MR/Prabhupada 0191 - कृष्णाला आधीन ठेवणे हे वृंदावन जीवन आहे



Lecture on SB 6.1.52 -- Detroit, August 5, 1975


प्रभुपाद: कृष्णाच्या कृपेने , गुरूंच्या कृपेने , दोन्ही ... फक्त एकाचीच कृपा मिळवण्याचा प्रयत्न करू नका. गुरु कृष्ण कृपाए पाए भक्ति-लता-बीज. गुरूच्या कृपेमुळेच एखाद्याला कृष्ण मिळू शकतो. आणि कृष्ण सेइ तोमार, कृष्ण दिते पारो . गुरुशी संपर्क साधण्याचा अर्थ फक्त त्यांच्याकडून कृष्णाची भीक मागणे . कृष्ण सेइ तोमार. कारण कृष्ण हा भक्तांचा कृष्ण आहे . कृष्ण मालक आहे , पण कृष्णाला कोण नियंत्रित करू शकतो ?त्याचे भक्त .

कृष्ण हा सर्वोच्च नियंत्रक आहे, परंतु तो भक्तांद्वारे नियंत्रित केला जातो .म्हणजेच, कृष्ण भक्त-वत्सल आहे. एका मोठ्या पित्यासारखा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आणि ... एक गोष्ट अशी आहे की पंतप्रधान ग्लेडस्टोन, कोणीतरी त्यांना भेटायला आले होते . आणि श्री. ग्लेडस्टोन यांनी सांगितले की "प्रतीक्षा करा. मी व्यस्त आहे." तर तो खूप तास वाट पाहत राहिला , मग जिज्ञासे पोटी त्याला वाटले : हे गृहस्थ काय करीत आहेत?" म्हणून तो आत पाहायला गेला , त्याने पहिले की ... ते घोडा झाला होते , आणि त्यांनी आपल्या मुलाला पाठीवर बसवले होते . ते हे काम करत होते पाहिलं ? पंतप्रधान, ते ब्रिटीश साम्राज्यावर नियंत्रण ठेवत आहेत,परंतु ते मुलांद्वारे प्रेमामुले नियंत्रित होतात. याला प्रेम म्हणतात. त्याचप्रमाणे, कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहे.

ईष्वर: परम: कृष्ण:
सच-चिद-अानन्द-विग्र:
अनादिर अादिर गोविन्द:
सर्व-कारण-कारणम ( ब्र स ५।१)

तो सर्वोच्च नियंत्रक आहे , परंतु तो त्याच्या भक्तांद्वारे नियंत्रित केला जातो , श्रीमती राधारानी. तो अधीन आहे. त्यामुळे हे सहज समजण्यासारखं जाणार नाही कि त्यांच्या लीलेमध्ये ... पण कृष्ण स्वेच्छेने त्यांच्या भक्तांच्या आधीन आहे . तो कृष्णाचा स्वभाव आहे .आई यशोदा प्रमाणेच. आई यशोदा कृष्णावर अधिकार ठेवते , त्याला बांधून ठेवते : "तू खूप खोडकर आहेस आहेत, मी तुम्हाला बांधून ठेवेन " . यशोदा माई कडे काठी आहे, आणि कृष्ण रडत आहे. या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा. श्रीमद भागवतं मध्ये या नमूद आहेत कुंतीची प्रार्थना "माझ्या प्रिय कृष्णा तू सर्वोच्च आहेस, परंतु जेव्हा आई यशोदेच्या काठीच्या माराने तू रडत आहेस ते दृश्य मी पाहू इच्छिते ".

तर कृष्ण इतका भक्त-वत्सल आहे . तो सर्वोच्च नियंत्रक आहे. परंतु भक्त जसे आई यशोदा ,राधाराणी ,गोपी, भक्त जसे गोप , ते कृष्णावर नियंत्रण ठेवू शकतात. हे वृंदावन जीवन आहे . तर हि कृष्ण भावनामृत चळवळ तुम्हाला तेथे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. मूर्ख लोक, ते विचलित होत आहेत. या कृष्ण भावनामृत चळवळीचे मूल्य काय आहे हे त्यांना माहिती नाही. ते मानवी समाजाला श्रेष्ठ लाभ , स्थान देण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते देवाबरोबर एकरूप होऊ इच्छित नाही, पण ते देवावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देत आहेत. ही कृष्ण भावनामृत चळवळ आहे. खूप धन्यवाद . भक्त: जय !