MR/Prabhupada 0172 - श्री कृष्णांना शरण जाणे हाच खरा धर्म आहे



Lecture on SB 1.5.30 -- Vrndavana, August 11, 1974


श्रीकृष्णांना शरण जाणे, तो धर्म आहे. नाहीतर, जसे श्रीमद्-भागवतात नमूद केलंय,धर्म: प्रोज्झितकैतवोsत्र (श्रीमद्-भागवत 1.1.2) श्रीमद्-भागवतातुन धर्माच्या पद्धतीतील सगळ्या फसव्या प्रकारांना काढून टाकलं आहे हाकललं आहे,प्रोज्झित भगवंतांमध्ये एकरूप बनणे, देव बनण्यासाठी,भगवंतांचे अवतार बनण्यासाठी. श्रीमद्-भागवतातुन अश्या प्रकारच्या धार्मिक पद्धती मुळापासून उखडून टाकल्या आहेत. कारण तो धर्म नाही. खरा धर्म श्रीकृष्णांना शरण जाणे हा आहे. म्हणून असं सांगितलंय यत्तत् साक्षात्भगवतोदितम् जर तुम्हाला भगवंतांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला भगवंतांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. पण त्यांना कल्पना नाही की भगवंत कोण आहेत. त्यांच्या आज्ञा काय आहेत,आपलं त्याच्याबरोबर काय नातं आहे.... या गोष्टी अज्ञात आहेत, त्या केवळ त्यांना ज्ञात होतात, मला म्हणायचं आहे, भक्तांना. भक्तांची का मक्तेदारी आहे? त्याचं सुद्धा उत्तर भगवद् गीतेत दिल आहे

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः (भगवद् गीता 18.55)

जर तुम्हाला देव म्हणजे काय,श्रीकृष्ण म्हणजे काय, जाणून घ्यायची इच्छा असेल, मग तुम्हाला भक्ती मार्गाने गेले पाहिजे दुसरा कोणताही मार्ग नाही. श्रीकृष्णांनी कधीही सांगितलं नाही की त्यांना निरनिराळी अनुमान काढून किंवा तथाकथित तात्विक ज्ञानाने जाणता येईल मग त्यांनी सांगितलं असत "एखादा मला ज्ञानाने समजू शकतो." नाही. एखादा कर्म नाहीतर योग कशानेही जाणू शकणार नाही. हे शास्त्रात अनेक ठिकाणी स्पष्ट केलं आहे. केवळ भक्ती. केवळ भक्ती. आणि भक्ती पंथाचा प्रचार करणे हे अध्यात्मिक गुरु,किंवा महात्मा,यांचं कर्तव्य आहे. ते सर्वात गोपनीय आहे... ते सर्वात दयाळू मानवतावादी कर्म आहे. कारण या ज्ञानाच्या अभावी लोक दुःख भोगत आहेत. म्हणून आपली कृष्णभावनामृत चळवळ ही एकमेव चळवळ आहे - मी अभिमानाने घोषित करू शकतो - जी खरंतर मानवी समाजाचा काही प्रमाणात फायदा करून देऊ शकेल. हि एकमेव चळवळ आहे. बाकी सगळ्या बनावट संघटना आहेत,मी घोषित करतो. ते येऊन आणि शास्त्राचा अभ्यास करू देत आणि ते स्वतः ठरवू देत. ते सर्व फसवणूक करतात. केवळ ही भगवद-भक्ती. कारणं तुम्ही भगवंताना भगवद सेवेच्या प्रक्रिये शिवाय जाणू शकणार नाही.

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः (भगवद् गीता 18.55)

जर तुम्हाला सत्य जाणायची इच्छा असेल,तत्त्वतः... श्रीकृष्णांची इच्छा आहे की त्यांना एखाद्याने तत्त्वतः जाणले पाहिजे. श्रीकृष्णांना ग्राह्य धरू नका, की "तो गोपींचा अत्यंत आवडता होता आणि चला आता आपण श्रीकृष्णनच्या दिव्य लीला ऐकुया." श्रीकृष्णांच्या गोपी लीलाच का? श्रीकृष्णांच्या दानवांना मारण्याच्या लीला का नाही? लोकांना त्यात स्वारस्य नाही, श्रीकृष्णांच्या दानवांना मारण्याच्या लीला ऐकण्यात रस नाही. कारणं गोपीलीला, तरुण स्त्री आणि पुरुषांच्यामधील व्यवहार असल्याचे दिसते. ते त्वरित आकर्षित करते. पण श्रीकृष्णांच्या इतर लीलापण आहेत.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् (भगवद् गीता 4.8)

त्यासुद्धा कृष्णलीला आहेत. त्या कृष्णलीला आहेत.ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र त्यांनी रावणाचा वध केला. त्यासुद्धा कृष्णलीला आहेत. प्रभू रामचंद्रांच्या लीला आणि कृष्णलीला तिथे... तर आपण कोणत्याही कृष्णलीला श्रेष्ठ समजल्या पाहिजेत. असं नाही की फक्त अतिशय गोपनीय... वृन्दावन लीला, गोपींबरोबरच्या कृष्णलीला, अतिशय गोपनीय लीला आहेत. जोपर्यंत आपण मुक्त होत नाही. तोपर्यंत आपण या गोपनीय लीलांचा आनंद घेऊ नये हा खूप अवघड विषय आहे. आणि कारण त्यांना कृष्णलीला काय आहे समजू शकत नाही. त्यामुळे त्यांचं अधःपतन आहोत. अशा अनेक गोष्टी आहेत. आम्ही चर्चा करू इच्छित नाही. पण आपण असावे... जर आपण खरोखरंच कृष्णलिलांमध्ये प्रगती करण्याबाबत गंभीर आहोत. मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा श्रीकृष्ण काय आहेत माहित असलं पाहिजे. श्रीकृष्णानची काय इच्छा आहे,आणि आपण कस वागलं पाहिजे मग आपण श्रीकृष्णांच्या गोपनीय भागामध्ये प्रवेश करू शकतो. अन्यथा आपण गैरसमज करून घेऊ आणि आपले अधःपतन होईल.