MR/Prabhupada 0225 - निराश होऊ नका, गोंधळून जाऊ नका



Lecture at Engagement -- Columbus, may 19, 1969

मानवी सभ्यता हि स्वतःला समजण्यासाठी आहे, मी काय आहे, आणि त्याच्यानुसार कार्य करण्यासाठी आहे. तर भगवद् गीता सांगते, जर आपण स्वतःला समजण्याच्या स्थितीपर्यंत आलो नाही. मग जे काही मी करतो किंवा वागतो, हि फक्त हार आहे, किंवा वेळ वाया घालवणे आहे. त्याच वेळी, चेतावणी आहे की आपण आपल्या आयुष्याचा एक क्षणही वाया घालवू नये. कृपया समजण्याचा प्रयत्न करा या वैदिक सूचना, त्या किती चांगल्या आहेत. चाणक्य पंडित नावाचा महान राजकारणी आहे. तो सम्राट चंद्रगुप्तचा प्रधानमंत्री होता, महान अलेक्झांडरच्या शासनकाळाच्या वेळी, ग्रीसमध्ये. तर, तो सम्राट चंद्रगुप्तचा प्रधानमंत्री होता, आणि त्याच्याकडे अनेक नैतिक सूचना आणि सामाजिक सूचना होत्या. त्याच्या एका श्लोकात, तो सांगतो की आयुष्य क्षण इको आपि न लभ्य: स्वर्ण-कोटिभि: आयुष्य, "तुमच्या आयुष्याचा काळ." समजा तुम्ही वीस वर्षाचे आहात. आज १९ मे आहे, आणि दुपारचे चार वाजले होते.

आता, हि वेळ दुपारचे चार, १९ मे, १६६९, गेली. जरी तुम्ही लाखो डॉलर्स द्यायला तयार असाल तरी ती तुम्हाला परत मिळणार नाही. जरा समजण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे, अगदी तुमच्या आयुष्याचा एक क्षण वाया गेला, फक्त इंद्रियतृप्तीसाठी - आहार, निद्रा, भय, मैथुन - मग तुम्ही आयुष्याची किंमत जाणत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक क्षणही लाखो डॉलर देऊनही परत मिळत नाही. आयुष्य किती मौल्यवान आहे जरा समजण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपले कृष्णभावनामृत आंदोलन त्यांचे आयुष्य किती मौल्यवान आहे हे लोकांना समजण्यासाठी आहे, आणि त्याप्रकारे त्याचा वापर केला पाहिजे. आपले आंदोलन सर्वे सुखिनो भवन्तु: आहे सर्वजण सुखी राहा. केवळ मानवी समाज नाही, पशु समाजही, आम्ही सर्वाना आनंदी पाहू इच्छितो. तेच कृष्णभावनामृत आंदोलन आहे. आणि ते व्यवहारिक आहे; ते स्वप्न नाही. तुम्ही आनंदी बनू शकता. निराश होऊ नका, गोंधळून जाऊ नका. तुमचे आयुष्य किंमती आहे. तुम्ही, या आयुष्यात, तुमचे शाश्वत जीवन, ज्ञानाचे आनंददायक जीवन अनुभवू शकता. ते शक्य आहे; ते अशक्य नाही.

तर आम्ही केवळ जगाला हा संदेश प्रसारित करीत आहोत, की "तुमचे आयुष्य खूप मौल्यवान आहे. कुत्र्या आणि मांजरांप्रमाणे वाया घालवू नका. ते पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न करा." हे भगवद्-गीतेमध्ये विधान आहे. आम्ही भगवद्-गीता जशी आहे तशी प्रकाशीत करीत आहोत. वाचण्याचा प्रयत्न करा. त्या भगवद्-गीतेत चवथ्या अध्यायात असे सांगितले आहे, जन्म कर्म मे दिव्यं यो जानाति तत्त्वतः जर केवळ श्रीकृष्ण काय आहे समजण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काय कार्य आहे, त्यांचे जीवन काय आहे, ते कुठे राहतात. ते काय करतात… जन्म कर्म. जन्म म्हणजे अविर्भाव आणि तिरोभाव; कर्म म्हणजे कार्य; दिव्यं - दिव्य. जन्म कर्म मे दिव्यं यो जानाति तत्त्वतः. जो श्रीकृष्णांचा अविर्भाव आणि कार्य जाणतो प्रत्यक्षात, सत्यामध्ये - भावनेने नाही पण वैज्ञानिक अभ्यासाने - मग परिणाम आहे त्यक्त्वा देहं पुर्न जन्म नैति मामेति कौंतेय (भ.गी. ४.९) केवळ श्रीकृष्णांना समजल्याने. तुम्हाला या भौतिक अस्तित्वाच्या दयनीय स्थितीत परत यावे लागणार नाही. हे सत्य आहे. अगदी तुमच्या आयुष्यात, या आयुष्यात, तुम्ही समजू शकाल. तुम्ही आनंदी व्हाल.