MR/Prabhupada 0168 - विनम्र आणि सौम्य बनण्याची संस्कृती



Room Conversation -- February 4, 1977, Calcutta


प्रभुपाद: आपण भिक्षा मागू शकतो. भारतामध्ये आजही, उच्च विद्वान संन्यासी भिक्षा मागतात. ते मान्य आहे. भिक्षु. ते त्रिदंडी-भिक्षु. तर वैदिक संस्कृतीत भिक्षा मागणे बेकायदेशीर किंवा लज्जास्पद नाही - योग्य व्यक्तीकडून ब्रम्हचारी, संन्यासींना भिक्षा मागण्याची परवानगी आहे. आणि ते उघडपणे. त्रिदंडी-भिक्षु भक्षू म्हणजे भिकारी.

सत्वस्वरूप:त्रिदंडी-भिक्षु.

प्रभुपाद: हो. इथे, भारतीय संस्कृतीत, ब्रम्हचारी,संन्यासी आणि ब्राम्हण, त्यांना दान मागण्याची परवानगी आहे. ती वैदिक संस्कृती आहे. गृहस्थ त्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वागवतात. हे नातं आहे.

सत्वस्वरूप: परंतु काय होईल, असं जिथे संपूर्ण वेगळी संस्कृती आहे तिथे केलं?

प्रभुपाद: म्हणून तिथे हिप्पी आहेत. ही तुमची संस्कृती - धर्माच्या नावाखाली हिप्पी, आणि खुनी. ही त्यांची संस्कृती. आणि गर्भपात. कारण तिथे अशी काही संस्कृती नाही, म्हणून त्याचा परिणाम गर्भपात. आणि हत्या आणि दारुगोळा फेकणे (bombing),संपूर्ण वातावरण त्रासदायक बनवणे ही तुमची संस्कृती. प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यात संघर्ष, आणि दारूगोळा फेकणे... लोक घाबरतात. ते बाहेर रस्तावर जाऊ शकत नाहीत. ही तुमची संस्कृती. आणि भिक्षा मागणं वाईट आहे. लोकांना,संपूर्ण जनतेला भीतीदायक अवस्थेत ठेवणे, ते खूप चांगलं आहे, आणि जर कोणी नम्रपणे भिक्षा मागितली,तर ते वाईट आहे. ही तुमची संस्कृती. वैदिक संस्कृती नम्रपणा शिकण्यासाठी ब्रम्हाचारींना भिक्षा मागायला परवानगी देते, भिकारी बनण्यासाठी नाही. खूप मोठया,मोठ्या कुटुंबातून आलेले, ते त्याचा सराव करतात. हे भिक मागणे नाही. हे विनम्र आणि सौम्य बनणे शिकण्यासाठी आहे. आणि ख्रिस्ताने सांगितलंय," विनम्र आणि सौम्य लोकांसाठी, देव प्राप्त होणं सोपं असत. हे भिक्षा मागणे नाही. तुम्हाला माहित नाही हि काय संस्कृती आहे. तुमची स्वतःची संस्कृती आहे. आसुरी संस्कृती, अगदी स्वतःच्या मुलाची हत्या करणं. तुम्हाला कस कळणार ही काय संस्कृती आहे? मी बरोबर आहे की चूक?

सत्वस्वरूप: तुम्ही बरोबर आहात.

प्रभुपाद: हो, एका पत्रात उल्लेख आहे. तुमची चोथ्या-दर्जाची , दहाव्या-दर्जाची संस्कृती आहे. तुम्हाला नम्र आणि सहनशील बनण्याची संस्कृती कशी समजणार?

सत्वस्वरूप: वकील आमच्यावर खटला चालवण्याचा प्रयत्न करत होता,आदी-केशव, त्याने त्याची रणनीती उघड केली. कारण अनेक वकिलांचा म्हणणं होत की आम्हाला आमच्या धर्माचे आचरण करायचे अधिकार आहेत . ते म्हणाले हे धर्माचे स्वातंत्र आहे...

प्रभुपाद:मुक्त.. हा प्रामाणिक धर्म आहे.

सत्वस्वरूप: "त्यांनी सांगितलं हा धर्माचा प्र्श्न नाही."त्यांनी सांगितलं,"आपण काय आहोत... " त्यांनी सांगितलं,"मनावर नियंत्रण ठेवण्याचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. हा प्रत्येकाच्या स्वेच्छेचा प्रश्न आहे. मला वाटत नाही एखादी व्यक्ती योग्य मनस्थितीत दुसऱ्या कोणाला आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला परवानगी देईल ज्याप्रमाणे संमोहनाच्या पद्धतीत,"

प्रभुपाद: मनावर नियंत्रण सर्वकाही आहे.

सत्वस्वरूप: सर्वकाही.

प्रभुपाद: तुम्ही प्रयत्न करत आहात. आता ते सुद्धा मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली माणसं जबरदस्तीने नेऊन. हे आणखी एक मनावर नियंत्रण ठेवणं आहे. त्यांनी आधीच त्यांचं मन आम्हाला दिलंय आणि तुम्ही जबरदस्तीने त्यांच्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत हे मानसिक नियंत्रण नाही? इथे त्याच मन आधीपासूनच कृष्णभावनेत आहे, आणि जबरदस्तीने तुम्ही त्याला विचलित करण्याचा प्रयत्न करत आहात हे मानसिक नियंत्रण नाही? " आणि तुमचं मनावर नियंत्रण ठेवणं चांगलं आणि माझं मनावर नियंत्रण ठेवणं वाईट."हे तुमचं तत्वज्ञान आहे. तर जोकोणी, कोणी दुष्ट, सांगेल, "माझे काम चांगले आणि तुमचे काम वाईट."