MR/Prabhupada 0181 - मी सलगीने देव संबंधित जाईल



Evening Darsana -- August 9, 1976, Tehran

प्रभुपाद: आध्यात्मिक प्रशिक्षण म्हणजे सर्व प्रथम तुम्हाला थोडीशी श्रद्धा असली पाहिजे की "माझा भगवंता बरोबर दृढ संबध असेल." जर तुमची अशी श्रद्धा नसेल तर, आध्यात्मिक प्रशिक्षणाचा प्रश्नच उद्भवत नाही. जर तुम्ही फक्त समाधानी राहिलात, "देव महान आहे, त्याला त्याच्या घरी राहू दे, मी पण माझ्या घरी राहतो," ते प्रेम नाही आहे. आपण अधिकाधिक दृढपणे देवाला जाणून घेण्यासाठी उत्सुक असला पाहिजेत. मग पुढचा टप्पा आहे, देवा बद्धल कसे जाणून घ्यावे जोपर्यंत तुमचा अशा लोकांशी संबंध येत नाही जे फक्त देव कार्यातच व्यस्त असतात. त्यांच्या कडे आणि कुठलेच कार्य नसते. ज्याप्रकारे आम्ही लोकांना शिकवतो, ते फक्त देव कार्या साठीच असतात. त्यांना दुसरे कुठलेच कार्य नसते. लोक देवाला कसे जाणु शकतील, त्यांना कसा फायदा होईल, ते अनेक प्रकारे फक्त नियोजन करतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या लोकांशी संबंध ठेवायचा आहे ज्यांना देवाबद्धल खात्री आहे आणि सर्व जगाला त्याचे ज्ञान प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला त्यांच्यात मिसळले पाहिजे, त्यांच्याशी संबंध ठेवला पाहिजे. सर्व प्रथम, तुम्हाला श्रद्धा असली पाहिजे की "ह्या जन्मात पूर्णपणे मी देवा बद्धल जाणून घेईन." नंतर अशा लोकांशी संबध ठेवा जी देव कार्यात व्यस्त आहेत. नंतर तुम्ही तसेच करा जसे ते करत आहेत. नंतर तुमचे भौतिक जीवना बद्धालचे गैरसमज समाप्त होतील. नंतर तुम्हाला लळा लागेल. मग तुम्हाला गोडी लागेल. अशा प्रकारे तुमचे देवा बद्धलचे प्रेम विकसित होईल.

अली: मला आधी पासूनच श्रद्धा आहे.

प्रभुपाद: तुला ती आणि वाढवावी लागेल. फक्त प्राथमिक विश्वास, फार चांगला आहे, परंतु जोपर्यंत ती श्रद्धा अधिकाधिक वाढत नाही, तोपर्यंत प्रगती नाही आहे.

परिव्राजकाचार्य​: ती श्रद्धा गमावण्याचा धोका आहे.

प्रभुपाद: होय, जर तुम्ही प्रगती करण्याचा प्रयत्न केला नाही आणि उत्तरोत्तर पुढे गेलात, तर तिथे धोका आहे जी काही थोडीशी श्रद्धा आहे, ती कमी होत जाईल.