MR/Prabhupada 0184 - तुमची आसक्ती भौतिक ध्वनीकडून अध्यात्मिक ध्वनीकडे वळवा



Lecture on SB 3.26.47 -- Bombay, January 22, 1975


तर ध्वनी खूप महत्वाची गोष्ट आहे. या भौतिक जगात ध्वनी हे आपल्या बंधनाचे कारण आहे . जसे मोठमोठ्या शहरांमध्ये ,ते सिनेमा कलाकारांनी निर्माण केलेल्या ध्वनिफीतिच्या प्रेमात आहेत . आणि तितकेच नव्हे तर, रेडिओ संदेशाद्वारे आम्ही इतर अनेक गोष्टी ऐकत आहोत. आणि कारण हे सर्व भौतिक आवाज आहे, आपण भौतिकदृष्ट्या अडकलो आहोत, अधिक आणि अधिक फसलो आहोत. काही अभिनेत्री, काही सिनेमा कलाकार, गातात , आणि त्या गायनात इतके मंत्रमुग्ध होतात, की कलाकाराला एका गाण्यासाठी पंधरा हजार रूपये दिले जातात. इथे मुंबईमध्ये असे बरेच लोक आहेत. तर पहा फक्त या भौतिक आवाजासाठी किती आकर्षण आहे. हे पहा. त्याचप्रमाणे, हि आवड जर आपण हरे कृष्ण महा-मंत्रांकडे वळवली तर आपण मुक्त होऊ, तोच आवाज. एक भौतिक आहे; एक अध्यात्मिक आहे . त्यामुळे आपण या आध्यात्मिक ध्वनी ची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करा . मग आपले जीवन यशस्वी होईल.

चेतो-दर्पण-मार्जनम भव_महा-दावाग्नि-निर्वापनम श्रेय:-कैरव-चंद्रिका-वितरनम विद्या-वधु-जीवनम.
अानन्दामबुधि-वर्धनम प्रति-पदम पूरनाम्रतस्वादनम परम विजयते श्री-कृष्ण-संकीर्तनम (चै च अन्त्य 20.12)

त्यामुळे हि कृष्ण भावनामृत चळवळ याच हेतूसाठी आहे, की "आधीच तुम्हाला ध्वनी ची आवड आहे . आता फक्त हि आसक्ती आध्यात्मिक ध्वनी कडे वळवा.मग आपले जीवन यशस्वी होईल. हेच हरे कृष्ण आंदोलन आहे, लोकांना शिकवणे भौतिक आवाजाकडून अध्यात्मिक वाणीकडे कसे वळावे. म्हणून नरोत्तम दास ठाकूर गातात , गोलोकेर प्रेम-धन, हा आध्यात्मिक जगातून येणारा आवाज आहे ,गोलोकेर प्रेम-धन , जप करून , हा आवाज ऐकून ,आपण देवाबद्दलचे आपले मूळ सुप्त प्रेम विकसित केले पाहिजे, त्याची गरज आहे ,प्रेम-पुमार्थो महान . भौतिक जगात आम्ही स्वीकार करीत आहोत-

धर्मार्थ-काम-मोक्ष (श्री भ 4.8.41)

खूप महत्वाचे आहेत. पुरुषार्थ: धर्म, धार्मिक बनणे आणि धार्मिक बनून आपण आपले आर्थिक विकास घडवू शकतो. धनम देही, रुपम देवी, यशो देवी, देही देही . काम . देही देही का? आता, कर्म , आपली इच्छा, वासनांच्या पूर्ततेसाठी. धर्मार्थ-काम , आणि जेव्हा आपण वासना पूर्ण करू शकत नाही किंवा इच्छा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा आपण मोक्ष मागतो , भगवंताशी एकरूप होण्यासाठी. हे चार प्रकारचे भौतिक व्यवसाय आहेत . पण आध्यात्मिक व्यवसाय म्हणजे प्रेम-पुमार्थो महान . सर्वोच्च परमेश्वराचे प्रेम प्राप्त करणे, ही सर्वोच्च परिपूर्णता आहे. प्रेम पुम-अर्थो महान . म्हणून आयुष्याचे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी,प्रेम पुम-अर्थो महान , या युगात विशेषत: कली-युगात , कारण आपण इतर कोणत्याही गोष्टी करू शकत नाही, हे अतिशय अवघड आहे. वेळ पूर्ण विघ्नांनी भरली आहे. म्हणूनच कलौ ... ही पद्धत आहे,

हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम: (चै. च. आदी 17.21)

" हरे कृष्ण मंत्र जपा " , केवलम," केवळ. कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिर अन्यथा . कली-युगात, कळतं मुख्य व्यवसाय आहे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे ...

भुत्वा भुत्वा प्रलियते (BG 8.19).

लोकं हे सुद्धा समजु शकत नाहीत कि आमचे खरे दुःख काय आहे. कृष्ण म्हणते, ईश्वराचे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व वैयक्तिकरित्या सांगत आहे, " हि तुमची दुःखे आहेत". काय?

जन्म-मृत्यु-जरा-व्याधी: (भ गि 13.9)

"जन्म आणि मृत्युची पुनरावृत्ती. ही तुमचे वास्तविक दुःख आहे." जे तुम्ही या दुखांबद्दल किंवा त्या दुःखाबद्दल विचार करीत आहात? ते सर्व तात्पुरते आहेत. ते सर्व भौतिक निसर्गाच्या नियमांच्या आधिन आहेत . तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही.

प्रकृते क्रियमानानि गुणै: कर्मानि सर्वश: (भ गि 3.27)

प्रकृती तुम्हाला काहीतरी करण्यास भाग पाडेल कारण आपण निसर्गाच्या भौतिक पद्धती दूषित केल्या आहेत. म्हणून आपल्याला या प्रकृति, भौतिक निसर्गाच्या निर्देशानुसार कर्म करावे लागतील . आणि जो पर्यंत आपण या भौतिक निसर्गाच्या अधिपत्याखाली आहोत , तुम्हाला हे जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग यांना मान्य करावेच लागेल. हे आपले खरे दुःख आहे.