MR/Prabhupada 0147 - साधा तांदूळ म्हणजे सर्वोच्च गुणवत्तेचा तांदूळ नव्हे



Lecture on BG 7.1 -- Hong Kong, January 25, 1975


भक्ताला माहित आहे की देव आहे. आणि ते भगवान आहेत. देवाला भगवान म्हणतात. म्हणून जरी इथे सांगितलंय... सगळ्यांना माहित आहे. भगवद गीता श्रीकृष्णानांनी सांगितली, भगवद गीतेत काही ठिकाणी वर्णन केलंय भगवान उवाच. भगवान आणि श्रीकृष्ण- एकच व्यक्ती आहेत.

कृष्णस्तू भगवान स्वयं (श्री भ १।३।२८)

भगवान, भगवान शब्दाची व्याख्या आहे.

एशवर्यस्य समग्रस्य
वीर्यस्य यशस: श्रीय:
ज्ञान-वैराज्ञयोस् चैव
सन्नाम् भग इतिन्गना (विष्णु पुराण ६।५।४७)


भग, आपल्याला शब्द समजतो भाग्यवान, भाग्य भाग्य, भग शब्दावरून भाग्यवान आला आहे. भग म्हणजे संपत्ती. संपत्ती म्हणजे समृद्धी. एक मनुष्य कसा श्रीमंत असू शकतो? जर त्याच्याकडे संपत्ती असेल, जर त्याच्याकडे बुद्धिमत्ता असे.जर तो सौन्दर्यवान असेल. जर त्याला प्रसिद्धी मिळाली असेल, जर त्याच्याकडे ज्ञान असेल, जर त्याला वैराग्य प्राप्त झालं असेल- हा भगवानचा अर्थ आहे. तर जेव्हा आपण "भगवान" म्हणतो,भगवान, परमेश्वर... ईश्वर. परमेश्वर; आत्मा, परमात्मा; ब्रह्मन, पर-ब्रह्मन - दोन शब्द आहेत. एक सामान्य आहे, आणि दुसरा परम, सर्वोच्च आहे. ज्याप्रमाणे आपली शिजवण्याची पद्धत आपण विविध प्रकारचे तांदूळ शिजवू शकतो. तांदूळ आहे. अनेक नाव आहेत: अन्न, परमान्न,पुषपान्न, कीचोरन्न, त्याप्रमाणे. तर सर्वोच्च अन्नाला परमान्न म्हणतात. परम म्हणजे सर्वोच्च. अन्न, तांदूळ, आहे पण तो सर्वोच्च दर्जाचा झाला आहे.

सामान्य तांदुळाला सर्वोच्च दर्जाचा तांदूळ म्हणत नाहीत. त्याला सुद्धा तांदूळ म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही क्षीर म्हणजे दूध आणि इतर चांगले साहित्य,घालून भात शिजवता, त्याला परमान्न म्हणतात. त्याचप्रमाणे जीव आणि भगवंतांची लक्षणे - व्यवहारिक दृष्ट्या एक समान आहेत. भगवान... आपल्याला हे शरीर मिळालंय, भगवंतानाही शरीर मिळालंय भगवान सुद्धा जीव आहेत. आपण सुद्धा जीव आहोत. भगवंतांनाकडे सर्जनशील शक्ती आहे; आपल्याकडेही सर्जनशील शक्ती आहे. पण फरक एवढाच आहे की ते विभू आहेत.एको बहूनां यो विदधाति कामान् . जेव्हा भगवंतांनी हे संपूर्ण विश्व निर्माण केले, तेव्हा त्यांना कुणाची मदत लागली नाही. त्यांनी आकाश निर्माण केले. आकाशापासून आवाज आहे; आवाजापासून वायू आहे. वायूपासून अग्नी आहे; अग्नीपासून पाणी आहे;आणि पाण्यापासून पृथ्वी आहे.