MR/Prabhupada 0227 - मी का मरु, मला मृत्यू आवडत नाही



Lecture -- Los Angeles, May 18, 1972

तर श्रीकृष्णांना समजणे थोडे कठीण आहे. वास्तविक, देवाला समजणे हा एक खूप कठीण विषय आहे. पण देव स्वतः भगवद् गीतेत स्वतःबद्दल समजावून सांगतात. "मी असा आहे. मी असा आहे, हि भौतिक प्रकृती अशी आहे, आध्यात्मिक प्रकृती अशी आहे जीव अशाप्रकारे आहेत…" सर्वकाही भगवद् गीतेत पुर्णपणे वर्णन केले आहे. स्वतः भगवंत, आपले स्वतःचे ज्ञान देत आहेत, आणि तीच केवळ भगवंतांना समजण्याची प्रक्रिया आहे. अन्यथा, कल्पना करून आपण भगवंतांना समजू शकत नाही. ते शक्य नाही. ते अमर्याद आहेत आणि आपण मर्यादित आहोत. आपले ज्ञान, आपली समज, सर्वकाही खूप मर्यादित आहे. तर आपण कसे अमर्यादीतला समजू शकतो? पण जर आपण अमर्यादित स्वरूप स्वीकारले, की ते अशाप्रकारे आहेत, असे आहेत, तर आपण समजू शकतो. ते परिपूर्ण ज्ञान आहे. भगवंतांबद्दलच्या काल्पनिक ज्ञानाला काही मूल्य नाही.

वास्तविक ज्ञान, जसे… मी हे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे जर एखादा मुलगा जाणू इच्छित असेल वडील कोण आहेत, त्याचे वडील कोण आहेत. सरळ गोष्ट आहे की आईला विचारायचे. किंवा आई सांगेल, " हे तुझे वडील आहेत." ते खरे ज्ञान आहे. आणि जर तुम्ही कल्पना करता, "माझे वडील कोण आहेत?" आणि संपूर्ण शहरात विचारता "तुम्ही माझे वडील आहात का? तुम्ही माझे वडील आहात का? तुम्ही माझी वडील आहात का?" ज्ञान नेहमी अपूर्णच राहील. तो कधीही शोध लावू शकणार नाही की त्याचे वडील कोण आहेत. पण हि सोपी प्रक्रिया, जर तो आपल्या वडिलांकडून ज्ञान घेतो, अधिकारी, माता, "माझ्या प्रेमळ मुला, इथे तुझे वडील आहेत," तर तुमचे ज्ञान परिपूर्ण आहे.

त्याचप्रमाणे, दिव्य ज्ञान… जसे मी बोलत होतो की तिथे आध्यात्मिक जग आहे. तो आपल्या अनुमानाचा विषय नाही. पण जेव्हा भगवंत सांगतात, हो, तिथे एक आध्यात्मिक जग आहे, ते माझे मुख्यालय आहे," ते सर्व ठीक आहे. होय. तर आपण श्रीकृष्णांकडून ज्ञान प्राप्त करतो, अधिकृत व्यक्ती. म्हणून आपले ज्ञान परिपूर्ण आहे. आपण परिपूर्ण नाही पण आपले ज्ञान परिपूर्ण आहे. कारण आपण ज्ञान प्राप्त पूर्ण व्यक्तीकडून करतो. तेच उदाहरण, की माझे वडील कोण आहेत हे समजण्यासाठी मी परिपूर्ण नाही, पण माझी आई परिपूर्ण आहे, आणि कारण मी माझ्या आईचे परिपूर्ण ज्ञान स्वीकारतो, म्हणून माझी वडिलांबद्दलची माहित परिपूर्ण आहे. तर हे कृष्णभावनामृत आंदोलन मानव समाजाला परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी आहे: ते काय आहेत, भगवान काय आहेत, हे भौतिक जग काय आहे, तुम्ही इथे का आला आहात. तुम्ही एवढे क्लेश का सहन करता, आयुष्याची दयनीय स्थिती का सहन करावी लागते, मला का मरावे लागते. मला मरणे आवडत नाही, पण मृत्यू अनिवार्य आहे. मला वृद्ध माणूस बनणे आवडत नाही. पण तरीही, ते अनिवार्य आहे. मला रोग ग्रस्त बनणे आवडत नाही, पण ते अनिवार्य आहे. हे, हे सोडवणे जरुरी आहे. ती खरी वास्तविक मनुष्य जीवनाची समस्या आहे.

असे नाही की आहार, निद्रा, मैथुन, भयच्या पद्धतीत सुधारणा करणे. ते मनुष्य जीवन नाही. एक मनुष्य झोपतो एक कुत्रापण झोपतो तर कारण एक मनुष्य एका खूप चांगल्या अपार्टमेंटमध्ये झोपतो, त्याचा अर्थ असा नाही की तो कुत्रापेक्षा जास्त प्रगत आहे. काम तर झोपणे आहे. एवढेच. कारण माणसाने बचावासाठी परमाणू शास्त्रांचा शोध लावला आहे, आणि कुत्र्याला त्याची नखे आणि दात आहेत… तो सुद्धा बचाव करू शकतो. तर बचाव तिथे आहे. तुम्ही असे म्हणू शकत नाही की "कारण माझ्याकडे हा परमाणू बॉम्ब आहे म्हणून मी संपूर्ण जग किंवा विश्व जिंकू शकतो." ते शक्य नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने बचाव करू शकता, आणि कुत्रा देखील त्याच्या पद्धतीने बचाव करू शकतो. तर बचाव करण्याची एक भव्य पद्धत खाण्याची एक भव्य पद्धत, झोपण्याची एक भव्य पद्धत, आणि लैगिक जीवनाची एक भव्य पद्धत राष्ट्र किंवा एखादी व्यक्ती विकसित करत नाही. ती प्रगती नाही. ती एकच गोष्ट आहे. प्रमाणानुसार, दोन हजारावर पाच, किंवा पाच, दोन हजारावर पाचशे आणि विसावर पाच, एकच गुणोत्तर. म्हणून, प्राण्यांचे गुणधर्म चांगल्या पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने, याचा अर्थ असा नाही की मानवी समाज प्रगत आहे. त्याला चांगल्या पद्धतीचा पशुधर्म म्हणतात. एवढेच. वास्तविक प्रगती म्हणजे भगवंतांना जाणणे. ती प्रगती आहे.