MR/Prabhupada 0092 - आपण आपल्या इंद्रियांना कृष्णाला संतुष्ट करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे



Lecture on BG 2.20-25 -- Seattle, October 14, 1968


ह्या भौतिक जगात सगळेजण,हे इंद्रियतृप्ती करण्यात गुंतलेले आहेत. एकतर उच्च ग्रहात किंवा निम्न ग्रहात. जसे प्राणिजगत इंद्रियतृप्ती करण्यात गुंतलेले असतात. आणि तसेच मनुष्यप्राणी सुद्धा ह्याला मनुष्य म्हणतात का?आपण सुसंस्कृत आहोत,आपण काय करत आहोत? तीच गोष्ट. आहार,निद्रा,मैथुन. तेच जे कुत्राही करतो. कुठेही ह्या भौतिक जगात,उच्च ग्रहांवर किंवा निम्न ग्रहांवर,इंद्रियतृप्ती सगळ्यात प्रमुख आहे. केवळ अध्यात्मिक जगतामध्ये तिथे इंद्रियतृप्ती नाही. तिथे फक्त कृष्णाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न असतो. ते म्हणजे... इथे प्रत्येकजण स्वतःची इंद्रियतृप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. भौतिक विश्वाचा हाच नियम आहे.

ते भौतिक जीवन आहे. जोपर्यन्त तुम्ही तुमची इंद्रियतृप्त करण्याचा प्रयत्न करता,ते तुमचे भौतिक जीवन आहे. आणि जेव्हा तुम्ही कृष्णाची इंद्रिय संतुष्ट करता तेच तुमचे खरे अध्यात्मिक जीवन. ती फार सोपी गोष्ट आहे. त्याऐवजी...

ह्रिषीकेन ह्रिषीकेश सेवनं (चै च मध्यम १९।१७० )

तिला भक्ती म्हणतात. तुम्हाला इंद्रिय मिळाली आहेत. तुम्ही ती तृप्त केली पाहिजेत. इंद्रिय,तुम्ही इंद्रियतृप्ती केली पाहिजे एकतर तुम्हाला संतुष्ट करा... पण तुम्हाला माहित नाही. बद्धजीवाला हे माहित नसते की कृष्णाची इंद्रिय संतुष्ट केल्याने,त्याची स्वतःची इंद्रिय आपोआप संतुष्ट होतात. तेच उदाहरण. जसे मुळांना पाणी घालून... किंवा हि बोटे,माझ्या शरीराचे भाग, पोटाला अन्न मिळाल्याने, आपोआप बोटांनाही ताकद मिळते. हे गुपित आपण हरवत आहोत. आपण असा विचार करतो की आपण आपल्या इंद्रियांना तृप्त करण्याचा प्रयत्न करून सुखी होऊ.

कृष्णभवनामृत म्हणजे तुमची इंद्रियतृप्ती करण्याचा प्रयत्न नाही. तुम्ही कृष्णाची इंद्रिय संतुष्ट करण्याचं प्रयत्न करा. आपोआप तुमची इंद्रिय संतुष्ट होतील हे कृष्णभवनामृत होण्याचे गुपित आहे. विरुद्ध पक्ष, ते विचार करतात,"अरे, मी का संतुष्ट करू? मी का कृष्णाची पूर्ण दिवस आणि रात्र सेवा करू? मला कर्मी लोकांसाठी प्रयत्न करू दे. जसे तुम्ही पूर्ण दिवस आणि रात्र कृष्णाची सेवा करता,ते असा विचार करतात," हे किती मूर्ख आहेत आम्ही बुद्धिवान आहोत. आम्ही आमच्या इंद्रीयतृप्तीसाठी पूर्ण दिवस रात्र काम करत आहोत, आणि ते का कृष्णाची सेवा करतात?" हा फरक आहे भौतिकवादी आणि अध्यात्मिकवादिंमध्ये अध्यात्मिकवादिंचे प्रयत्न पूर्ण दिवस आणि रात्र मेहनतीने,खंड न पाडता, फक्त कृष्णाची सेवा करणे. ते खरे आध्यत्मिक जीवन. आणि भौतिकवादी म्हणजे तेवढीच मेहनत,, पण नेहमी स्वतःची इंद्रियतृप्ती करण्याचा प्रयत्न हा फरक आहे,भौतिकवादी आणि आध्यत्मिकवादींमध्ये.

म्हणून कृष्णभवनामृत चळवळ म्हणजे आपण कृष्णाला संतुष्ट करायचे वळण आपल्या इंद्रियांना लावायचे एवढेच फार पूर्वीचे इतर,आधीचे,खूप,खूप हजारो,लाखो जन्मापासून, आपण केवळ आपली इंद्रियतृप्ती करण्याचा प्रयत्न केला आहे,स्वतःची इंद्रिय. हा जन्म कृष्णाच्या संतुष्टी करीता समर्पण करणे. त्याला कृष्णभवनामृत म्हणतात. एक जन्म,आपण अनेक जन्म स्वतःची इंद्रियतृप्ती करण्याचा प्रयत्न केला. हा जन्म,किमान एक जन्म,मी प्रयत्न करतो,बघू काय होते. त्यामुळे आम्ही अपयशी होणार नाही. जरी आम्हाला आमची इंद्रियतृप्ती न करणं गैरसोयीचं वाटलं, तरीहि आम्ही अपयशी होणार नाही. केवळ कृष्णाची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा,मग सर्व ठीक होईल.