MR/Prabhupada 0081 - सूर्य ग्रहावर शरीर अग्नीपासून बनले आहे



Lecture on BG 2.13 -- New York, March 11, 1966

तर इथे असे म्हंटले आहे की धिरा, धिरा.

देहिनो अस्मिन यथा देहे
कौमरं यौवनं जरा
तथा देहान्तरप्राप्ति:
धीरस्तत्र न मुह्यति (भ गी २।१३ )

देहिनः . देहिनः म्हणजे "ज्याने हे भौतिक शरीर स्वीकारले आहे". अस्मिन. अस्मिन म्हणजे "या जगात" किंवा "या जीवनात." यथा , "जसा." देहे. देहे याचा अर्थ "या शरीरात" . कारण देहिनः म्हणजे "ज्याने हे शरीर स्वीकारले आहे" आणि देहे म्हणजे "ह्या शरीरात " . तर मी या शरीरात बसलो आहे. , मी हे शरीर नाही. जसे आपण या शर्ट आणि कोटच्या आत आहात, मीही या शरीराच्या आत आहे , हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. हे स्थूल शरीर पृथ्वी, पाणी , अग्नी, वायु आणि आकाश यांनी बनले आहे , हे स्थूल शरीर , आपले भौतिक शरीर. आता, या पृथ्वीमध्ये , या ग्रहामध्ये, पृथ्वी प्रमुख आहे. कुठेही, शरीर, भौतिक शरीर, या पाच घटकांनी बनले आहे: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. हे पाच घटक आहेत.

या इमारतीसारखेच. ही संपूर्ण इमारत पृथ्वी, पाणी आणि अग्नीपासून बनलेली आहे. तुम्ही काही पृथ्वी घेतली आहे, आणि मग तुम्ही विटा बनवून अग्नीत जाळल्यात , आणि मग पृथ्वीत पाणी एकत्र करून तुम्ही विटेचा आकार बनवता, आणि मग अग्नीत ठेवता , आणि मग जेव्हा ते पुरेसे मजबूत होते , तेव्हा आपण एका मोठ्या इमारतीप्रमाणेच तो संच तयार करतो . तर हे पृथ्वी, पाणी आणि अग्नीचेच एक प्रदर्शन आहे. आपले शरीरसुद्धा त्याच प्रकारे बनविले जाते : पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश . वायू ... वायू सतत वाहत आहे, श्वास. तुम्हाला माहिती आहे ते सतत चालू आहे . हि , ही बाह्य त्वचा पृथ्वी आहे, आणि पोटा मध्ये उष्णता आहे. उष्णतेविना तुम्ही काहीही पचवू शकत नाही.

आपण पाहत आहात? जशी उष्णता कमी होते तशी आपल्या पचनाची शक्ती कमी होते . अशा कितीतरी गोष्टी आहेत . हि व्यवस्था आहे. आता, या ग्रहामध्ये आपल्याला हे शरीर मिळाले आहे, जिथे पृथ्वी प्रमुख आहे. त्याचप्रमाणे इतर ग्रहांमध्ये, इतर ग्रहांमध्ये, कुठेतरी पाणी प्रमुख आहे, कुठेतरी अग्नी प्रमुख आहे. सूर्य ग्रह , तेथे देह ... तेथे सुद्धा जिवंत घटक आहेत, परंतु त्यांचे शरीर अग्नीपासून बनले आहे . ते आगी मध्ये अस्तित्वात राहु शकतात , ते आगी मध्ये राहू शकतात. त्याचप्रमाणे वरुणलोक, शुक्र ग्रहावर , तिथे वेगळ्या प्रकारचे शरीर आहे . जसे इथे आपण पाण्याचा अनुभव घेऊ शकता, कि पाण्यात , जलचर , त्यांना एक वेगळया प्रकारचे शरीर मिळाले आहे. वर्षानुवर्षे जलजीव प्राणी आहेत, ते पाण्यातच आहेत, ते अतिशय आरामदायक स्थितीत आहेत. पण आपण त्यांना जमिनीवर आणल्याबरोबर ते मरण पावतात .

त्याचप्रमाणे, जमिनीवर आपण खूप आरामात आहोत, परंतु ज्या क्षणी तुम्हाला पाण्यात टाकण्यात येईल , तुम्ही जगू शकत नाही. कारण आपले शरीर, शारीरिक रचना भिन्न आहे, त्यांचे शरीर, शारीरिक रचना वेगळी आहे. पक्षी, वजनदार पक्षी , ते उडू शकतात , पण हे देवाने तयार केलेले उडणारे साधन आहे. परंतु आपले मानवनिर्मित यंत्र , त्याचे अपघात होतात , क्रॅश होतो . आपण पाहत आहात? तर ही व्यवस्था आहे. प्रत्येक जिवंत घटकाला एक विशिष्ट प्रकारचा शरीर मिळाला आहे. देहिनो अस्मिन यथा देहे (भ गी २।१३ ) .

आणि या शरीराचा स्वभाव काय आहे? आता, इथे विषयाचे स्पष्टीकरण दिले आहे, की आपण आपले शरीर कसे बदलू शकतो ? कसे ... परंतु, पण हि आपल्यासाठी एक कठीण समस्या आहे कारण आपण गुंतले आहोत देहबुद्धी च्या विचारांमध्ये . आता, आध्यात्मिक ज्ञानाचा प्रथम अ -ब -क -ड ज्ञान म्हणजे "मी हे शरीर नाही." जोपर्यंत एखाद्याला खात्री पटत नाही की "मी हे शरीर नाही," तोपर्यंत आध्यात्मिक जगात तो प्रगती करू शकत नाही. म्हणूनच भगवद्गीतेतील पहिला धडा त्या पद्धतीने घेतला आहे. तर इथे आहे, देहिनो अस्मिन, आता, देही, म्हणजे आत्मा . आत्मा, देही म्हणजे आत्मा. ज्याने हे शरीर स्वीकारले आहे, भौतिक शरीर, त्याला देही म्हणतात. मग अस्मिन, तो तिथे आहे . तो तिथे आहे, पण त्याचे शरीर बदलत आहे.