MR/Prabhupada 0231 - भगवान म्हणजे जो संपूर्ण विश्वाचा मालक आहे



Lecture on BG 2.1-5 -- Germany, June 16, 1974

तर श्रीकृष्ण यांना अधिकारींद्वारे भगवान किंवा पूर्णपुरुषोत्तम म्हणून स्वीकारले जाते. आणि भगवान काय आहे? भगवान म्हणजे जे षड ऐश्वर्यांनी सुसज्ज आहेत. सर्व ऐश्वर्यांनी सुसज्ज म्हणजे भगवान श्रीमंत व्यक्तित्व आहे. आपण समजू शकतो, भगवान किंवा देव किती श्रीमंत आहे. आपल्या मालकीची काही एकर जमीन असली तरी अभिमान असतो, आणि भगवान म्हणजे जे संपूर्ण विश्वाचे मालक आहेत. म्हणून त्यांना श्रीमंत समजले जाते. त्याचप्रमाणे, त्यांना बलवान समजले जाते. आणि त्याचप्रमाणे, त्यांना हुशार समजले जाते. आणि त्याचप्रमाणे, ते सर्वात सुंदर व्यक्तिमत्व आहे. अशाप्रकारे, जेव्हा तुम्हाला श्रीमंत, अतिशय सुंदर, खूप हुशार, बलवान व्यक्ती सापडते - अशाप्रकारे, जेव्हा तुम्हाला सापडते, ते भगवान किंवा देव आहेत. तर जेव्हा कृष्ण या ग्रहावर उपस्थित होते तेव्हा त्यांनी हि सर्व स्वतःची ऐश्वर्य दाखवून दिली.

उदाहरणार्थ, प्रत्येकजण लग्न करतो, पण कृष्ण सर्वोच्च व्यक्ती असल्याने, त्यांनी १६,१०८ स्त्रियांशी लग्न केले. पण असे नाही की ते सोळा हजार पत्नींसाठी एक पती राहिले. त्यांनी सोळा हजार पत्नींसाठी वेगवेगळ्या राजवाड्यात व्यवस्था केली. प्रत्येक राजवाडा, वर्णन केला आहे, ते उच्च प्रतीच्या संगमरवरी दगडाचे बनवले होते आणि फुर्निचर हस्तिदंतीचे बनवले होते. आणि बैठकीची जागा खूप छान, मऊ कापसाची बनवली होती. अशा प्रकारे तिथे वर्णन आहे. आणि बाहेरचे कुपण, तिथे अनेक फुलझाडे होती. केवळ एवढेच नाही, त्यांनी स्वतःचा देखील सोळा हजार रूपात विस्तार केला, व्यक्तिशः विस्तार. आणि ते तशा प्रकारे प्रत्येक पत्नी बरोबर रहात होते. तर ते भगवंतांसाठी खूप अवघड कार्य नाही. भगवंत सर्वत्र वसलेले आहेत.

तर आपल्या दृष्टीने, जर ते सोळा हजार घरात उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी अडचण काय आहे? तर इथे सांगितले आहे, श्री भगवान उवाच. सर्वात शक्तिशाली अधिकारी बोलत आहे. म्हणून, जे काही ते सांगतात, ते सत्य मानले पाहिजे. आपल्या बद्ध जीवनात, ज्याप्रमाणे आपण भौतिक स्थितीत जगतो, आपल्याला चार त्रुटी मिळाल्या आहेत. आपण चुका करतो, आपण भ्रमात असतो, आणि आपल्याला फसवायची इच्छा देखील असते, आणि आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. तर ज्ञान अशा व्यक्तीकडून मिळते ज्याच्यामध्ये चार प्रकारच्या त्रुटी आहेत आणि तो परिपूर्ण नाही तर जेव्हा तुम्ही ज्ञान प्राप्त करता अशा व्यक्तीकडून जिच्यामध्ये हे चार दोष नाहीत ते परिपूर्ण ज्ञान आहे. आधुनिक वैज्ञानिक,सिद्धांत मांडतात की हे असे असू शकते. ते तसे असू शकते," पण ते परिपूर्ण ज्ञान नाही.

जर तुम्ही तुमच्या अपूर्ण इंद्रियांनी तर्क केलेत, त्या ज्ञानाची काय किंमत आहे. ते अंशिक ज्ञान असेल, पण ते परिपूर्ण ज्ञान नाही. म्हणून आमची ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे ते परिपूर्ण व्यक्तीकडून प्राप्त करायचे. आणि म्हणून आम्ही कृष्ण, भगवान यांच्याकडुन ज्ञान प्राप्त करतो, सर्वात परिपूर्ण, आणि म्हणून आमचे ज्ञान परिपूर्ण आहे. लहान मुलाप्रमाणे. तो अपूर्ण असेल, पण जर त्याच्या वडिलांनी सांगितले, माझ्या प्रिय मुला याला चष्मा म्हणतात," म्हणून जर मुल म्हणाले, "हा चष्मा आहे," ते परिपूर्ण ज्ञान आहे. कारण मूल ज्ञान मिळवण्यासाठी संशोधन करीत नाही. ते त्याच्या वडिलांना किंवा आईला विचारते, "बाबा, हे काय आहे? आई हे काय आहे?" आणि आई सांगते, माझ्या प्रेमळ मुला, हे असे आहे."

दुसरे उदाहरण देता येऊ शकते जर एखादे मूल लहान नसेल, त्याला माहित नाही त्याचे वडील कोण आहेत, मग तो कोणतेही संशॊधन करू शकत नाही. जर त्याने त्याचे वडील कोण शोधण्यासाठी संशोधन केले, तो कधी त्याचे वडील शोधू शकणार नाही पण जर त्याने त्याच्या आईला विचारले, "माझे वडील कोण आहेत?" आणि जर आईने सांगितले, "हे तुझे वडील आहेत," ते परिपूर्ण आहे. म्हणून ज्ञान, भगवंतांचे ज्ञान, जे तुमच्या आकलनशक्तीच्या बाहेरचे आहे, तुम्हाला कसे समजू शकते? म्हणून तुम्हाला स्वतः भगवंत किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून माहित झाले पाहिजे. तर इथे कृष्ण, पूर्णपुरुषोत्तम भगवान, सांगत आहेत, आणि ते अंतिम अधिकारी आहेत. ते अर्जुनाला खालीलप्रमाणे सांगतात.

ते सांगतात, अशोच्यनन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे (भ.गी. २.११) । "माझ्या प्रिय अर्जुना, तू खूप शिकलेल्या, विद्वानासारखा बोलत आहेस, पण तू अशा गोष्टीसाठी शोक करीत आहेस जो तू करू नयेस." गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः गातासून म्हणजे हे शरीर. ते जेव्हा मृत आहे किंवा जेव्हा ते जिवंत आहे, आयुष्याची शारीरिक संकल्पना मूर्खपणा आहे. तर कोणताही विद्वान माणूस शरीराचा गंभीरतेने विचार करीत नाही. म्हणून वैदिक साहित्यात असे सांगितले आहे की " जो जीवनाच्या शारीरिक संकल्पनेत आहे, तो प्राण्यांपेक्षा निराळा नाही." म्हणून आत्ताच्या क्षणी, आत्म्याच्या माहितीशिवाय, संपूर्ण जग जीवनाच्या शारीरिक संकल्पनेत आहे. जीवनाची शारीरिक संकल्पना प्राण्यांमध्ये आहे. मांजर आणि कुत्रा, त्यांना मोठी मांजर किंवा मोठा कुत्रा बनल्याचा खूप गर्व आहे. त्याचप्रमाणे, जर माणूस देखील त्याच्यासारखा अभिमानी बनेल की, "मी मोठा अमेरिकन," "मोठा जर्मन," "मोठा," फरक काय आहे? पण ते खरेतर चालू आहे, आणि म्हणून ते मांजर आणि कुत्र्याप्रमाणे भांडत आहेत.

तर आपण उद्या आणखीन चर्चा करू.