MR/Prabhupada 0161 - वैष्णव बना आणि इतरांच्या व्यथा समजा
जर आपण काटेकोरपणे अध्यात्मिक गुरूंची सेवा करण्याचा,आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला, मग श्रीकृष्ण आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतील. ते रहस्य आहे. जरी ही शक्यता नव्हती,मी कधीही विचार केला नाही, परंतु मी ते थोडे गंभीरपणे घेतले. भगवद् गीतेवरील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुरांच्या भाष्याचा अभ्यासकरून. भगवद् गीतेतील श्लोक
- व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन (भगवद् गीता 2.41)
या श्लोकाच्या संदर्भात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुरांनी भाष्य लिहिले आहे. की आपण अध्यात्मिक गुरूंच्या उपदेशांचा जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केले पाहिजे अतिशय कडकपणे आपण अध्यात्मिक गुरूंच्या विशिष्ट आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या वैयक्तिक फायद्या तोट्याची पर्वा न करता. तर मी त्या हेतूने थोडा प्रयत्न केला. तर त्याने मला त्याची सेवा करण्याच्या सगळ्या सुविधा दिल्या गोष्टी या टप्प्यापर्यंत येऊन पोचल्या,मी या वृद्धपकाळात तुमच्या देशात आलो. आणि तुम्हीपण ही चळवळ गंभीरतेने घेतलीत, समजण्याचा प्रयत्न केलात. आपल्याला आता काही पुस्तक मिळाली आहेत. म्हणून या चळवळीला काही प्रमाणात भक्कम पाया आहे तर माझ्या अध्यात्मिक गुरूंच्या तिरोभाव दिवशी, मी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे, मी सुद्धा माझ्या इच्छेनुसार तुम्हाला तेच आदेश अमलात आणण्याची विनंती करतो.
मी एक वृद्ध माणूस आहे,मी सुद्धा कुठल्याही क्षणी जाण्याची शक्यता आहे. तो निसर्ग नियम आहे. कोणीही थांबवू शकत नाही. तर ते काही फार आश्चर्यकारक नाही,पण माझ्या गुरु महाराजांच्या तिरोभाव दिवशी माझं तुम्हाला आवाहन आहे. की किमान काही प्रमाणात तुम्हाला कृष्णभावनामृत चळवळीचे सार समजले आहे. तुम्ही ती पुढे नेण्याचा प्रयत्न करा. या चेतनेच्या अभावी लोक दुःख भोगत आहेत जसे आपण रोज भक्तांसाठी प्रार्थना करतो.
- वाञ्छा कल्पतरुभ्यश्च
- कृपासिन्धुभ्य एव च
- पतितानां पावनेभ्यो
- वैष्णवेभ्यो नमो नमः
वैष्णव, किंवा भगवंतांचा भक्त,त्याच आयुष्य समाजाच्या फायद्यासाठी वाहिलेले असते. तुम्हाला माहित आहे - तुमच्यापैकी बरेचजण ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहात - कसे प्रभू येशू ख्रिस्त, त्यांनी सांगितलं की तुमच्या पापकर्मांसाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. तो प्रभूंच्या भक्तांचा निश्चयीपणा आहे. ते स्वतःच्या सुखसोयींची पर्वा करत नाहीत. कारण ते श्रीकृष्णांवर अथवा भगवंतांवर प्रेम करतात, म्हणून ते सर्व जीवांवर प्रेम करतात कारण सर्व जीवांच श्रीकृष्णांशी नातं आहे. त्याचप्रमाणे आपण शिकलं पाहिजे. ही कृष्णभावनामृत चळवळ म्हणजे वैष्णव बनणे आणि इतरांच्या व्यथा जाणणे.
तर मानवाच्या व्यथा समजणे, निरनिराळे दृष्टीकोन आहेत कोणीतरी मानवाच्या जीवनाच्या शारीरिक संकल्पनेच्या दुःखांचा विचार करेल. कोणीतरी रोग्यांना आराम मिळण्यासाठी. रुग्णालय सुरु करण्याचा प्रयत्न करेल कोणीतरी दारिद्रग्रस्त देश किंवा ठिकाणी अन्न वाटप करण्याचा प्रयत्न करेल. या गोष्टी नक्कीच खूप छान आहेत, पण मानवतेचे वास्तविक दुःख हे कृष्ण चेतनेच्या अभावामुळे आहे. हे शारीरिक त्रास, हे तात्पुरते आहेत, त्यांनी निसर्गनियमांवर मात करता येणार नाही. समजा जर तुम्ही काही दारिद्रग्रस्त देशामध्ये अन्नाचे वाटप केलेत. त्याचा अर्थ असा नाही की ही मदत संपूर्ण समस्येचे निराकरण करेल. . वास्तविक फायदेशीर काम प्रत्येक व्यक्तीला कृष्णभावनेकडे येण्याचे आवाहन करणे.