MR/Prabhupada 0186 - देव देव आहे. ज्याप्रमाणे सोने सोने आहे
Lecture on BG 7.1 -- Fiji, May 24, 1975
तर आपण फिजी किंवा इंग्लंडमध्ये किंवा कुठेही रहात असू , कारण कृष्ण सर्व गोष्टींचा मालक आहे , सर्वत्र ...
- सर्व-लोक-महेश्वरम (भ गी ५।२९)
तर फिजी हा सर्व-लोकाचा एक छोटासा भाग आहे. म्हणून जर तो सर्व लोकाचा मालक असेल तर तो फिजीचा सुद्धा मालक आहे.यात काही शंका नाही. तर फिजीचे रहिवासी आपण कृष्ण भावनामृत स्वीकारता , तर ती जीवनाची परिपूर्णता असेल . ही जीवनाची परिपूर्णता आहे. कृष्णाच्या निर्देशापासून विचलित होऊ नका. अगदी थेटपणे ,भगवान उवाच, भगवान थेट बोलत आहे. आपण त्याचा फायदा घ्या .जगाच्या सर्व समस्यांचे निराकरण मिळेल जर तुम्ही भगवद् गीतेचा आश्रय घ्याल आपण कोणतीही समस्या सादर करा,तिथे उत्तर मिळेल , तुम्ही उपाय घ्या. आजकाल ते अन्नटंचाईचा सामना करत आहेत. भगवत-गीते मध्ये उपाय आहे . कृष्ण म्हणतो,
- अन्नाद भवंती भूतानी: (भ गी ३. १४)
"भूतानी, सर्व जीवित प्राणी, प्राणी आणि मनुष्य दोन्ही, ते खूप छानपणे जगू शकतात, कुठल्याही चिंतेशिवाय , जर त्यांना पुरेसे अन्न धान्य मिळत असेल तर." "आता यावर तुमचा काय आक्षेप आहे? हे उत्तर आहे. कृष्ण म्हणतो, अन्नाद भवंती भूतानी . तर हे स्वप्न नाही , व्यावहारिक आहे . मनुष्य आणि प्राणी यांना खाण्यासाठी पुरेसे अन्न असले पाहिजे , आणि सर्वकाही लगेच शांतिमय होईल. कारण लोक , जर एखादा उपाशी असेल तर तो लगेच अस्वस्थ होतो , तर त्याला सर्वात आधी जेवण द्या . तो कृष्णाचा आदेश आहे . हे अतिशय अशक्य, अव्यवहार्य आहे का? नाही. तुम्ही अधिक अन्न पिकवा आणि वितरित करता. इतकी जमीन आहे, पण आम्ही अन्न पिकवत नाही आहोत. आम्ही उत्पादन साधने आणि मोटर टायर्समध्ये वाढ करण्यात व्यस्त आहोत. मग आता मोटर टायर खा. पण कृष्ण म्हणतो की "तुम्ही अन्न पिकवा ." मग टंचाईचा प्रश्नच नाही. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न-सम्भव: पण अन्नाची निर्मिती होते जेव्हा पुरेसा पाऊस असतो.
- पर्जन्याद अन्न-सम्भव: आणि यज्ञाद भवति पर्जन्य: (भ गी ३।१४)
आणि जर तुम्ही यज्ञ कराल तर नियमित पाऊस होईल. हा मार्ग आहे. पण यज्ञांविषयी कोणालाही रस नाही, अन्नधान्याबद्दल कोणालाही कुतूहल नाही. आणि जर आपण स्वतःची आपल्यासाठी टंचाई निर्माण केली तर ती देवाची चूक नाही; तो तुमचा दोष आहे. तर कुठलाही प्रश्न घ्या - सामाजिक, राजकीय, तात्त्विक, धार्मिक कोणताही प्रश्न घ्या आणि तिथे उपाय आहे जसे भारत जाति व्यवस्थेचा सामना करत आहे. बरेच जण जातिव्यवस्थेच्या बाजूने आहेत, आणि बराच जण विरोधात . पण कृष्ण उपाय सांगतो , त्यामुळे पक्षपातीपणाचा प्रश्नच राहत नाही. जात व्यवस्थेची गुणवत्ताानुसार नियुक्त करावी. चातुर-वर्न्यम मया स्रश्टम गुण-कर्म (भ गी ४।१३) । तो कधीही म्हणत नाही, "जन्माने". आणि श्रीमद -भागवतं मध्येही याची पुष्टी होते,
- यस्य यल लक्षनम प्रोकतम् पुमसो वर्णाभिव्यन्जकम
- यद अन्यत्रापि द्रष्येत तत तेनैव विनिर्दिशेत (श्री भ ७।११।३५)
नारदमुनिंची स्पष्ट सूचना. तर आपल्याला वैदिक साहित्यात सर्व गोष्टी अचूक मिळतील .आणि आपण जर अनुसरण केले ... कृष्ण भावनामृत आंदोलन लोकांनाहे तत्त्व शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही काहीही उत्पादन करत नाही. ते आमचे काम नाही. कारण आम्हाला माहित आहे की आम्ही अपूर्ण आहोत. म्हणून जरी आम्ही काही उत्पादन केले तरी ते अपूर्णच असेल . आपल्या सशर्त जीवनात आपल्याकडे चार दोष आहेत: आपण चूक करतो , भ्रमित होतो, इतरांना फसवतो आणि आपली इंद्रिये अपूर्ण आहेत . तर आपण अशा व्यक्तींपासून परिपूर्ण ज्ञान कसे प्राप्त करू शकतो, माझे म्हणणे आहे जो हे सर्व दोष धारण करतो ? म्हणूनच आपण सर्वोच्च व्यक्तीकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे ,जो या दोषांपासून मुक्त आहे ,मुक्त-पुरूष. हे परिपूर्ण ज्ञान आहे . तर आमची विनंती आहे कि तुम्ही भगवद्गीतेतून ज्ञान घ्या आणि त्यानुसार कृती करा. तुम्ही काय आहात याने काही फरक पडत नाही. भगवंत सर्वांसाठी आहे. देव देव आहे. ज्याप्रमाणे सोने सोने आहे. जर हिंदूने सोने हाताळले तर ते हिंदु सुवर्ण बनत नाही. किंवा सोने ख्रिश्चनाणे हाताळले जाते, ते ख्रिश्चन बनत नाही .सोने हे सोने आहे . त्याचप्रमाणे, धर्म एक आहे. एकच धर्म आहे. तिथे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असे असू शकत नाही. ते कृत्रिम आहे. जसे "हिंदू सोने," "मुस्लीम सोने" ते शक्य नाही. सोने हे सोने आहे . त्याचप्रमाणे धर्म. धर्म म्हणजे देवाने दिलेला नियम. तो धर्म आहे.
- धर्मम् तु साक्शाद भगवत-प्रनीतम
- न वै विदुर देवता: मनुष्या: (श्री भ ६।३।१९)
तसेच - मी फक्त विसरलो - "धर्म, धर्मा ची तत्त्वप्रणाली, धार्मिक व्यवस्था, देवाने नियुक्त केली आहे किंवा देवाने दिलेली आहे." तर देव एक आहे म्हणून धर्म, किंवा धार्मिक प्रणाली सुद्धा एकाच असली पाहिजे . दोन असू शकत नाही.