MR/Prabhupada 0233 - आपल्याला गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेने कृष्णभावना मिळते



Lecture on BG 2.4-5 -- London, August 5, 1973

तर श्रीकृष्णांना शत्रू आहेत. अरिसुदन. आणि त्यांना त्या सर्वांची हत्या करायची आहे. श्रीकृष्णांना दोन कार्य आहेत: परित्राणाय साधुनां विनाशय च दुष्कृताम् (भ.गी. ४.८) उपद्रवी… ते उपद्रवी आहेत. राक्षस ज्यांनी श्रीकृष्णांना आव्हान दिले, ज्यांना श्रीकृष्णांबरोबर स्पर्धा करायची इच्छा आहे. ज्यांना श्रीकृष्णांच्या संपत्तीत वाटा हवा आहे. ते सर्व श्रीकृष्णांचे शत्रू आहेत, आणि त्यांना ठार मारले पाहिजे. तर, शत्रूला मारण्याचे कार्य ठीक आहे, साधारणपणे नाही. मग पुढचा प्रश्न, "ठीक आहे, तुम्ही शत्रूला मारू शकता,कबूल आहे. पण तुम्ही मला माझ्या गुरुची हत्या करायचा सल्ला कसा देता. गुरु नहत्व. पण जर श्रीकृष्णांच्या इच्छेखातर, जर गरज असेल तर, तुम्ही तुमच्या गुरुची हत्या देखील केली पाहिजे. ते तत्वज्ञान आहे. श्रीकृष्णांसाठी.

जर श्रीकृष्णांना हवे असेल, तर तुम्ही म्हणू शकत नाही… जर तुम्ही तुमच्या गुरुची हत्या करावी अशी श्रीकृष्णांची इच्छा असेल तर तुम्ही ती केली पाहिजे. ते कृष्णभावनामृत आहे. अर्थात, श्रीकृष्ण तुम्हाला तुमच्या गुरूची हत्या करायला सांगणार नाहीत, पण… कारण गुरु आणि कृष्ण समान आहेत. गुरु-कृष्ण-कृपाय (चैतन्य चरितामृत मध्य १९.१५१) । आपल्याला गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेने कृष्णभावना मिळते. तर खऱ्या गुरुचा कधी वध केला जात नाही, पण तथाकथित गुरुचा वध केला पाहिजे. तथाकथित, ढोंगी गुरु, खोटा गुरु, त्याचा वध केला पाहिजे. प्रल्हाद महाराजांप्रमाणे. प्रल्हाद महाराजांच्या वेळी… ते उभे होते. इथे नृसिहदेव त्यांच्या वडिलांची हत्या करीत आहेत. वडील गुरु आहेत. सर्व-देवमायो गुरु: (श्रीमद्भागवतम् ११.१७.२७) ।

त्याचप्रमाणे, वडील देखील गुरु आहेत, किमान, अधिकृत गुरु, भौतिकदृष्ट्या ते गुरु आहेत. तर कसे प्रल्हाद महाराजांनी नृसिहदेवाना त्याच्या गुरूला मारू दिले? त्याचे वडील. सर्वांना माहित आहे की हिरण्यकश्यपू वडील आहेत. तुमचे वडील एखाद्या व्यक्तीकडून मारले गेलेले पहायला तुम्हाला आवडेल का आणि तुम्ही उभे रहाल? तुम्ही निषेध करणार नाही का? ते तुमचे कर्तव्य नाही? नाही, ते तुमचे कर्तव्य नाही. जेव्हा आपल्या वडिलांवर हल्ला केला जातो तेव्हा आपण निषेध केलाच पाहिजे. अगदी, जरी तुम्ही असमर्थ असाल, तुम्ही लढलेच पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही तुमचे आयुष्य समर्पित करा. "असे कसे घडेल, माझे वडील माझ्या समोर मारले जात आहेत?" ते आपले कर्तव्य आहे.

पण प्रल्हाद महाराजानी निषेध केला नाही. तो विनंती करू शकला असता - तो भक्त होता - "माझ्या प्रिय प्रभू, माझ्या भगवंता, तुम्ही माझ्या वडिलांना माफ करू शकता." त्यांनी ते केले. पण त्याला माहित होते की "माझ्या वडिलांना मारले जात नाही. ते माझ्या वडिलांचे शरीर आहे." नंतर त्याने त्याच्या वडिलांसाठी वेगळ्याप्रकारे याचना केली. सर्वप्रथम, जेव्हा नृसिहदेव चिडलेले होते, ते शरीराची हत्या करीत होते. त्याला माहित होते की "शरीर माझे वडील नाहीत. आत्मा माझे वडील आहेत. तर सर्वप्रथम भगवंत माझ्या वडिलांच्या शरीराची हत्या करून समाधानी होऊ देत, मग मी त्यांना वाचवीन."