MR/Prabhupada 0096 - आपण व्यक्ती भागवताकडून शिकलं पाहिजे



Lecture on BG 13.4 -- Miami, February 27, 1975


मी असा विचार करतो,"अमेरिकन,इंडियन,हिंदू,मुस्लिम,"असे सगळे वाईट विचार माझ्या हृदयात आहेत. आपण आपले विचार शुद्ध केले पाहिजेत. ह्रुद्यन्त: स्थॊ ह्यभद्राणि वाईट गोष्टी ज्या माझ्या हृदयात आहेत,जर आपण आपल्या हृदयातले विचार शुद्ध केले,तर आपण ह्या उपाधीतून मुक्त होऊ.

नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवतसेवया (श्री भा १|२|१८)

नष्टप्रायेष्व. हे वाईट विचार शुद्ध होतील जर आपण नियमितपणे श्रीमद्-भागवत किंवा भगवद्-गीता ऐकली. नित्यं भागवत... आणि भागवत म्हणजे भागवत पुस्तक आणि भागवत व्यक्ती. व्यक्ती भागवत म्हणजे आध्यात्मिक गुरु. किंवा श्रेष्ठ भक्त. त्याला भागवत म्हणतात,महा-भागवत, भागवत. तर भागवतसेवया म्हणजे फक्त श्रीमद्-भागवत किंवा भगवद्-गीता वाचणे नव्हे. तर आपण व्यक्ती भागवताकडून शिकलं पाहिजे. ते आवश्यक आहे.

चैतन्य महाप्रभुंनी उपदेश दिलाय,भागवत परा गिया भागवत-स्थाने: "जर तुम्हाला भागवत शिकायचं असेल,तर व्यक्ती भागवताकडे गेले पाहिजे जो आत्मसाक्षात्कारी आहे." व्यावसायिक नाही. तो तुम्हाला मदत करू शकणार नाही. व्यावसायिक- मी देवळात जातो, चर्चला जातो,आणि परत नरकाच्या वाटेने... नाही. तुम्ही फक्त व्यक्ती भागवताच्या संगतीत रहा जो आत्मसाक्षात्कारी आहे. आणि त्याच्याकडून हि पुस्तक,त्यातील ज्ञान ऐका. श्रीकृष्णांचे प्रतिनिधी. जसे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय,

तत् समासेन मे श्रुणु मे श्रुणु:(भ गी १३।४)।

"माझ्याकडून किंवा माझ्या प्रतिनिधींकडून ऐका. मग तुम्हाला फायदा होईल." तर हि केंद्र लोकांना जी दुःख भोगत आहेत त्यांना संधी देण्यासाठी उघडली आहेत. फक्त ह्या जन्मासाठी नाही तर जन्मा मागून जन्म.

एई रुपे ब्रह्माण्ड भ्रमिते कोन भाग्यवान जीव
गुरु कृष्ण कृपाय पाय भक्ति लता बीज
(|चै च मध्य १९|१५९)


तर ते आपलं कर्तव्य आहे. आपण हे कर्तव्य श्रीकृष्णांच्यावतीने स्वीकारलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी व्यक्तिशः येऊन शिकवले. जसे त्यानी श्रीमद्-भागवताची शिकवण दिली मग त्यांनी ते आपल्या भक्तांना सामान्य जनतेला समजावण्याकरिता सोपवले आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही काही नवीन निर्माण केले नाही किंवा आमचं स्वतःच त्यात काही घातलं नाही. मालमत्ता आहे. आम्ही फक्त शिपाई म्हणून वितरित करीत आहोत.एवढंच आणि आम्हाला काही अडचण नाही. जर आम्ही भगवद्-गीता लोकांसमोर मांडली,भगवान श्रीकृष्णांची शिकवण,जशी आहे तशी.,मग आमची जबाबदारी संपली. आम्ही काहीही निर्माण करू शकत नाही; ना आम्हाला काहीही निर्माण करायचे सामर्थ्य आहे. जसे अनेक आहेत. ते नवीन कल्पना निर्माण करतात. नवीन प्रकारचे..., सगळा मूर्खपणा. ते मदत करणार नाही. वास्तविक ज्ञान घ्या.