MR/Prabhupada 0203 - या कृष्ण भावनामृत आंदोलनाला थांबवू नका
Lecture and Initiation -- Chicago, July 10, 1975
प्रभुपाद: यज्ञ, बलिदान ... यज्ञ-दान-तप:-क्रिया । मनुष्य जीवन यज्ञ करण्यासाठी आहे , दान देण्यासाठी आणि तपस्येसाठी आहे . तीन गोष्टी . ते मनुष्य जीवन आहे. मनुष्य जीवन म्हणजे कुत्र्या-मांजरांप्रमाणे जगण्यासाठी नाही आहे . ते अपयश आहे . त्या प्रकारची संस्कृती , श्वान संस्कृती , ते मनुष्य जीवनाचे अपयश आहे . मनुष्य जीवन तीन गोष्टींसाठी आहे :
यज्ञ-दान-तप:-क्रिया
आपल्याला माहित असले पाहिजे कि यज्ञ कसे केले पाहिजे , दान कसे करावे . आणि तप कसे करावे . ते मनुष्य जीवन आहे . तर यज्ञ-दान-तपस्या, दुसऱ्या युगात ते साधनाप्रमाणे करायचे . जसे सत्य युग , वाल्मिकी मुनी , त्यांनी साठ हजार वर्षे तप , ध्यान यांचा सराव केला . त्या वेळी लोकं एक लाख वर्षे जगायचे , आता ते शकय नाही . त्या युगात ध्यान शक्य होते पण आता ते शक्य नाही . म्हणून शास्त्र सांगते ,
यज्ञै: संकीर्तन-प्रायै:
तुम्ही हे यज्ञ करा , संकीर्तन . तर सांकीर्तन यज्ञ करून तुम्हाला तोच लाभ मिळेल . जो वाल्मिकी मुनींना साठ हजार। वर्षे तप करून प्राप्त झाला . तुम्हाला तोच लाभ कदाचित काही दिवसाच्या संकीर्तन यज्ञातून मिळेल . ही किती दया आहे . तर मी खूप आनंदी आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये , तुम्ही भाग्यवान मुले आणि मुली या संकीर्तन यज्ञाशी जोडले गेले आहात . लोक स्तुती करत आहेत आणि मी सुद्धा खूप प्रसन्न आहे . तर हा यज्ञ, तुम्ही बस मध्ये मूर्ती घेतली आहे ,अंतर भागात जाऊन आणि यज्ञ करून ... ती प्रक्रिया चालू ठेवा जोपर्यंत पूर्ण देश , राष्टीय स्तरावर या संप्रदायाला स्वीकारत नाही .
भक्त : जया !
प्रभूपाद : ते स्वीकार करतील , चैतन्य महाप्रभूंनी त्याचे भाकीत केले आहे . पृथ्वीते आचे यत् नगरादि -ग्राम सर्वत्र प्रचार हैबे मोरा नामा चैतन्य महाप्रभूंनी इच्छा प्रकट केली की प्रत्येक गावामध्ये , प्रत्येक नगरामध्ये ,प्रत्येक देशामध्ये , प्रत्येक शहरामध्ये , ही संकीर्तन चळवळ तिथे जाईल , आणि लोक चैतन्य महाप्रभूविषयी कृतकृत्य होतील . "हे प्रभू तू मला इतकी उदात्त गोष्ट दिली आहेस " हे भाकीत आहे . आपल्याला फक्त आपले उच्चतम प्रयत्न करायचे आहेत . तर हे फार कठीण नाही . तुम्ही देवाची स्थापना केली आहे . वेगवेगळ्या बस मध्ये जा आणि नगर नगर , शहरो शहरो , गावो गावी जा . आणि तुम्ही आता अनुभव घेतला आहे , तर या चळवळीचा विस्तार करा . जसे मे तुम्हाला वारंवार सांगितले आहे , तुमचा देश , अमेरिका , खूप भाग्यवान आहे , आणि त्यांना फक्त याची गरज आहे , संकीर्तन ...मग ते पूर्ण होतील . मी काल खूप गोष्टींवर चर्चा करत होतो - कदाचित तुम्ही पेपर वर पाहिले असेल - सखोल तपासणी आवश्यक आहे , अध्यात्मिक तपासणी . सद्य स्तिथीत गोष्टी खूप चांगल्यापणे घडत नाही आहेत . भौतिक दृष्ट्या , नाराज होऊ नका की या गोष्टी मला अध्यात्मिक जीवनात उपयोगी नाहीत . भौतिकदृष्ट्या प्रगत व्हा , पण तुमचे अध्ययमिक अस्तित्व आणि कर्तव्य विसरू नका . मग ते नुकसान असेल . मग ते असेल
श्रम एव हि केवलम (श्री. भ. १।२।८) ,
फक काम करणे , काहीही मिळवण्याची इच्छा नाही . जसे तुमचे चंद्रवरचे शोध , फक्त वेळेचा अपव्यय आणि पैशाचा वायफळ खर्च . तुम्ही करोडो रुपये खर्च केले आणि तुम्हाला काय मिळाले ? थोडीशी धूळ , बस . त्या पद्धतीने मूर्ख बनू नका . व्यवहारिक व्हा . जर इतका अफाट पैसा , डॉलर्स खर्च केले असते , कृष्ण भावनामृत चळवळ तुमच्या संपूर्ण देशात पसरवायला , असीम फायदा झाला असता . जाऊदे , आपण काही बोलू शकत नाही . तुमचा पैसा तुम्ही उधळू शकता , तो तुमचा आहे . पण आम्ही अधिकाऱ्यांना आणि बुद्धिमान पुरुषांना विनंती करेन की तुम्ही ही संकीर्तन चळवळ स्वीकारा विशेषतः अमेरिकेमध्ये , आणि याचा जगाच्या इतर भागांत युरोप , आशिया तिथे विस्तार करा . तुम्हाला आधीच जगातील श्रीमंत देश म्हणून मान मिळाला आहे . तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे . तुमच्याकडे सर्व आहे . फक्त ही चळवळ स्वीकार , हरे कृष्ण चळवळ , संयमाने , मेहनतीने , आणि बुद्धीने . ते खूप सोपे आहे . तुम्ही आधीच अनुभव घेतला आहे . ते थांबवू नका . त्यात अधिक आणि अधिक वृद्धी करा . तुमचा देश सुखी होईल आणि सर्व जग सुखी होईल . धन्यवाद .
भक्त : जय !