MR/Prabhupada 0219 - स्वामी बनण्याच्या या मूर्ख कल्पनेचा त्याग करा



Lecture on SB 7.9.24 -- Mayapur, March 2, 1976


तुमच्या देशात ऐंशी टक्के, नव्वद टक्के लोक मलेरियाने ग्रस्त आहेत, आणि ते सिफिलीस आहेत . मग फरक काय आहे? तुम्ही का ...? वैद्यकीय मनुष्य म्हणून, 'हा आजार या रोगापेक्षा चांगला आहे' असा फरक तुम्ही का करता ? रोग हा रोग आहे. प्रत्यक्षात हे खरं आहे. तुम्ही म्हणता "आम्ही मलेरियामुळे ग्रस्त आहोत . हे सिफिलीस ने ग्रस्त असण्यापेक्षा चांगले आहे". नाही . रोग हा रोग आहे. तसेच, ब्रह्मा किंवा मुंगी, मी मालक बनण्याचा प्रयत्न करणे हा रोग आहे . हा रोग आहे. म्हणून, हा रोग बरा करण्यासाठी, कृष्ण या रोगाचा इलाज करण्यासाठी येतो, स्पष्टपणे सांगतो , "मूर्खांनो , तुम्ही स्वामी नाहीत , तुम्ही सेवक आहात.मला शरण या " हा रोगाचा इलाज आहे. जर एकाने मान्य केली कि "आणखी नाही", आर नारे बाप , "अजून मालक बनण्याचा प्रयत्न नाही," हा रोगाचा इलाज आहे . म्हणूनच चैतन्य महाप्रभु म्हणाले, जसे प्रह्लाद महाराज म्हणाले ,

निज भृत्य-पार्श्वम (श्रीमद भागवतम ७.९.२४)

"मला तुझ्या सेवकाचा सेवक म्हणून ठेव." तीच गोष्ट चैतन्य महाप्रभु म्हणाले,

गोपी-भर्तुर पद-कमलयोर दास-दास-अनुदास: (चरितामृत मध्य १३.८०)

तर हि कृष्ण भावनामृत चळवळ म्हणजे आम्हाला मालक बनण्याची ही मूर्खपणाची कल्पना सोडली पाहिजे . हि कृष्ण भावनामृत चळवळ आहे . आम्हाला सेवक कसे बनावे हे शिकले पाहिजे. फक्त सेवक नाही , सेवकांचा सेवक ... तो इलाज आहे. म्हणूनच प्रह्लाद महाराज म्हणाले, "तर मी मालक होण्याचा हा सर्व मूर्खपणा समजलो आहे. माझे वडील देखील स्वामी बनण्याचा प्रयत्न करीत होते.तर हे ज्ञान आहे , आता मी परिपूर्ण आहे. स्वामी बनण्याची काहीच गरज नाही. कृपा करून मला काही आशीर्वाद द्या, मला आपला दास बनवा . हे वरदान आहे. म्हणून जो कृष्णाच्या सेवकाचा सेवक होण्यास शिकलो , तर ते परिपूर्ण आहे.

गोपी-भर्तुर पद-कमलयोर दास-दास-अनुदास: (चरितामृत मध्य १३.८०)

सेवकाला सहन करावे लागते. सहन . नोकर, कधीकधी मालक खूप गोष्टींची मागणी करतो, म्हणून तो अस्वस्थ होतो. पण तरीही, त्याला अंमलात आणणे आणि सहन करणे आवश्यक आहे. ती परिपूर्ण स्थिती आहे . इथे भारतात अजूनहि , जेव्हा एखादी व्यक्ती लग्न करते, तेव्हा त्याचे ...हि परंपरा आहे . त्याची माता नवर्याला विचारते, "माझ्या प्रिय मुला, तू कुठे जात आहेस?" तो उत्तर देतो, "आई, मी तुझ्यासाठी एक दासी आणणार आहे." ही व्यवस्था आहे. "आई, मी तुझ्यासाठी एक दासी आणणार आहे." याचा अर्थ "माझी पत्नी, तुझी सून, तुझी दासी म्हणून सेवा करेल." हे वैदिक सभ्यता आहे . जेव्हा कृष्ण त्यच्या सोळा हजार बायकांसोबत हस्तिनापुराला गेला , द्रौपदी ... हे साहजिक आहे कि , स्त्री आणि स्त्री मध्ये ते आपल्या पुरुषांविषयी चर्चा करतात . तर द्रौपदी कृष्णाच्या प्रत्येक पत्नीकडून चौकशी करत होती . सर्वच नाही. हे अशक्य आहे, सोळा हजार .

कमीत कमी मुख्य राण्या , सुरुवातीला ... काय (अस्पष्ट) आहे? रुक्मिणी, होय. तर त्यांच्यातील प्रत्येकाजण विवाह समारंभाचे वर्णन करत होत्या "कि माझा विवाह ..." रुक्मिणींनी सांगितले की, "माझ्या वडिलांना मला कृष्णाला देण्याची इच्छा होती, परंतु माझा मोठा भाऊ, तो सहमत नव्हता. त्याला माझे लग्न शिशुपालसोबत लावून द्यायचे होते. तर मला ही कल्पना आवडली नाही . मी कृष्ण यांना एक खाजगी पत्र लिहिले, 'मी माझे जीवन तुम्हाला समर्पित केले आहे, परंतु ही परिस्थिती आहे. कृपया या आणि माझे अपहरण करा ' आणि अशाप्रकारे कृष्णाने माझे अपहरण करून मला त्यांची दासी केली. " राणीची कन्या, राज कन्या ... त्या सगळ्याच राजकन्या होत्या . त्या सामान्य व्यक्तीच्या मुली नव्हत्या .परंतु त्यांना कृष्णाची दासी बनण्याची इच्छा होती . ही कल्पना आहे, सेवक बनण्याची आणि दासी बनण्याची . हा मानवी सभ्यतेचा आदर्श आहे.

प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीची दासी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे . आणि प्रत्येक पुरुषाने शंभर पटीने कृष्णाचा सेवक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भारतीय संस्कृती आहे, असे नाही की "पती-पत्नी, आम्हाला समान अधिकार आहे." तिथे , युरोप ,अमेरिकेमध्ये, चळवळ चालू आहे, "समान अधिकार." ती वैदिक संस्कृती नाही . वैदिक संस्कृती म्हणजे पती कृष्णाचा प्रामाणिक सेवक असावा , आणि पत्नी पतीची निष्ठावान दासी असावी.