MR/Prabhupada 0100 - श्रीकृष्णासोबत आपलं चिरंतर नातं आहे
Lecture on SB 6.1.8 -- New York, July 22, 1971
तर आपलं श्रीकृष्णांबरोबर चिरंतर नातं आहे. आत्ता सध्याच्या परिस्थितीत आपण फक्त विसरलो आहोत,दाबून टाकलंय. म्हणून आपण असा विचार करतो की आपलं श्रीकृष्णांबरोबर कुठलही नातं नाही. कारणं आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत आपलं नातं शाश्वत आहे. फक्त आपण ते पुनरुज्जीवित केलं पाहिजे. त्याला कृष्णभावनामृत म्हणतात. कृष्णभावनामृत म्हणजे... आपण आता वेगळ्या चेतनेत आहोत. मी विचार करतो की मी भारतीय आहे. दुसराकोणी विचार करतो,"मी अमेरिकन आहे." आणि कोणी विचार करतो,"मी हा,मी तो., पण खरा विचार असा असला पाहिजे "मी श्रीकृष्णांचा." त्याला कृष्णभावनामृत म्हणतात. "मी श्रीकृष्णांचा." आणि कृष्णभावनामृत नात्यात, कारण श्रीकृष्ण सगळ्यांचेआहेत,म्हणून मी पण सगळयांचा बनलो. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. भारतात, अशी पद्धत आहे जेव्हा मुलगी मुलाबरोबर लग्न करते. तर,तुमच्या देशातही, सगळीकड़े, सारखीच पद्धत.
जसे मुलगा वडिलांच्या वहिनीला "काकू" म्हणतो. अता, ती कशी काकू झाली? कारण, नवऱ्याकडच्या नात्यामुळे. लग्नाआधी, ती कोणाचीही काकू नव्हती, पण जेव्हा तिचं नवऱ्याबरोबर नातं जडलं, नवऱ्याचा पुतण्या तिचा पुतण्या झाला. फक्त उदाहरण समजण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे,जर आपण आपलं नातं पुनः प्रस्थापित, किंवा आपलं श्रीकृष्णांबरोबरच मूळ नातं स्थापित केलं. आणि श्रीकृष्ण सगळ्यांचे आहेत म्हणून मीही सगळ्यांचा बनलो. ते खरे सार्वत्रिकी प्रेम. कृत्रिम,तथाकथित सार्वत्रिकी प्रेम स्थापित करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही केंद्रबिंदूशी तुमचं नातं जोडत नाही. जसे तुम्ही अमेरिकन आहेत. का? कारण तुम्ही ह्या देशात जन्माला आलात. त्यामुळे दुसरा अमेरिकन तुमच्या देशाचा सदस्य आहे, पण तुम्ही काहीतरी वेगळे बनलात, मग तुमचं काही दुसऱ्या अमेरिकनशी नातं राहणार नाही. म्हणून आपण आपलं श्रीकृष्णांबरोबरच नातं पुनः प्रस्थापित केलं पाहिजे.
मग सार्वत्रिक बंधुत्व,न्याय,शांती,समृद्धीचा प्रश्न येईल. नाहीतर, कोणतीही शक्यता नाही. केंद्रबिंदू सापडत नाही. न्याय आणि शांती कशी असू शकते?ते शक्य नाही. म्हणून भगवद्-गीतेत शांतीचे सूत्र दिलेलं आहे. शांतीचे सूत्र असं आहे की हि गोष्ट समजली पाहिजे की भगवान श्रीकृष्ण हे एकमेव उपभोक्ता आहेत. जसे ह्या देवळात,आपला केंद्रबिदू श्रीकृष्ण आहेत. जर आपण स्वयंपाक करत असलो,तर तो श्रीकृष्णांसाठी,असं नाही की आपण आपल्यासाठी बनवत आहोत. शेवटी, जरी,आपण प्रसाद ग्रहण करत असलो, पण जेव्हा आपण शिजवतो, आपण असा विचार करत नाही की आपल्यासाठी बनवत आहोत.आपण श्रीकृष्णांची तयार करत असतो. जेव्हा तुम्ही काही निधी गोळा करायला जाता. तो कीर्तन पार्टीतल्या लोकांसाठी नसतो,त्यांचा काही वैयक्तिक फायदा आहे. नाही, ते गोळा करतात, किंवा पुस्तकांचे वाटप करतात. श्रीकृष्णांसाठी,लोकांना कृष्णभवनामृत बनवण्यासाठी. आणि जो निधी गोळा केलाय,तो श्रीकृष्णांच्या सेवेसाठी खर्च केला जातो. तर ह्या प्रकारे,जेव्हा आपण अशा जीवनाचा अंगीकार करतो. सगळेकाही श्रीकृष्णांसाठी, त्याला खरे कृष्णभवनामृत बनणे म्हणतात.
तीच गोष्ट, आपण काय करत आहोत,आपल्याला केलं पाहिजे. फक्त आपल्या विचारात बदल केला पाहिजे की "मी माझ्यासाठी करत नसून श्रीकृष्णांसाठी कार्य करत आहे." ह्या प्रकारे, जर आपण कृष्णभावनेचा विकास केला,तर आपण मूळ चेतनेत येऊ. मग आपण आनंदी बनू. जोपर्यंत आपण आपली मूळ चेतनेत येत नाही,तोपर्यंत आपण वेगवेगळ्या स्तरावर वेडे बनतो. सगळेजण जे कृष्णभावनामृत नाहीत, तेपण वेडे असतात. कारण ते तात्पुरत्या,क्षणभंगुर जगाबद्दल बोलत असतात. ते संपेल. पण आपण,जीवात्मा,आपण शाश्वत आहोत. म्हणून तात्पुरता व्यवहार हे आपलं ध्येय नाही. आपला व्यवहार शाश्वत असला पाहिजे कारण आपण शाश्वत आहोत. आणि ते शाश्वत कार्य म्हणजे श्रीकृष्णांची सेवा कशी करू. ज्याप्रमाणे हि बोट माझ्या शरीराचा भाग आहेत. पण बोटांचं काम आहे. कसे शरीराला अन्न पुरवायचे, एवढेच. इथे त्यांना दुसरा काही उद्योग नाही. आणि ते बोटांच्या निरोगी स्थितीचे कारण आहे. जर त्यांनी शरीराला अन्न पुरवले नाही,ती रोगी अवस्था आहे. तसेच,श्रीकृष्ण शाश्वत आहेत,आपण पण शाश्वत आहोत.
- नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् (कठोपनिषद् २.२.१३)
सर्वोच्च शाश्वत श्रीकृष्ण आहेत,आणि आपण सुध्दा शाश्वत आहोत. आपण सर्वोच्च नाही आपण गौण आहोत. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् . ते सर्वश्रेष्ठ जीवात्मा आहेत. आणि आपण त्यांचे अंश आहोत. एको बहुनां यो विदधाति कामान् . तर एक जीवात्मा,एक शाश्वत,तो असंख्य जीवांच्या गरजांचा पुरवठा करत आहे. एको बहुनां,असंख्य जीवात्माना. तुम्ही मोजू शकत नाही. बहुनां. हे आपलं नातं आहे. तर श्रीकृष्णांचे अंश म्हणून, आपल्याला त्यांची सेवा केली पाहिजे. आणि आपण सेवक आहोत. ते आपल्या गरजा पुरवत आहेत. ते सर्वश्रेष्ठ पिता आहे. हे सामान्य आणि मुक्त जीवन आहे. आणि ह्या कृष्णभावनामृत संकल्पनेच्या पलीकडले जीवन, ते भौतिक जीवन आहे.