MR/Prabhupada 0179 - आम्ही कृष्णा यांच्या फायद्यासाठी काम करणे आवश्यक आहे



Lecture on SB 1.16.6 -- Los Angeles, January 3, 1974

हे मायावादी तत्वज्ञानी, ते उच्च पदाला जाऊ शकतात आपल्या ज्ञानाने, तर्क करून, पण पुन्हा त्यांचे पतन होते. का? अनाद्र्त​-युष्मद्-अङ्ह्रयः "कारण त्यांना तुमच्या कमळ चरणी आश्रय मिळाला नाही, त्यामुळे त्यांचे पतन होईल." ते सुरक्षित नाही. कारण मनुष्य कोणत्याही क्रियाकलाप शिवाय राहू शकत नाही. तीव्र इच्छा व्यतिरिक्त. हे शक्य नाही. एक मनुष्य, प्राणी, कोणत्याही, अगदी किटक, त्याने काहीतरी करत असणे आवश्यक आहे. मला प्रात्यक्षिक अनुभव आला आहे. माझ्या मुलांपैकी एक मूल..., जेव्हा मी तरुण होतो, तो फार नटखट होता. त्यामुळे काहीवेळा आम्ही त्याला फळिवर ठेवायचो. तो खाली येऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याला इतके अस्वस्थ वाटत होते कारण फळिवर त्याचा क्रियाकलाप थांबून जायचा. त्यामुळे तुम्ही क्रियाकलाप थांबवु शकत नाही. ते शक्य नाही. आपण चांगले क्रियाकलाप देणे आवश्यक आहे. मग तुम्ही थांबाल. परं दृष्ट्वा निवर्तते (भ.गी.२.५९).

त्यामुळे ही कृष्णभावनाभावित चळवळ तुम्हाला चांगला क्रियाकलाप करायला लावते. त्यामुळे आपण कनिष्ठ क्रियाकलाप सोडू शकता. अन्यथा, फक्त नकारात्मक राहून, हे शक्य नाही. आम्ही काम करणे आवश्यक आहे. आम्हाला श्रीकृष्णांसाठी काम करणे आवश्यक आहे. आम्हाला श्रीकृष्णांच्या देवळात जायला पाहिजे, किंवा आम्हाला श्रीकृष्णांची पुस्तके विकावयास जायला पाहिजे, किंवा श्रीकृष्णांच्या भक्तांच्या सहवासात राहीले पाहिजे. ते छान आहे. पण तुम्ही क्रियकलाप थांबवु शकत नाही. ते शक्य नाही. नंतर आपला निष्क्रिय मेंदू दानवाची कार्यशाळा होईल. होय. मग तुमचे पतन होईल, "त्या स्री कडे कसे जाऊ? त्या पुरुषा कडे कसे जाऊ?" जर तुम्ही क्रियाकलाप थांबविले, तर तुम्हाला परत इँद्रीय तृप्ती साठी क्रियाकलाप करावा लागेल. हेच सर्व काही. त्याचप्रमाणे, तुम्ही कुठलीही ज्ञानेंद्रिये घ्या: तुम्ही ती थांबवु शकत नाही, परंतु तुम्हाला ती व्यस्त ठेवायची आहेत, ती कृष्णभावना आहे.