MR/Prabhupada 0094 - आपलं कार्य आहे कृष्णाच्या शब्दांचा पुनरुच्चार करणे
Lecture on BG 1.20 -- London, July 17, 1973
नास्तिक लोक देवा बद्दल विचारणा करत नाहीत किंवा देवाला जाणू शकत नाहीत. आपण बरेचवेळा हा श्लोक सांगितला आहे.
- येषां त्वन्तगतं पापं
- जनानां पुण्यकर्मणाम
- ते द्वन्दमोहनिर्मुक्ता
- भजन्ते मां धृढव्रता: (भ गी ७।।२८)
पापी माणसं, ते समजू शकत नाहीत. ते समजतात,ते असा विचार की "कृष्ण भगवान आहे,म्हणून मी पण भगवान आहे. तो साधारण माणूस आहे,कदाचित थोडी शक्ती, ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय प्रसिद्ध व्यक्ती. म्हणून तोहि शेवटी माणूस आहे मग मीही माणूसच आहे. तर मग मी देव का नाही? अभक्त्तांचा हा निष्कर्ष आहे, अभक्त आणि पापी माणसं. जर कोणी स्वतःला देव म्हणत असेल,तर लगेच तुम्हाला कळेल तो सर्वात मोठा पापी मनुष्य आहे आणि तुम्ही त्याचं खाजगी जीवन बघितलंत, तुम्हाला दिसेल की तो सर्वात मोठा पापी माणूस आहे. हि परीक्षा आहे. नाहीतर कोणीही म्हणणार नाही की मी देव आहे,असे खोटे दर्शवणे. कोणीही नाही. कोणताही पुण्यवान मनुष्य नाही त्याला माहित आहे. "मी कोण आहे? मी एक साधारण मनुष्य आहे,मी कसा देवाचे स्थान घेण्याचा दावा करेन?" आणि ते दुष्ट लोकांच्यात प्रसिद्ध होतात. जस श्रीमद- भागवतात सांगितलंय,
- श्वविड्वराहोष्ट्रखरै: (श्री भा २।३।१९)
तो कोणता श्लोक आहे? होष्ट्रखरै: संस्तुत: पुरुष: पशु: ते...ह्या जगात आपण कितीतरी महान माणसं पाहतो. तथाकथित महान मनुष्य, आणि सर्वसामान्य जनता त्यांची खूप प्रशंसा करते. म्हणून भागवद् सांगते, की असा कोणी जो भक्त नाही, ज्याने कधीही हरे कृष्णाचा जप केला नाही. दुष्ट लोकांच्या नजरेत तो कितीही महान असेल, पण तो इतर काही नसून जनावर आहे. जनावर. म्हणून, श्वविड्वराहोष्ट्रखरै: मग तुम्ही कस महान माणूस म्हणू शकता. तुम्ही त्या जनावराला म्हणता. आपल्या कार्याच समोरच्याकडून कौतुक होणार नाही. आपण म्हणतो कोणताही माणूस जो भक्त नाही,तो दुष्ट आहे. आपण सामान्यतः म्हणतो. हा खूप कठोर शब्द आहे, पण आपल्याला तो वापरावा लागतो. जेव्हा आपण बघतो की तो कृष्ण भक्त नाही, मग तो दुष्ट आहे. आपण कसे म्हणतो?तो माझा शत्रू नाही, पण असं आपण म्हणतो कारण तस कृष्णाने सांगितलंय. जर आपण खरंच कृष्णभवनामृत असलो, तर आपलं कर्तव्य आहे कि आपण कृष्णाच्या शब्दांचा पुर्नउच्चार करणे. कृष्णाचे प्रतिनिधी आणि इतर प्रतिनिधींमध्ये काय फरक आहे. कृष्णाचे प्रतिनिधी जे कृष्णाने सांगिलय फक्त त्याचा पुर्नउच्चार करतात.एवढंच. तो प्रतिनिधी बनतो. त्यासाठी जास्त पात्रतेची अवश्यकता नाही. तुम्ही फक्त श्रद्धेने पुर्नउच्चार करा. जसे कृष्णाने सांगितलंय,
- सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज (भ गी १८।।६६)
म्हणून जो कोणी हे सत्य स्वीकारतो,की,"जर मी कृष्णाला शरणं गेलो तर माझे जीवन यशस्वी होईल," तो कृष्णाचा प्रतिनिधी. त्यासाठी तुम्ही उच्च शिक्षित किंवा प्रगत असण्याची गरज नाही. फक्त जर तुम्ही एवढेच स्वीकारलेत की कृष्ण काय सांगतो... जसे अर्जुन म्हणाला,
- सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव:(भ गी १०।।४४)
"माझ्या प्रिय कृष्णा,केशवा,तुम्ही जे काही सांगितलं आहे, कुठलाही बदल न करता,मी ते स्वीकारतो." तो भक्त. म्हणून अर्जुन समबोधतो,भक्तोसि,हे भक्ताचे काम आहे. मी का कृष्णाला माझ्यासारखं सामान्य माणूस समजू? भक्त आणि अभक्तामध्ये हा फरक आहे. भक्ताला माहित आहे की मी एक सामान्य माणूस आहे,कृष्णाचा अंश आहे. कृष्ण स्वतंत्र व्यक्ती आहे मी सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे. पण जेव्हा आपण त्याची शक्ती आणि माझ्या शक्तीचा विचार करतो,माझी शक्ती अगदीच नगण्य आहे. ह्याला कृष्णाला समजणे म्हणतात.यात काही अडचण नाही. फक्त प्रामाणिक असलं पाहिजे,पापी नाही. पण पापी मनुष्य त्याला जणू शकत नाही. पापी माणूस, तो म्हणेल,"कृष्ण एक मनुष्य आहे, मीही एक मनुष्य आहे. मी का देव नाही? तो का फक्त देव आहे?नाही, मी सुद्धा देव आहे.तू देव, तू देव, सगळेच देव." जसे विवेकानंदानी सांगितलं,तुम्ही का देवाला शोधत आहेत?
तुम्ही बघत नाही का रस्त्यावर अनेक देव फिरत आहेत?" हे त्यांचं देवाला जाणणे. हे त्यांचं देवा जाणणे आणि ते महान माणूस बनले: अरे ते सगळ्यांच्यात देवाला बघतात." हा मूर्खपणा, हा बदमाशपणा, जगभरात चालला आहे. देव कोणाला म्हणायचं कोणालाही माहित नाही,देवाकडे काय शक्ती,देव म्हणजे काय. ते मुर्खांना देव समजतात. हल्लीच्या दिवसात,हे चालू आहे अजून एक मूर्ख आला आहे.तो हि स्वतःला देव जाहीर करतो. तर हि फार स्वस्त वस्तू झाली आहे. पण ते विचार करायला मेंदूचा वापर करत नाहीत की "मी स्वतःला देव म्हणवतो माझ्याकडे काय शक्ती आहे?" तर हे रहस्य आहे. हे रहस्य आहे. भक्त बनल्याशिवाय,देवाला जाणण्याचे रहस्य उलगडणार नाही. आणि भगवद्-गीतेत कृष्णाने सांगितलंय कस कोणी त्याला जणू शकेल.
- भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः (भ गी १८।।५५)
फक्त भक्ती करून. तो म्हणू शकला असता. "उच्च,सर्वोच्च ज्ञानाने" किंवा योगाद्वारे. किंवा मोठा कर्मी, कार्यकर्ता बनल्याचा देखावा करून, एखादा मला जाणू शकतो. नाही त्याने असं कधीही म्हटलं नाही, कधीही नाही. तर कर्मी,ज्ञानी,योगी,ते सर्व दुष्ट आहेत. ते कृष्णाला समजू शकत नाहीत. सगळे अज्ञानी कर्मीची तृतीय श्रेणी,ज्ञानींची द्वितीय श्रेणी आणि योग्यांची प्रथम श्रेणी सगळे दुष्ट दुर्जन . एवढेच.