MR/Prabhupada 0243 - शिष्य गुरूकडे आत्मज्ञानासाठी येतो



Lecture on BG 2.9 -- London, August 15, 1973


प्रद्युम्न: भाषांतर,"संजय म्हणाला: याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे गोविंद! मी युद्ध करणार नाही' आणि स्तब्ध झाला."

प्रभुपाद: आधीच्या श्लोकात, अर्जुन सांगतो की "या युद्धात काही फायदा नाही कारण विरुद्ध बाजूला, ते सगळे माझे नातलग आहेत. आणि त्यांची हत्या करून,अगदी मी विजयी झालो, त्याला काय किंमत आहे?" ते आम्ही स्पष्ट केले आहे, काहीवेळा अज्ञानामुळे अशा प्रकारचा त्याग केला जातो. वास्तविकपणे, हे फार हुशारीने मांडलेले नाही अशा प्रकारे, एवं युक्त्वा,"असे म्हणत आहे, 'युद्ध करण्यात काही फायदा नाही.' " एवं युक्त्वा, "असं म्हणून," ह्रिषीकेशं, तो इंद्रियांच्या स्वामींशी बोलत आहे. आणि आधीच्या श्लोकात त्याने म्हटले आहे,

शिष्यस्तेsहं प्रपन्नम्: (भ.गी. २.७)

"मी तुमचा शरणागत शिष्य आहे." तर श्रीकृष्ण गुरु झाले, आणि अर्जुन शिष्य झाला. आधी ते मित्रांप्रमाणे बोलत होते. पण मैत्रीपूर्ण बोलण्यात कुठल्याही गंभीर प्रश्नावर निर्णय होऊ शकत नाही. जे काही गंभीर बाब असेल, ती अधिकारी व्यक्तीं बरोबर बोलली पाहिजे. तर हृषीकेश, मी अनेकवेळा स्पष्ट केलंय. ह्रिषीक म्हणजे इंद्रिय,आणि ईश म्हणजे स्वामी. ह्रिषीक-ईश, आणि ते जोडले की: ह्रिषीकेश. त्याचप्रमाणे,अर्जुन सुद्धा. गुडाक ईश. गुडाक म्हणजे अंधार, आणि ईश... अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरून्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः गुरूंचे कर्तव्य आहे... शिष्य गुरूंकडे यतो ज्ञान मिळवण्यासाठी. प्रत्येकजण जन्मता मूर्ख आहे. प्रत्येकजण. अगदी मानव सुद्धा, कारण ते उत्क्रांतीद्वारे प्राण्यांच्या राज्यातून आलेले आहेत. म्हणून जन्म सारखाच,अज्ञान,प्राण्यांसारखे. म्हणून, अगदी एखादा मनुष्य असला, त्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. प्राणी शिक्षण घेऊ शकत नाहीत, पण मनुष्य शिक्षण घेऊ शकतो. म्हणून शास्त्र सांगत,

नायं देहो देहभाजां नृलोके कष्टान् कामानर्हते विड्भुजां ये (श्रीमद भागवतम ५.५.१)

मी हा श्लोक अनेक वेळा म्हटलं आहे, की आता... मनुष्य जातीपेक्षा खालच्या जातीत, आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. फक्त जीवनावश्यक चार गरजांसाठी,आहार,निद्रा भय आणि मैथुन. इंद्रियतृप्ती. मुख्य मुद्दा इंद्रियतृप्ती आहे. म्हणून प्रत्येकाला खूप कष्ट करावे लागतात. पण मानवी जीवनात, श्रीकृष्ण आपल्याला अनेक सुविधा,बुद्धिमत्ता देतात. आपण आपले राहणीमान खूप सुखदायक बनवू शकतो, पण कृष्णभावनामृत बनण्यामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने तुम्ही आरामात जगता. ते सर्व ठीक आहे. पण जनावरांसारखं जगू नका, केवळ इंद्रियतृप्तीत वाढ. मानवी प्रयत्न कसे आरामशीर जगता येईल यासाठी सुरु आहेत. पण त्यांना इंद्रियतृप्तीसाठी आरामशीर जगायचे आहे.

आधुनिक संस्कृतीची ही चुक आहे. युक्ताहारविहारश्च योगो भवती सिद्धी: भगवद् गीतेत असं सांगितलंय युक्ताहार. हो,तुम्हाला खायला पाहिजे, तुम्ही तुमच्या इंद्रियांना तृप्त केलं पाहिजे आपण संरक्षण व्यवस्था केली पाहिजे. जेवढं शक्य आहे तेवढं, दुसरीकडे जास्त लक्ष न वळवता. आपल्याला खायला पाहिजे. युक्ताहार. ते खरं आहे. पण अत्याहार नाही, रूप गोस्वामींनी त्यांच्या उपदेशामृतमध्ये सल्ला दिलाय.

अत्याहार: प्रयासश् च
प्रजल्पो नियमाग्रह
लौल्यम् जन-संगस् च
षडभीर भक्तिर विनश्यति
(उपदेशामृत २)

जर तुम्हाला अध्यात्मिक चेतनेमध्ये प्रगती करायची - कारण की हाच जीवनाचा उद्देश आहे. मग तुम्ही अधिक खाऊ नये, अत्याहार, किंवा अधिक गोळा. अत्याहार: प्रायसश्च प्रजल्पो नियमाग्रहः ते आपलं तत्वज्ञान आहे.