MR/Prabhupada 0150 - आम्ही जप करण्याचे कधीच सोडू नये



Lecture on SB 6.1.15 -- Denver, June 28, 1975

अथापि ते देव पदाम्बुज​द्वयंप्रसादलेशानुग्र्हीत एव हि, जानाति तत्तवं न चान्य एकोऽपि चिरम् विचिन्वन् (श्री.भा.१०.१४.२९). जे श्रीकृष्णांच्या अकारण अनुकंपेला अनुकूल आहेत, ते श्रीकृष्णांना समजू शकतात. बाकीचे, न चान्य एकोऽपि चिरम् विचिन्वन्. चिरम म्हणजे मोठ्या काळासाठी, खूप वर्षांसाठी, जर ते केवळ तर्क करत आहेत, देव काय आहे, किंवा श्रीकृष्ण काय आहेत, ती प्रक्रिया आम्हाला मदत करणार नाही. तिथे अशा प्रकारच्या अनेक वैदिक आवृत्ती आहेत: अतः श्रीकृष्ण नामादि न भवेद् ग्राह्यम् इन्द्रियैः सेवोन्मुखे हि जिह्वादौ स्वयमेव स्फुरत्यदः (चै.च​. १७.१३६)

श्रीकृष्ण, त्याचे नाव, त्याची कीर्ती, त्याची विशेषता, त्याचे क्रियाकलाप ... श्रीकृष्ण नामादि न भवेद्... नामादि म्हणजे "पवित्र नावापासून सुरूवात." त्यामुळे शक्य नाही ... म्हणून जर आम्ही स्वतःला भौतिक व्यासपीठावर ठेवू, तर हजारो वर्षे आम्ही जप करू, ते अवघड होईल. त्याला म्हणतात नामापरध​. अर्थात, पवित्र नाव एव्हडे शक्तिशाली आहे की अगदी अपराधाने जप करून, हळूहळू तो शुद्ध होतो. त्यामुळे आम्ही जप करणे सोडून देता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत, आम्ही हरे कृष्ण जप करत गेले पाहिजे. पण चेतावणी आहे की जर आम्ही भौतिक व्यासपीठावर राहिलो, तर श्रीकृष्णांना समजून घेणे शक्य होणार नाही, त्याचे पवित्र नाव, त्याची विशेषता, त्याचे स्वरुप, त्याचे क्रियाकलाप. हे शक्य होणार नाही. त्यामुळे प्रक्रिया आहे भक्ति. आणि जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांना समजून घेण्याच्या स्तरावर येता, नंतर ताबडतोब तुम्ही आध्यात्मिक जगात हस्तांतरित होण्या योग्य होता. ते... श्रीकृष्णांनी भगवद गीतेत सांगितले आहे, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति (भ.गी.४.९).