MR/Prabhupada 0086 - या असमानता का आहेत ?



Sri Isopanisad, Mantra 9-10 -- Los Angeles, May 14, 1970


का आपल्याला इतक्या वेगवेगळे व्यक्तिमत्त्व दिसतात ? जर ते पित्त, कफ आणि वात यांचे मिश्रण असतील तर ते समान का नाहीत? तर ते हे ज्ञान विकसित करीत नाहीत. या असमानता का आहेत? एक मनुष्य जन्मतः कोट्याधीश आहे ; आणखी एक माणूस जन्मला आहे, तो दिवसभरात दोन वेळेला पूर्ण भोजन देखील करू शकत नाही. जरी तो खूप कष्ट करत आहे . हा भेदभाव का आहे? का एक अशा अनुकूल परिस्थितीत आहे? आणि दुसरा नाही? तर तिथे कर्माचे नियम आहेत, वैयक्तिक . तर हे ज्ञान आहे, तर हे ज्ञान आहे, म्हणून इषोपनिषद असे म्हणते कि अन्याद् एवाहुर् विद्यया अन्यद् अाहुर् अविद्यया . जे अज्ञानात आहेत ते वेगळ्या पद्धतीचे ज्ञान विकसित करत आहेत , जाणीव जे वास्तविक ज्ञानात आहेत , जाणीव जे वास्तविक ज्ञानात आहेत , ते वेगळ्या मार्गाने प्रगती करीत आहेत. सामान्य लोक, त्यांना आमचे कार्य आवडत नाही, कृष्ण भावनामृत .

ते आश्चर्यचकित आहेत. गर्गमुनी काल संध्याकाळी मला सांगत होते की लोक विचारतात, "तुम्हाला इतके पैसे कुठून आणता ? तुम्ही इतक्या गाड्या आणि मोठ्या चर्च ची मालमत्ता खरेदी करत आहात आणि पन्नास, साठ माणसांना दररोज सांभाळत आहात आणि आनंदी आहेत . हे काय आहे? "(हशा) म्हणून ते आश्चर्यचकित आहेत आणि आम्ही आश्चर्यचकित आहोत कि का हे मूर्ख फक्त पोट भरण्यासाठी इतके कठोर परिश्रम करीत आहेत. तर भगवद गीता म्हणते ,

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी (भ गी २।६९) .

आम्ही पाहत आहोत कि हे लोक झोपलेले आहेत , आणि ते पाहतात की आपण आपला वेळ वाया घालवत आहोत. हे उलट दृश्य आहे. का?

कारण त्यांच्या कृती वेगळ्या आहेत, आणि कृतीची आमची रेषा भिन्न आहे. आता, ते एका बुद्धिमान व्यक्ती ठरवेल ज्याची क्रिया खरोखर बरोबर आहे. या गोष्टींची वैदिक साहित्यात अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा केल्या आहेत. जसे हे 'इषोपनिषद' आहे, त्याचप्रमाणे अजून एक उपनिषद आहे गर्ग उपनिषद. त्यात विद्वान पती-पत्नीमधले संवाद आहेत . पती पत्नीला शिकवत आहे. एतद् विदित्वा य: प्रयाति स एव ब्राह्मण गर्गि । एतद् अविदित्वा य: प्रयाति स एव कृपणा । ज्ञानाची ही खरी संस्कृती, जो कोणी ... प्रत्येकजण जन्म घेतो आणि प्रत्येक जण मरणार आहे. याबद्दल मतभेद नाही. आपण मरणार आहोत आणि तेही मरणार आहेत . ते असे म्हणू शकतात की "तुम्ही जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोगांचा विचार करत आहात. तर तुम्हाला असे म्हणायचं आहे का कि तुम्ही कृष्ण भावनामृत ज्ञान घेत आहात म्हणून , नैसर्गिक आपत्तीकारक या चार तत्त्वांपासून तुम्ही मुक्त व्हाल ?"

नाही. हे सत्य नाही. सत्य आहे , गर्ग उपनिषद म्हणते ,एतद् विदित्वा य: प्रयाति । जो मी कोण आहे हे जाणल्यावर या देहाचा त्याग करतो , स एव ब्राह्मण, तो ब्राह्मण आहे. ब्राह्मण ... आम्ही तुम्हाला पवित्र धागा देत आहोत. का? तुम्ही फक्त जीवनाचे रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा . ते आहे ब्राह्मण . विजानत: आपण या श्लोकात वाचले आहे विजानत: गोष्टी जशा आहेत तशा समजून घेतल्यानंतर जो कोणी या शरीराचा त्याग करतो , तो ब्राह्मण आहे .