MR/Prabhupada 0078 - तुम्ही फक्त श्रद्धेने श्रावण करण्याचा प्रयत्न करा



Lecture on SB 1.2.16 -- Los Angeles, August 19, 1972


शुश्रुषो: श्रद्धधानस्य वासुदेव कथा रुचि: (श्री भा १।२।१६ )

मागच्या श्लोकात समजावले आहे , यद अनुद्यसिना युक्ता: (श्री भा १।२।१५ ) प्रत्येकाला नेहमी स्वतःला विचारात मग्न केले पाहिजे . ही तलवार आहे. . तुम्हाला या कृष्ण भावनामृताची तलवार हातात घेण्याची गरज आहे. मग तुम्ही मुक्त होऊ शकता. या तलवारीने बंधन तोडले जाऊ शकते. तर ... आता आपण ही तलवार कशी मिळवू शकतो? त्या प्रक्रियेचे इथे वर्णन केले आहे की आपण फक्त विश्वासाने, ऐकण्याचा प्रयत्न करा . तुम्हाला ती तलवार मिळेल. झालं काम . वास्तविक, आपली ही कृष्ण भावनामृत चळवळ पसरत आहे. आपल्याला एका मागून एक तलवार मिळत आहेत फक्त ऐकूनच मी न्यूयॉर्क मध्ये ही चळवळ सुरु केली. तुम्हाला सर्वांना हे माहीतच आहे खरं तर माझ्याकडे एकही तलवार नव्हती . जसे धार्मिक तत्त्वांमध्ये ते एका हातात धार्मिक शास्त्रे घेतात आणि दुसऱ्या हातात तलवार , "तू हि शास्त्रवचने स्वीकार, अन्यथा मी तुझे डोकं उडवीन ." हा देखील दुसरे प्रचार आहे . पण माझ्याकडे तलवार देखील नव्हती, पण अशा प्रकारची तलवार नाही . ही तलवार - लोकांना ऐकण्याची संधी. बस .

वासुदेव कथा रुचि: (श्री भा १।२।१६ )

तर जेव्हा त्यांच्यात रुची निर्माण होते .. रुची म्हणजे चव . "आह , इथे कृष्ण बोलत आहे , छान मला ऐकूदे " हे एखाद्या तालवारीसारखेच आहे , त्वरित . हि तलवार तुमच्या हातात आहे .वासुदेव कथा रुचि: (श्री भा १।२।१६ ) पण रुची कोणाकडे येते ? हि चव ? कारण , जसे मी अनेक वेळा समजावले आहे , चव हि खडी साखरे प्रमाणे आहे . प्रत्येकाला माहित आहे ती गोड आहे, पण तुम्ही जर ती कावीळ झालेल्या माणसाला दिलीत तर त्याला ती कडू लागेल. प्रत्येकाला माहित आहे खाडी साखर गोड आहे पण एखादा माणूस ज्याला कावीळ सारखा आजार झाला आहे , त्याला ती खूप कडू लागेल. प्रत्येकाला हे माहित आहे , ते सत्य आहे .

तर रुची , वासुदेव कथा , कृष्ण कथा ऐकण्याची आवड , हे भौतिक आजाराने ग्रस्त लोक , त्याची चव नाही घेऊ शकत . हि रुची , चव . हि रुची आणण्यासाठी काही प्राथमिक उपक्रम आहेत . ते काय आहेत ? प्रथम म्हणजे रसास्वाद . " ओह , हे खूप छान आहे ". आदौ श्रद्धा, श्रद्धधान . तर श्रद्धा , रसास्वाद , हि सुरुवात आहे . मग साधू सांग . ( चै.च. मध्य २२. ८३) . मग एकत्र येणे : " ठीक आहे , हे लोक हरे कृष्ण जपत आणि बोलत आहेत " मला जाऊन , तिथे बसून , अजून ऐकतो" याला म्हणतात साधू संग . जे भक्त आहेत त्यांच्यासोबत जुडणे . हा दुसरा स्तर आहे , तिसरा स्तर आहे भजन क्रिया . जेव्हा एखादा चांगलंय संगतीत जुडत असेल , तेव्हा तो विचार करतो ,भक्त का बानू नये ? तर आपल्याकडे अर्ज येतात , प्रभुपाद , कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा " हि भजन क्रियेची सुरुवात आहे . भजन क्रिया म्हणजे भगवंताच्या सेवेत तत्पर राहणे . हा तिसरा स्तर आहे .