MR/Prabhupada 0134 - जीवे मारू नका , आणि तुम्ही मारता



Morning Walk -- October 4, 1975, Mauritius

प्रभुपाद: ख्रिश्चन धर्मगुरू,त्यांनी मला विचारलं की "ख्रिस्तीधर्म का घटत चालला आहे? आम्ही काय केल आहे?" तर मी त्यांना संगितलं, "त्यांनी काय केलं नाही?"(हशा)

चवन: हो,

प्रभुपद: "तुम्ही सुरवातीपासूनच ख्रिस्ताच्या आज्ञांचे उलंघन केले आहे, तुम्ही जीवे मारु नका ,आणि तुम्ही मारत आहात,फक्त मारत आहात. तर तुम्ही काय केले नाही?"

भक्त १: त्याचं म्हणणं आहे की मानवाला प्राण्यांवर वर्चस्व गाजवायचे आहे.त्यांनी केले पाहिजे...

प्रभुपाद: म्हणून तुम्ही त्यांना मारायचं आणि खायचं. फार चांगलं कारण आहे. "वडिलांनी मुलांवर वर्चस्व गाजवलं पाहिजे,म्हणून मुलांना मारायचं आणि खाऊन टाकायचं." किती दुष्ट,आणि ते धार्मिक नेते असल्याचा दावा करतात.

पुष्ट कृष्ण: प्रभुपाद, प्रत्येक क्षणी श्वासोश्वासाद्वारे आणि चालताना आणि कितीतरी गोष्टी करताना आपण मारत आहोत. आणि मग असं म्हणतात,"तुम्ही जीवे मारू नका,"मग असं नाही का देवाने आपल्याला अशक्य असलेल्या सूचना दिल्या?

प्रभूपाद: नाही. तुम्ही जाणून बुजून मारू नका. पण अजाणतेपणी, जर तुम्ही केलंत तर ते माफ केलं जात. (विराम)... न पुनर बाध्याते. अल्हादिनी-शक्ती, तर अल्हादिनी शक्ती ती श्रीकृष्णांसाठी दुःखदायक नाही. पण ती दुःखदायक आहे. ती बध्दजीवांना, आपल्याला दुःखदायक आहे. हा गोल्डन मून (बारचे नाव ), सगळे जण तिथे आनंद लुटण्यासाठी येतात. पण तो पाप कर्मांमध्ये गुंतला जातो. म्हणून ह्याला सुख म्हणत नाहीत. ते त्याला दुःख देत. तर अनेक वाईट परिणाम. काम जीवन,जरी ते बेकायदेशीर नसले, तरी त्याचे परिणाम दुःखदायक आहेत.

तुम्हाला मुलांची काळजी घ्यावी लागते.तुम्हाला मुलांना जन्म द्यावा लागतो. ते वेदनादायक आहे. तुम्हाला रुग्णालयाला प्रसुतीचे पैसे द्यावे लागतात. शिक्षण,वैद्यांचा बिल - अनेक खर्च. तर काम जीवन,हे सुख त्याच्याबरोबर अनेक त्रासदायक गोष्टीं येतात. ताप-करी. तीच अल्हादिनी शक्ती मनुष्य प्राण्यात लहान प्रमाणात आहे. आणि जसा त्यांनी वापर केला, ती लगेच त्रासदायक बनते. आणि अध्यात्मिक जगात तीच आल्हादिनी शक्ती श्रीकृष्ण गोपीं बरोबर नृत्य करतात. ते वेदनादायक नाही. ते सुखकारक आहे. (विराम)...

मनुष्य, जर त्याने उत्तम अन्नपदार्थ खाल्ले ते वेदनादायक होते. जर आजारी माणसाने घेतलं...

चवन: तो आणखीनच आजारी पडेल.

प्रभुपाद: आणखीन आजारी. म्हणून हे आयुष्य तपस्येसाठी आहे. स्विकारायचे नाही. स्वेच्छेने नाकारायचं नाही. मग ते छान आहे.