MR/Prabhupada 0229 - मी पाहू इच्छितो की एका शिष्याने श्रीकृष्ण तत्वज्ञान जाणले आहे



Conversation with Indian Guests -- April 12, 1975, Hyderabad

प्रभुपाद: अडचण अशी आहे की आम्ही नियमित विद्यार्थी होऊ इच्छित नाही. संयोगाने इथे आणि तिथे, इथे आणि तिथे, पण मी तीच समान गोष्ट रहातो. हे विज्ञान आहे. वेद सांगतात, तद् विज्ञानार्थं स गुरुम एवाभिगच्छेत (मुंडक उपनिषद १.२.१२) | जर तुम्ही ते शिकण्यासाठी गंभीर आहात, तद् विज्ञान. तद् विज्ञानार्थं, गुरुम एवाभिगच्छेत. तुम्ही प्रामाणिक गुरुकडे गेले पाहिजे जो तुम्हाला शिकवेल. कोणीही गंभीर नाही. ती अडचण आहे. प्रत्येकजण विचार करीत आहे, "मी मुक्त आहे," जरी निसर्ग त्याचे कान ओढत आहे. प्रकृतेः क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वशः (भ.गी. ३.२७) | तू असे केले आहेस, इथे ये, खाली बस. हे सुरु आहे, प्रकृती.

अहंकार-विमुढात्मा कर्ताहमिति मन्यते (भ.गी. ३.२७)। दुष्ट, मूर्ख त्यांच्या खोट्या अहंकारामुळे, तो विचार करीत आहे, "सर्व काही मीच आहे. मी स्वतंत्र आहे." जे अशाप्रकारे विचार करीत आहेत, त्यांचे भगवद् गीतेत वर्णन केले गेले आहे. अहंकार विमुढात्मा. खोट्या अहंकाराने गोंधळलेला आहे आणि विचार करतो. " मी जो विचार करीत आहे तो बरोबर आहे." नाही, तुम्ही स्वतःच्या मार्गाने विचार करू शकत नाही. कृष्ण जे सांगतात त्याप्रमाणे विचार करा, मग तुम्ही बरोबर आहात. नाहीतर, तुम्ही मायेच्या प्रभावाखाली विचार करता. एवढेच. त्रिभिर गुणमायैर मोहित, ना अभिजानाति माम इभ्यः परम अव्ययं. मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् (भ.गी. ९.१०) । या गोष्टी तिथे आहेत.

भगवद् गीता पूर्णपणे वाचा, नियमांचे पालन करा, मग तुमचे आयुष्य यशस्वी होईल. आणि जोपर्यंत तुम्हाला मिळाले आहे, हे सुद्धा बरोबर आहे, ते सुद्धा बरोबर आहे, मग तुम्ही योग्य करणार नाही. तुम्ही सर्व गमवाल. एवढेच. ते नाही… जे कृष्णांनी सांगितले आहे ते बरोबर आहे. ते असावे (अस्पष्ट). नाहीतर तुम्ही फसवले जाल. म्हणून आम्ही या तत्वज्ञानाचा अशा प्रकारे प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कदाचित, खूप लहान संख्येने, पण एकश चंद्रास तमो हन्ति न चित्तर सहस्र जर एक चंद्र असेल तर तो पुरेसा आहे. लाखो ताऱ्यांच्या चमकण्याचा काय उपयोग आहे. तो आमचा प्रचार आहे. जर कृष्ण तत्वज्ञान काय आहे एखादी व्यक्ती समजू शकली, तर माझा प्रचार यशस्वी झाला, एवढेच.

आम्हाला प्रकाश शिवाय असणारे लाखो तारे नको आहेत. प्रकाशा शिवाय असणाऱ्या लाखो ताऱ्यांचा काय उपयोग आहे? तो चाणक्य पंडित यांचा साल्ला आहे, वरं एक पुत्र न चवुर कसतं अपि. जर एक शिकलेला पुत्र आहे. तर ते पुरेसे आहे. न चवुर कसतं अपि. मूर्ख आणि दुष्ट शेकडो पुत्रांचा काय उपयोग आहे? एकश चंद्रस तमो हन्ति न चित्तर सहस्र. एक चंद्र प्रकाश देण्यासाठी पुरेसा आहे. तिथे लाखो ताऱ्यांची गरज नाही. त्याचप्रमाणे आम्ही लाखो शिष्यांच्या मागे नाही. मी पाहू इच्छितो की एका शिष्याने श्रीकृष्ण तत्वज्ञान जाणले आहे. ते यश आहे. एवढेच.

श्रीकृष्ण सांगतात यततां अपि सिद्दानां, कश्चिद वेत्ति मां तत्त्वतः (भ.गी. ७.३), तर, सर्वप्रथम, सिद्ध बनणे खूप कठीण काम आहे. आणि मग, यततां अपि सिद्दानां (भ.गी. ७.३) । ते अजूनच कठीण काम आहे. तर, कृष्ण तत्वज्ञान समजायला थोडेसे कठीण आहे. जर ते सोपं समजत असतील तर ते समजत नाहीत. ते सोपे आहे, ते सोपे आहे, जर तुम्ही श्रीकृष्णांचे शब्द स्वीकारलेत, ते खूप सोपे आहे. अडचण कुठे आहे? श्रीकृष्ण सांगतात, मन्मना भव मद्भत्त्को मद्याजी मां नमस्कुरु, सतत माझा विचार कर. तर अडचण कुठे आहे?

तुम्ही श्रीकृष्णांचे चित्र पाहिले आहे, श्रीकृष्णांची मूर्ती, आणि जर तुम्ही कृष्णांचा विचार केलात, अडचण कुठे आहे? शेवटी आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे. तर काहीतरी विचार करण्या ऐवजी, कृष्णांचा विचार का नाही? अडचण कुठे आहे? पण तो गांभीर्याने घेत नाही. त्याला कृष्ण वगळता, अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि कृष्ण सांगतात, मन्मना भव मद्भत्त्को कृष्णभावनामृत स्वीकारण्यात काही अडचण नाही. अजिबात नाही. पण लोक ते स्वीकारत नाहीत, ती अडचण आहे. ते फक्त वाद घालतील. कुटक. कृष्ण सांगतात, मन्मना भव मद्भत्त्को, त्यावर वादविवाद कुठे आहे? तुम्ही म्हणता की, ते कृष्णाबद्दल विचार करू शकत नाहीत, ते कृष्णाबद्दल सांगू शकत नाहीत. आणि कृष्ण सांगतात, मन्मना भव मद्भत्त्क. हा तर्क आहे, हे तत्वज्ञान नाही. तत्वज्ञान आहे, थेट, तुम्ही अशाप्रकारे करा, एवढेच.

तुम्ही ते करा आणि परिणाम मिळवा. तुम्ही काही खरेदी करायला जाता, किंमत निश्चित आहे, तुम्ही पैसे देता आणि ते घेता. तर्क कुठे आहे.? जर तुम्ही आहात, जर तुम्ही त्या गोष्टीबद्दल गंभीर आहात, तुम्ही पैसे द्याल आणि घ्याल. श्रीला रूप गोस्वामी यांचा हाच सल्ला आहे. कृष्ण-भक्ती रस-भाविता-मति क्रियतां यदी कुतो अपि लभ्यते. जर तुम्ही कृष्णांचा विचार करत कुठेतरी खरेदी करू शकता, कृष्ण-भक्ती रस-भाविता मति. ते आम्ही कृष्णभावनामृतमध्ये भाषांतरित केले आहे. जर तुम्ही हि चेतना खरेदी करू शकलात, कृष्ण चेतना, कुठेतरी, ताबडतोब खरेदी करा. कृष्ण-भक्ती रस-भाविता-मति, क्रियतां फक्त खरेदी करा, यदी कुतो अपि लभ्यते, जर ती कुठे उपलब्ध असेल तर. आणि जर मला खरेदी करायची असेल, तर काय किंमत? तत्र लौल्यम एकं मूलम. न जन्म-कोटिभि: लभ्यते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर किंमत काय आहे, ते सांगतात किंमत आहे तुमची उत्सुकता. आणि ते मिळवण्याची उत्सुकता, लाखो जन्म घेते. तुम्हाला कृष्ण का हवे आहेत? ज्याप्रमाणे त्यादिवशी मी म्हटले की जर कोणी कृष्णांना पहिले, तो कृष्णांच्या मागे वेडा होईल. ते चिन्ह आहे.