MR/Prabhupada 0111 - सूचना पाळा मग तुम्ही कुठेही सुरक्षित राहाल
Morning Walk -- February 3, 1975, Hawaii
भक्त (१): श्रीला प्रभुपाद,कोणी कुठे त्याचे अधिकारी प्राप्त करेल?
प्रभुपाद:गुरु हे अधिकारी आहेत. भक्त (१): नाही, मला माहित आहे, पण त्याची कार्य जसे चार नियमांचे पालन आणि सोळा माळा जप. तो खूप काही इतर गोष्टी दिवसभरात करतो,त्याला गुरु कुठे भेटेल, असं म्हणू, जर तो देवळात राहत नसेल?
प्रभुपाद: मला समजले नाही. गुरु हा अधिकारी आहे. तुम्ही तो स्वीकारला आहे.
बली मर्दन: सर्वकाही.
जयतीर्थ: असं म्हणू मला नोकरी आहे. मी मंदिरामध्ये राहत नाही, पण मी माझ्या उत्पनांमधून ५०% देत नाही. मग जे काम मी करतोय,ते गुरुच्या अधिकाराखाली येत का? गुरुंचे अधिकार?
प्रभुपाद: मग तु गुरुच्या सूचनांचे पालन करत नाहीस. हेच खरं आहे.
जयतीर्थ: म्हणजे जे काही कार्य मी दिवसभर करत आहे,ते मी गुरुच्या आज्ञेचे पालन करत नाही. ते अनधिकृत कार्य झाले.
प्रभपाद: हो, जर तुम्ही गुरुच्या आज्ञेचे पालन केले नाही, तर लगेच तुमची अधोगती व्हायला लागेल. हा मार्ग आहे. नाहीतर तुम्ही का यस्य प्रसादाद भगवत-प्रासादो गाता? गुरूला संतुष्ट करणे हे माझे कर्तव्य आहे. नाहीतर तुमची अधोगती होईल. जर तुम्हाला मनमानी करायची असेल,तर तुम्ही आदेशांचा अवमान करा. जर तुम्हाला तुमच्या स्थितीत स्थिर राहायचे असेल,तर तुम्हाला गुरुचे आदेश काटेकोरपणे पाळले पाहिजेत.
भक्त (१): आम्ही तुमच्या सगळ्या सुचना तुमची पुस्तक वाचून समजून घेऊ शकतो .
प्रभुपाद:हो. ठीक आहे, आदेशांचें पालन करा. ते गरजेचे आहे. तुम्ही कुठेही असाल त्याने काही फरक पडत नाही तुम्ही आदेशांचे पालन करा. तुम्ही सुरक्षित असाल. आदेशांचे पालन करा. तुम्ही कोठेही असलात तरी सुरक्षित राहाल. त्याने काही फरक पडणार नाही. जस मी तुम्हाला सांगितलं मी माझ्या गुरू महाराज्यांना अख्या आयुष्यात दहा दिवसापेक्षा जास्त भेटलो नाही. पण मी त्यांच्या सूचना पाळल्या. मी गृहस्थ होतो,मी मठामध्ये,देवळात कधीही राहिलो नाही.हे व्यावहारिक आहे. म्हणून माझ्या अनेक गुरुबंधूनी सुचवलं की "त्याने मुबई मंदिराचा अध्यक्ष बनाव,वगैरे,वगैरे..." गुरुमहाराज म्हणाले, "जरुर, त्याने देवळा बाहेर राहावं . तेच चांगलं. आणि थोड्याच वेळात जे गरजेचे आहेत ते तो करेल."
भक्त: जय! हरीबोल!
प्रभुपाद: ते असं म्हणाले. त्यांना काय अपेक्षा आहेत हे मला त्यावेळी समजलं नाही अर्थातच, मला माहीत होत मी प्रचार करावा अशी त्याची इच्छा होती. यशोदानंदन: मला वाटत तुम्ही तो मोठया प्रमाणात केलात.भक्त: जय, प्रभुपाद! हरीबोल!
प्रभुपाद: हो, मोठया प्रमाणात केला कारण मी गुरुमहाराज्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले. नाहीतर माझ्याकडे शक्ती नव्हती. मी काहीही जादु केली नाही. केली का? सोन्याचं उत्पादन वगैरे? (हशा) तरीही, सोन्याचे उत्पादन करणाऱ्या गुरुंपेक्षा मला चांगले शिष्य मिळाले.