MR/Prabhupada 0084 - केवळ कृष्णाचे भक्त बना



Lecture on BG 2.22 -- Hyderabad, November 26, 1972


तर आपला सिद्धांत आसा आहे कि , कृष्णाकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी , जो परिपूर्ण व्यक्ती आहे , ईश्वराचे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व. आम्ही शास्त्र स्वीकारतो, ज्याचा अर्थ आहे अचल . तिथे काहीच चूक नाही. ज्याप्रमाणे मी गायीच्या गोठ्याजवळ चालत असतांना , ढिगाराच्या ढिगांनी तिथे शेण होते. मी माझ्या अनुयायांना सांगत होतो की, जर प्राणी , म्हणजे माणसाची विष्टा इथे असती , इथे कोणी आलं नसता , कुणीही इथे येणार नाही. परंतु गाईचे शेण, इतका शेणाचा ढीग आहे , तरीही, आम्हाला त्यातून जाण्यात आनंद वाटतो . आणि वेदांमध्ये असे म्हटले आहे की, "गायीचे शेण पवित्र आहे." याला म्हणतात शास्त्र .जर आपण भांडलो , "हे कसे शक्य आहे?हि तर एका प्राण्याची विष्टा आहे " .

परंतु वेद, ते ...कारण ज्ञान परिपूर्ण आहे , तर्कामध्येही मध्येही आपण हे सिद्ध करू शकत नाही की पशूची विष्टा कशी पावित्र आहे , पण ते शुद्ध आहे .म्हणून वैदिक ज्ञान परिपूर्ण आहे. आणि जर आपण वेदांकडून ज्ञान घेतले तर , आपण चौकशी किंवा संशोधनासाठी बराच वेळ वाचवू. आपल्याला संशोधन खूप आवडते. वेदांमध्ये सर्व काही आहे. का तुम्ही आपला वेळ वाया घालवता ? तर हे वैदिक ज्ञान आहे. वैदिक ज्ञान म्हणजे सर्वोच्च देवाने सांगितलेले ज्ञान . हे वैदिक ज्ञान आहे.अपौरुषेय . माझ्यासारख्या सामान्य माणसाद्वारे ते बोलले गेले नाही. म्हणून जर आपण वैदिक ज्ञान स्वीकारले, तर आम्ही मान्य करतो , कि ते सत्य आहे कारण ते कृष्णाने किंवा त्याच्या प्रतिनिधी ने सांगितले आहे ... कारण त्यांचे प्रतिनिधी असे काही बोलणार नाहीत जे कृष्ण बोलला नाही. म्हणूनच तो प्रतिनिधी आहे . कृष्णाची चेतना जागृत झालेला व्यक्ति म्हणजे कृष्णाचा प्रतिनिधीच. कारण कृष्णाची जाणीव असलेला व्यक्ती काही मूर्खपणाचे बोलणार नाही. कृष्णाच्या बोलण्याखेरीज, हा फरक आहे. इतर मूर्ख, धूर्त , ते कृष्णाच्या पुढे बोलतील . कृष्ण सांगतो ,

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु (भ गी १८।६५),

परंतु धूर्त विद्वान म्हणतील, "नाही, ते कृष्णासाठी नाही. याचा अर्थ दुसराच आहे ." हे तुम्हाला कुठे मिळेल कृष्ण थेट म्हणतो , मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु (भ गी १८।६५) . तर मग का तुम्ही भ्रांत होता ? का इतर गोष्टी मांडता :"हे कृष्णाच्या अंतरात आहे ? " तूम्हाला असे लोक सापडतील ...मला नाव नाही घ्यायचे. बरेच धूर्त विद्वान आहेत ते असेच अर्थ लावतात. तर भगवद्गीता भारताच्या ज्ञानाचे पुस्तक असूनही , अनेक लोक फसले आहेत. वाईट .. या दुष्ट विद्वानांमुळे, तथाकथित विद्वान . कारण ते फक्त चुकीचा अर्थ लावतात. म्हणूनच आपण भगवद्गीता जशी आहे तशी सादर करत आहोत. कृष्ण म्हणतात ,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। (भ गी १८।६६).

आम्ही म्हणतो, आपण या निष्ठेचा प्रचार करीत आहोत: "आपण कृष्ण भावनेत जागृत व्हा. फक्त कृष्णाचे भक्त बाणा ." तुमचा मान अर्पण करा ..." "तुम्हाला कोणालातरी आदर द्यावा द्यावा लागेल . तुम्ही सर्वोच्च नाही. काही काम करून घेण्यासाठी तुम्हाला कुणाचीतरी खुशामत करावी लागते . जरी तुम्हाला चांगले पद मिळाले असले, तरी तुम्हाला खुशामत करावी लागते . जरी आपण राष्ट्रपती झालात , देशाचे अध्यक्ष बनलात , तुम्हाला आपल्या देशवासियांना खुश ठेवावे लागते : "कृपया मला मत द्या . कृपया , मी तुम्हाला इतक्या सुविधा देईन." तर तुम्हाला खुशामत करावी लागते . ते सत्य आहे. तुम्ही खूप उच्च पदावर असाल पण तुम्हाला कुणालातरी खुश ठेवावे लागते. तुम्हाला एखाद्याला स्वामी बनवावे लागेल , मग कृष्णाला का नाही ? सर्वोच्च स्वामी ? कुठे अडचण आहे ? "नाही. मी कृष्ण सोडून इतर हजारो स्वामींना स्वीकारेन ." हे आमचे तत्त्वज्ञान आहे. "मी कृष्णाशिवाय इतर हजारो शिक्षक स्वीकारेन .हा माझा निश्चय आहे." मग तुम्ही आनंदी कसे होऊ शकता? आनंद केवळ कृष्णाला स्वीकारूनच मिळेल.

भोक्तारं यज्ञतपसां
सर्वलोकमहेश्वरम्
सुह्रदं सर्वभूतानां
ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति (भ गी ५।२९)

ही शांतीची प्रक्रिया आहे. कृष्ण सांगतो , की तुम्ही स्वीकारा की "मी भोक्ता आहे, तुम्ही भोक्ता नाही." तुम्ही भोक्ता नाही , तुम्ही अध्यक्ष असू शकता किंवा सचिव होऊ शकता; किंवा तुम्हाला जे वाटत ते होऊ शकता . परंतु तुम्ही भोक्ता नाही. आनंद घेणारा कृष्ण आहे. आपल्याला हे माहित असले पाहिजे . जसे तुमच्यात ... मी आलेलो आहे, आंध्र मदत कमिटीच्या एका पात्राला उत्तर देत आहे. जर कृष्ण समाधानी नसेल तर हि बचाव समिती काय करेल? फक्त काही निधी जमा करून? नाही, ते शक्य नाही. आता पाऊस पडत आहे आता तुम्हाला लाभ मिळेल. पण तो पाऊस कृष्णावर अवलंबून आहे ,आपल्या निधी वाढविण्याच्या क्षमतेवर नाही..