रेसर असूनहि या चुका घडतच राहतात . नाही . म्हणून चैतन्य महाप्रभु त्यांच्या निर्देशातून त्वरित मुख्य मुद्द्याला स्पर्श करतात . ते चैतन्य महाप्रभूंचे तत्वज्ञान आहे . जिथे कृष्ण शेवटी म्हणतो ,

सर्व धर्मान परित्यज्य माम एकं शरणं व्रज ...(भ गी १८।६६ )

तो स्थितीविषयी बोलत आहे ; तो कृष्ण आहे , परम ईश्वर . तो विचारत आहे , मागत आहे , "तुम्ही धूर्त , सर्व त्याग करा .फक्त मला शरण या . मग तुम्ही सुखी व्हाल ." हा भगवद गीतेचा निर्देश आहे . चैतन्य महाप्रभु , जे तोच कृष्ण आहेत , पण कृष्णाच्या भक्ताच्या भूमिकेत आहेत . म्हणून तेही तेच सांगत आहेत . कृष्ण म्हणाला " तुम्ही शरण या " आणि चैतन्य महाप्रभु म्हणाले "प्रत्येक जीव हा कृष्णाचा सेवक आहे ." याचा अर्थ त्याने शरण गेले पाहिजे . सेवकाचे काम आहे शरण जाणे , विनंती करणे किंवा दावा करणे नाही , कि " मी तुझ्या समान आहे " या सर्व वेड्या , मूर्ख सूचना आहेत .

"पिसाचि पाइले येन मती-छन्न हय माया-ग्रस्त जिवेर से दास उपजय" (प्रेम-विवर्त, (श्री भा ७।२।२३ )


सेवक मालक बनू शकत नाही . ते शक्य नाही . पण जसे.. जितक्या वेळेपर्यंत आपण जीवनाच्या या चुकीच्या धारणेशी चिटकून राहाल कि , "मी सेवक नाही , मी मालक आहे " मग त्याला यातना भोगाव्या लागतील . माया त्याला दुःख देईल . दैवी ह्य इशा (भ गी ७।१४ ). जसे लुटारू , धूर्त ,चोर , ते सरकारी आज्ञेचा विरोध करतात : "मला शासनाची काही पर्वा नाही " पण याचा अर्थ तो स्वेच्छेने यातना भोगण्यास तयार होतो . त्याला सरकारी नियमांचे पालन केले पाहिजर . जर त्याने सहजच नियम पाळले नाहीत , बेकायदा काम केले , तर त्याला तुरुंगात टाकण्यात येते . आणि बळजबरीने , शिक्षा देऊन त्याला स्वीकार करावा लागतो : " हो, मी मान्य करतो ." तर ही माया आहे .

दैवी हय ईश गुणमयी मम माया दुरत्यया (भ गी ७।१४ ) आपण मायेच्या अधिपत्याखाली आहोत .
प्रक्रते क्रियमाणानी गुणिह कर्माणी सर्वशा (भ गी ३।२७ )

का ? कारण आपण मालक असल्याचे घोषित करत आहोत सेवक मालक बनण्याची घोषणा करीत आहे; म्हणून दुःखी होत आहे आणि जेव्हा आपण स्वीकार करतो की "मी मालक नाही, मी सेवक आहे" तेव्हा यातनांतून मुक्ती मिळते . खूप सोपे तत्वज्ञान आहे ती मुक्ती आहे . मुक्ती म्हणजे योग्य स्तरावर येणे . ती आहे मुक्ती . मुक्तीचा अर्थ भगवद्गीतेत सांगितला आहे ,

मुक्तिर् हित्वा अन्यथा रूपं स्वरुपेण व्यवस्थिति:(भ गी ३।२७ )

मुक्ती म्हणजे हा मूर्खपणाचा व्यवसाय सोडणे, अन्यथा तो सेवक आहे, पण तो विचार करत आहे मी मालक आहे . ते अन्यथा आहे अगदी उलट . तर जेव्हा तो जीवनाच्या या विरुद्ध धारणा सोडतो की तो मालक आहे, मग तो मुक्त होतो ; तो त्वरित मोक्ष प्राप्त करतो . मुक्ती इतका वेळ घेत नाही की तुम्हाला इतक्या कठीण तपस्या कराव्या लागतील आणि जंगलात जा , हिमालय कडे जा आणि ध्यान करा आणि आपले नाक दाबाआणि इतर बऱ्याच गोष्टी . त्याला इतक्या गोष्टींची आवश्यकता नाही , फक्त तुम्ही साधी गोष्ट समजून घ्या , कि " मी कृष्णाचा सेवक आहे " - तुम्ही त्वरित मुक्त व्हाल तीच मुक्तीची व्याख्या दिली आहे श्रीमद- भागवातम मध्ये . मुक्तिर् हित्वा अन्यथा रूपं स्वरुपेण व्यवस्थिति: जसे एखादा गुन्हेगार तुरुंगात , जर तो नम्र होऊन मान्य करत असेल "मी यापुढे कायद्याचे पालन कारेन . मी आज्ञाधारकपणे सरकारी कायद्यांचे पालन करीन " त्याने असे घोषित केल्याने कधी कधी त्याला आधीच सोडले जाते . तर आम्ही भौतिक अस्तित्त्वाच्या या तुरुंगाच्या घरातून ताबडतोब मुक्त होऊ शकतो जर आपण चैतन्य महाप्रभुची शिकवण स्वीकारत असू तर,

जीवेर स्वरूप हय नित्य कृष्णेर दास (चै च अादि २०।१०८-१०९ )