MR/Prabhupada 0238 - देव छान आहे , पूर्ण चांगला
Lecture on BG 2.3 -- London, August 4, 1973
- अतः श्रीकृष्ण नामादी ना भवेद ग्राह्यम इन्द्रियै (चै च मध्य १७।१३६)
हे श्रीकृष्णांचे वागणे सर्वसाधारण माणसाला समजणे कसे शक्य आहे? कारणं त्यांच्याकडे त्यांची सामान्य इंद्रिये आहेत. म्हणून ते चूक करतात. का कृष्ण? अगदी श्रीकृष्णांचे भक्त,वैष्णव. तेही सांगितलं आहे.
- वैष्णवेर क्रिया मूद्र विज्ञेह ना बुझय (चै च मध्य १७।१३६).
अगदी वैष्णव आचार्य. ते काय करतात, अगदी सगळ्यात तज्ञ बुद्धिमान मनुष्य समजू शकणार नाही तो हे का करत आहे. म्हणून आपण उच्च अधिकाऱ्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नये, पण आपण आधीच्या आचाऱ्यांच्या सूचनांचे,आज्ञांचे पालन केले पाहिजे, ते शक्य नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला लढण्यासाठी उत्साहीत करत आहेत. त्याचा अर्थ असा नाही की आपणही उत्साहीत करू शकतो, नाही. ते अनैतिक असेल.श्रीकृष्णनासाठी ते अनैतिक नाही. जे काही ते करतात... देव चांगल्यासाठी करतात. देव सगळं चांगलं करतात. आपण ते स्वीकारलं पाहिजे. जे काही ते करतात ते चांगल्यासाठीच असत. ही एक बाजू झाली. आणि जे काही मी अधिकाऱ्यांच्या आज्ञेशिवाय करतो. ते सगळं वाईट आहे. त्यांना कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाही.
- ईश्वरः परमः कृष्ण: (ब्रम्हसंहिता ५.१).
ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. त्यांना कोणाच्याही सूचनांची गरज नाही. जे काही ते करतात, ते परिपूर्ण आहे. हे श्रीकृष्णांना जाणणे आहे. आणि असं नाही की मी माझ्या स्वतःच्या पद्धतीने श्रीकृष्णानंचा अभ्यास करेन. श्रीकृष्ण तुमच्या परीक्षेच्या किंवा चाचणीच्या अधीन नाही. ते सर्वांच्या वर आहेत. ते दिव्य आहेत. म्हणून ज्यांच्याकडे दिव्य दृष्टी नाही,ते श्रीकृष्णानंबद्दल गैरसमज करून घेतात. ते आपल्याला मोहात पाडतात.
- क्लैब्यम म स्म गम: पार्थ
- नैतत् तव्यै उपपद्यते
- क्षूद्रम ह्रदय-दौर्बल्यम
- तक्त्वोत्थिश्ट परन्तप:
- (भ गी २।३)
परन्तप हा शब्द, अशासाठी वापरलाय की "तू क्षत्रिय आहेस, तू राजा आहेस "तुझं काम अपराध्यांना शिक्षा करणं आहे. ते तुझं काम आहे. तू अपराध्यांना माफ करू शकत नाहीस." पूर्वीच्याकाळी राजे हे असत... राजे स्वतः न्याय देत. गुन्हेगाराला राजासमोर आणलं जायचं, आणि राजाला वाटलं हे योग्य आहे, तो लगेच स्वतःची तलवार काढून, त्याच शीर कापतो. . ते राजाच कर्तव्य होत. अगदी खूप नाही शंभरवर्षापूर्वी काश्मीरमध्ये, राजा, जेव्हा चोराला पकडले जायचे, त्याला राजाच्या समोर आणले जायचे, आणि हे सिद्ध झालं की तो चोर आहे,त्याने चोरी केली आहे. लगेच राजा खुद्द स्वतः त्याचे हात कापतो,तुकडे तुकडे करतो. अगदी शंभरवर्षापूर्वी.
तर इतर सगळे चोर सावध होतात,"ही तुमची शिक्षा." तर काश्मीरमध्ये,कशाचीही चोरी, घरफोडी नाही, अगदी कोणी रस्त्यावर काही विसरलं, ते तसेच पडून राहील कोणीही हात लावणार नाही. आदेश होती. राजाचा आदेश होता ,"जर काही बेवारस वस्तू रस्त्यावर पडली असेल तुम्ही त्याला हात लावू शकत नाही. ज्या माणसाची असेल, तो येईल, तो घेईल. तुम्ही घेऊ शकत नाही."अगदी शंभरवर्षांपूर्वी तर ही फाशीची शिक्षा आवश्यक आहे. अत्ताच्या दिवसात फाशीची शिक्षा माफ केली जाते. खुन्याला फाशी देत नाहीत. हे चूक आहे,सगळा मूर्खपणा. खुन्याची हत्या केली पाहिजे. दया नाही. मानव हत्यारा का? अगदी पशु हत्याऱ्यालाही लगेच फाशी दिली पाहिजे. ते राज्य आहे. राजा हा कठोर असला पाहिजे.